मुंबई परिसरात चरस या अंमलीपदार्थाचा पुरवठा करणाऱ्या एका सराईत आरोपीला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून पवई पोलिसांनी ३.५ कोटी किंमतीचा चरस हा अंमली पदार्थ व एक गावटी बनावटीचा कट्टा हस्तगत केला आहे. पवई परिसरात अंमली पदार्थ खरेदी-विक्री रोखण्यासाठी पवई पोलीस ठाण्याच्या दहशतवाद विरोधी सेलचे पोलीस उपनिरीक्षक शोभराज सरक हे आपल्या पथकासह पवई परिसरात गस्त […]
Tag Archives | arrested
बेकायदेशीर शस्त्रे बाळगल्या प्रकरणी पवईतून दोघांना अटक
बेकायदेशीरपणे बंदुक विकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांना पवईतून अटक करण्यात आली आहे. सचिन किशवाह (१८) आणि अमरकुमार बादशाह नई (२३) अशी या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. मुंबई पोलिसांच्या युनिट – १०ने ही मोठी कारवाई केली. पवई परिसरात दोन व्यक्ती शनिवारी बेकायदेशीर बंदुक विकण्याचा प्रयत्न […]
ज्येष्ठ नागरिकाच्या घरात २.७ कोटीचा डल्ला; घरकाम करणाऱ्या महिलेला अटक
कुंपणाने शेत खाल्याची म्हण आपण ऐकलीच असेल, मात्र पवईतील उच्चभ्रू वस्ती असणाऱ्या हिरानंदानी भागात ही म्हण प्रत्यक्षात घडलेली पाहायला मिळाली. एका ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेल्या एका २३ वर्षीय महिलेने ज्येष्ठ नागरिकांच्या घरात चोरी करत हिरे, सोने, चांदीचे दागिन्यांसह रोख रक्कम असा २.७ कोटी रुपयांच्या डल्ला मारला. मदतीसाठी ठेवलेल्या महिलेवर विश्वास ठेवत कुटुंबियांनी […]
पोलिसांपासून वाचण्यासाठी सोनसाखळी चोराने लावले सीसीटीव्ही; अखेर पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गुन्हा केल्यानंतर फैजलने आपली स्पोर्ट्स बाईक पवई येथे सोडून दिली होती. जवळपास एक वर्ष आणि चार महिने प्रयत्न केल्यानंतर सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. मुंबई, ठाण्यातील विविध पोलीस ठाण्यांनी त्याच्या मागे पथके लावली होती पण तो कधीच घरात मिळून येत नव्हता. त्याला पकडल्यामुळे पोलिसांना त्याचे एवढे दिवस न पकडले जाण्याचे रहस्य […]
Man Arrested in Powai Worth Rs 80 Lakh Fake Currency
The Mumbai Crime Branch arrested a 31-year-old man allegedly with counterfeit currency notes. Crime branch unit 10 arrested a man from Powai on Tuesday and seized fake notes worth Rs 80 lakh from his possession. The accused has been identified as Saujanya Bhusan Patil, of Umroli area in Palghar district. Mumbai Crime Branch Police constable […]
८० लाख रुपयांच्या बनावट नोटांसह पवईतून एकाला अटक; गुन्हे शाखेची कारवाई
५०० रुपयाच्या बनावट नोटा (fake currency) व्यवहारात आणण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या एका ३१ वर्षीय व्यक्तीवर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Mumbai Crime Branch) कारवाई करत अटक केली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट १०ने (unit 10) या व्यक्तीला पवई (Powai) येथून मंगळवारी अटक केली असून, त्याच्या ताब्यातून ८० लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. सौजन्य भूषण […]
पवईत मॉलमध्ये कुत्र्याशी गैरकृत्य; फूड डिलिव्हरी बॉयला अटक
मॉलमध्ये कुत्र्यासोबत गैरकृत्य केल्याप्रकरणी एका २८ वर्षीय फूड डिलिव्हरी बॉयला शनिवारी पवई पोलिसांनी अटक केली आहे. पवई परिसरात घडलेली ही अशाप्रकारची दुसरी घटना आहे. अॅनिमल अॅक्टिव्हिस्ट आणि बॉम्बे अॅनिमल राइट्स एनजीओच्या सदस्या मिनू शेठ यांनी दिलेल्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी आरोपी डिलिव्हरी बॉय आकाश मोरे याला बेड्या ठोकल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पवईतील हिरा पन्ना मॉलच्या […]
पवईसह मुंबईत अंमलीपदार्थ पुरवठा करणाऱ्या नायजेरियन नागरिकाला अटक
