अनोळखी व्यक्तीला ओटीपी शेअर केल्यामुळे पवईतील हिरानंदानी गार्डन येथील एका ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारक यांना पाच व्यवहारांच्या माध्यमातून १.९५ लाखाचा गंडा पडला आहे. तुम्ही दूरसंचार नियामक प्राधिकरण (टेलिकॉम रेग्युलेटरी औथोरीटी ऑफ इंडिया) म्हणजेच ट्रायच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. पुढील काळात तुम्हाला पेन्शन बंद होवू शकते. असे कारण देत सायबर भामट्याने हिरानंदानी येथील एका ज्येष्ठ नागरिक […]
Tag Archives | सायबर क्राईम
सायबर फसवणूकीत वाढ; पवईतील ज्येष्ठ नागरिकाला १.८ लाखाचा गंडा
लॉकडाऊन काळात डिजिटल व्यवहार वाढल्याने सायबर फसवणुकीच्या (cyber frauds) गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशाच एका केवायसी फसवणूकीत (KYC frauds) पवईतील एका ज्येष्ठ नागरिकाला लाखो रुपयांचा गंडा पडला आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात अशा गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, सावधानता बाळगण्याचे निर्देश सायबर पोलिसांकडून देण्यात आले आहेत. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन असल्याने […]
आयआयटीच्या प्राध्यापकांची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
प्राध्यापकाच्या मित्राचा मेल हॅक करून त्याच्या आधारे कोविड-१९ आजाराच्या उपचारासाठी पैशांची मागणी करत आयआयटी मुंबईच्या एका प्राध्यापकाची २ लाखाची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच पवईत समोर आला आहे. या संदर्भात माहिती तंत्रद्यान कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करून पवई पोलीस तपास करत आहेत. लॉकडाऊनमध्ये संपूर्ण देश अडकून पडलेला असताना, या सगळ्यांचा ऑनलाईन चोरट्यांनी फायदा उचलला […]
२.५ दशलक्ष पौंडचे आमिष दाखवून पवईत महिलेची ४५.६९ लाखाची ऑनलाईन फसवणूक
पवईतील ३१ वर्षीय महिला व्यावसायिकेला २.५ दशलक्ष पौंड देण्याचे आमिष दाखवत एका अज्ञात व्यक्तीने ४५.६९ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सायबर चोराने इमेल द्वारे आपण यूकेचा नागरिक असल्याची बतावणी करून, तिला भारतात २.५ दशलक्ष पौंड देणगी द्यावयाची आहे, जेणेकरुन ती भारतात चॅरिटीचे काम करू शकेल असे सांगत तिची फसवणूक केली […]
फार्मा कंपनीला सायबर फ्रॉडद्वारे ४५ लाखाला गंडवले
ईमेल हॅकिंगच्या माध्यमातून ऑनलाइन घोटाळेबाजांनी पवई पोलिसांच्या अखत्यारीतील एका फार्मासिटिकल कंपनीला ४५ लाखाला गंडवले आहे. थेट दुसर्या खात्यावर पैसे भरण्यास सांगून, कंपनीचे मेल खाते हॅक करून त्यातील सगळे पुराव्यांचे मेल डिलीट करून कोणताही मागमूस न ठेवता मोठ्या सफाईने हे काम करण्यात आले आहे. कंपनीच्या वरिष्ठ संचालकानी यासंदर्भात अज्ञात आरोपींविरोधात ६३.४३५ डॉलर्सच्या (जवळपास ४५ लाख रुपये) […]
आयआयटीकराच्या बँक खात्यावर ऑनलाईन डल्ला
आयआयटी पवई भागात राहणाऱ्या एका वीस वर्षीय तरुणाच्या खात्यातील पैसे चोरट्याने ऑनलाईन लांबवल्याची घटना पवईत उघडकीस आली आहे. एटीएममधून पैसे काढायला गेलेल्या तरुणाला ही बाब लक्षात येताच त्याने पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पवई येथील आयआयटी परिसरात राहणारे अविनाश आगळे, आयआयटी मुंबई येथे सफाई कामगार म्हणून कार्यरत आहेत. इंडियन ओव्हर्सीस बँकेच्या पवई प्लाझा […]
बक्षिसाच्या आमिषाने एनएसजी कमांडोला गंडा
सरकारी योजनेत बक्षिस लागल्याची बतावणी करून एका एनएसजी कमांडोला तब्बल २.४२ लाखाचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार पवईत समोर आला आहे. या घटनेमुळे सायबर क्राईमचा घेरा वाढत चालल्याने एनएसजी कॅम्पमध्ये सुद्धा खळबळ माजली आहे. पवई पोलीस ठाण्यात याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरु आहे. उत्तरप्रदेशचा असणारा अजितकुमार पाल हा सैन्यदलात कर्तव्य बजावत […]
चांदिवलीत सराफाला दहा लाखांचा गंडा
चांदिवली फार्मरोडवरील एका सराफाला १० लाख ४३ हजार रुपयांना एका ठगाने गंडवल्याची घटना घडली आहे. याबाबत साकीनाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला असून, साकीनाका पोलीस अधिक तपास करीत आहेत. रमेश जैन यांचे चांदिवली फार्मरोड परिसरात दागिन्यांचे दुकान आहे. काही दिवसांपुर्वी दुकानामध्ये एक व्यक्ती दागिने पाहण्यासाठी आला होता. मी खूप दागिने खरेदी करणार असल्याचे सांगत […]
व्यावसायिकाला ऑनलाईन ५.८ लाखाचा गंडा
पवईमधील हिरानंदानी येथे राहणाऱ्या एका व्यावसायिकाला फिशिंगद्वारे (ऑनलाईन फसवणूक) ५.८ लाखाचा गंडा घातला आहे. जवळचा मित्र असल्याचे भासवून मेलद्वारे पैशाची मागणी करून अनोळखी व्यक्तीने फसवणूक केली असून, याबाबत पवई पोलिसांनी गुन्हा नोंद करून सायबर सेलच्या मदतीने तपास सुरु केला आहे. गुन्ह्यात वापरला गेलेला इमेल हा मित्राच्या इमेल अकौंटशी मिळता-जुळता असल्याने किंवा हॅक केला असल्यामुळे सहज […]