अटक आरोपी हा पवईसह अंधेरी- गोरेगाव येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तसेच रस्त्यावरील पेडलर्सना मेफेड्रोनचा पुरवठा करत होता. झडतीत त्याच्याकडून ६० लाख किंमतीचे मेफेड्रोन मिळून आले. मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँचच्या अंमली पदार्थ विरोधी सेलने एका नायजेरियन नागरिकाला अटक केली आहे, जो मुंबईतील टॉप ड्रग्ज पुरवठादारांपैकी एक आहे. आरोपीची दिवसाच्या कोणत्याही वेळी कितीही प्रमाणात मेफेड्रोनची डिलिव्हरी करण्यास सक्षम […]
बँकेच्या ड्रॉप बॉक्समधून आरटीजीएस फॉर्म बदलल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक
साकीनाका पोलिसांनी (Sakinaka Police) एका ४० वर्षीय व्यक्तीला राष्ट्रीयीकृत बँकांच्या (Nationalise Bank) ड्रॉप बॉक्समधील चेकला जोडलेले आरटीजीएस (रिअल-टाइम ग्रॉस सेटलमेंट – RTGS) फॉर्म बदलुन पैसे दुसऱ्या खात्यात हस्तांतर (transfer) करण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. अन्वर खान असे या आरोपीचे नाव असून, त्याच्या विरोधात आंबोली (Amboli) आणि जोगेश्वरी (Jogeshwari) पोलीस ठाण्यात (Police Station) सुद्धा अशाच प्रकारच्या […]
दोन मोटारसायकल चोरट्यांना अटक, ९ मोटारसायकली जप्त
पोलिसांनी दोन मोटारसायकल चोरांना अटक केली असून, त्यांच्याकडून ४.५५ लाख रुपये किंमतीच्या नऊ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. यातील एक मोटारसायकल या चोरट्यांनी पवई परिसरातून चोरी केली आहे. जितेश सुरेश काळुखे (२५) आणि अरुण मतांग (२४) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत, दोघेही घाटकोपरचे रहिवासी असून, पार्ट-टाईम केटरिंगचे काम करतात. त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३७९ […]
मोटारसायकल चोरट्याने अर्ध्या तासात उलगडली गाडी; तासाभरात पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पवई पोलीस ठाणे हद्दीपासून काहीच अंतरावर पार्क केलेली मोटारसायकल पळवून नेऊन अर्ध्या तासात त्याचे पार्ट काढून विकण्याच्या तयारीत असणाऱ्या चोरट्याला पवई पोलिसांनी अवघ्या तासाभरात बेड्या ठोकल्या आहेत. इब्राहीम अकबर शेख उर्फ झिपी (२०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. फिर्यादी मोहमद गणी शेख हे कुर्ला कोर्टाजवळ राहतात. १८ तारखेला त्यांच्या भावाचा मृत्यू झाल्याने ते […]
व्हेल माश्याच्या उलटीची तस्करी करणाऱ्या दोघांना पवईमध्ये अटक; ६ कोटीचा मुद्देमाल जप्त
व्हेल माशाची उलटीची विक्री करण्यास आलेल्या दोघा तस्करांना पवई परिसरातून शुक्रवारी रात्री पोलिसांनी अटक केली आहे. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या युनिट १० ने त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. सुनील कुलकर्णी (४९), राहणार कोथरूड पुणे आणि अन्वर अब्दुल खुदुस शेख (५५) वर्ष अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून ६ किलो वजनाची […]
३० लाखाचे दागिने चोरी करून पसार झालेल्या इसमास पवई पोलिसांनी ६ तासात ठोकल्या बेड्या
पवईतील ज्वेलरी शॉपमध्ये चोरी करून ३० लाख किंमतीच्या दागिन्यांसह पसार झालेल्या एका २६ वर्षीय व्यक्तीला पवई पोलिसांनी अवघ्या ६ तासात बेड्या ठोकल्या आहेत. हिरालाल लेहरुलाल कुमावत असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हिरालाल यावर्षी २० मे रोजी जामिनावर सुटला होता. पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेले सर्व दागिने हस्तगत केले आहेत. दोन वर्षापूर्वी जुगारात हरल्याने कर्ज फेडण्यासाठी […]
पवई पोलिसांच्या गाडीवर दगडफेक; ३ आरोपींना अटक
प्रमोद चव्हाण पवई परिसरात गस्त घालत असताना पोलीस गाडीवर हल्ला करणाऱया ३ तरुणांच्या पवई पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. राहुल सिंग, इस्माईल शेख, शिवकुमार उर्फ भैय्या अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक आरोपी हे नशेखोर असून, पोलिसांना घाबरवण्यासाठी त्यांनी हा हल्ला केल्याची कबुली दिली आहे. पोलीस शिपाई अजय बांदकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी […]
जामिनावर सुटलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीसह तिघांना हत्याराचा धाक दाखवून जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक
पवई परिसरातील शिवशक्ती नगर येथील एका साडीच्या दुकानात घुसून बंदुकीचा धाक दाखवून, दुकान मालकाला चाकूने जखमी करून जबरी चोरी करणाऱ्या ४ आरोपींना पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अटक आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. गुन्ह्यातील मुख्य आरोपीला काही महिन्यांपूर्वीच जामिनावर सोडण्यात आले होते. तो खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत होता. २१ एप्रिलला ४ अज्ञात इसम हे […]
पवईत १७ वर्षीय तरुणाचा खून; मारहाणीचा व्हिडीओ केला शूट; आरोपींना ५ तासात अटक
पवईतील मिलिंदनगर परिसरात राहणाऱ्या एका १७ वर्षीय तरूणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बुधवार, ३१ मार्चला पहाटे उघडकीस आली होती. अनिकेत रामा बनसोडे असे या तरुणाचे नाव असून, त्याला मारहाण करत त्याचा खून केल्याचे समोर येताच पवई पोलिसांनी पाच तासात ४ आरोपींना अटक केली आहे. अटक आरोपी जेविएलआरवर सुरु असणाऱ्या मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षारक्षक म्हणून काम […]
साकीनाका येथे गोडाऊन फोडून १८ लाखाची चोरी करणाऱ्या चोरट्यांना ३ तासात अटक
साकीनाका येथील अरिहंत इंडस्ट्रीजमध्ये असणाऱ्या एमएमपीएम या कंपनीची भिंत तोडून लाखोंचे इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरुन नेणाऱ्या ३ आरोपींना साकीनाका पोलिसांनी अवघ्या तीन तासात बेड्या ठोकल्या आहेत. इमरान मेहरान शेख (१९) आणि अक्षय शर्मा (२४) अशी अटक आरोपींची नावे असून, त्यांचा अजून एक साथीदार दिनेश दुमडिया मात्र फरार आहे. साकीनाका पोलिसांनी आरोपींकडून चोरीला गेलेली संपूर्ण मालमत्ता हस्तगत […]
फूड डिलिवरी बॉयला चोरीच्या गुन्ह्यात अटक
हिरानंदानी, सुप्रीम बिजनेस पार्कमधून एका व्यक्तीच्या लॅपटॉप बॅगसह, ५० हजाराची रोकड पळवून नेणाऱ्या फूड डिलिवरी बॉयला पवई पोलिसांनी पार्कसाईट येथून बेड्या ठोकल्या आहेत. नावेद तारिक शेख (२२) असे अटक करण्यात आलेल्या फूड डिलिवरी बॉयचे नाव आहे. मित्राच्या आयडीवर हा तरुण डिलिवरी करण्यासाठी आला होता. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत केली आहे. राघवेंद्र दुबे हे […]
सराईत मोटारसायकल चोराला अटक, ४ एक्टिवा हस्तगत
पवई परिसरातून फक्त एक्टिवा मोटारसायकली चोरी करणाऱ्या सराईत मोटारसायकल चोराला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून पवई पोलिसांनी ४ एक्टिवा मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत. नसीर सद्दान खान (५४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. यापूर्वीही २०१५ साली त्याला पवई पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून ३२ एक्टिवा आणि ४ कार हस्तगत करत मुंबईतील सर्वांत मोठ्या वाहन […]
हिरानंदानीत कुत्रीसोबत अत्याचार करणाऱ्या दुकान कामगाराला अटक
पवईतील हिरानंदानी भागात असणाऱ्या गलेरिया मॉलमध्ये भटकी कुत्री नुरी हिच्यासोबत अत्याचार करून, तिच्या गुप्तांगात लाकडी पट्टी घालून अत्याचार करणाऱ्या आरोपीला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शंबूनाथ ओटोकांथो प्रधान (३६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो याच मॉलमधील एका मिठाईच्या दुकानात काम करतो. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी त्या भागातील डझनभर सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज […]