पवईतील माता रमाबाई आंबेडकर नगर येथील रोडच्या समस्येंशी कित्येक वर्ष लढणाऱ्या स्थानिक रहिवाशांच्या हाकेला एकही लोकप्रतिनिधी येत नसल्याचे पाहत, पवईचे जनतेचे राजे, माजी नगरसेवक चंदन शर्मा स्वतः पुढे सरसावले आहेत. या परिसरातील रोडच्या सिमेंटीकरणाचे काम स्वखर्चातून करून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेत, रविवारी या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केला. यावेळी शर्मा यांच्यासह राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस, युवा नेते […]
Tag Archives | bad road
संघर्षनगरकरांचा संघर्ष संपणार, नागरी सुविधांसाठी पालिकेकडून ८० कोटीची मंजूरी?
पाठीमागील १२ वर्षापासून नागरी सुविधांपासून वंचित असणाऱ्या चांदिवली येथील संघर्षनगरकरांना आता दिलासा मिळणार असल्याचे दिसत आहे. मंगळवारी स्थानिक नगरसेविका, शिवसेना पदाधिकारी, मुंबई महापौर आणि पालिका आयुक्त यांच्यात झालेल्या संयुक्त चर्चेत या परिसरातील नागरी सुविधांसाठी पालिकेतर्फे ८० कोटीचा फंड मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आमदार ऍड अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली महापौर प्रि. विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडे […]
जेव्हीएलआरवरील खड्यामुळे अपघात घडून मोटारसायकल चालक जखमी
जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर खड्यात अडकून एक मुंबईकर गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी पवई परिसरात घडली. प्रसाद मेस्त्री असे जखमी मुंबईकराचे नाव असून, त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रशासनाकडे आपली ही व्यथा मांडली आहे. या संदर्भात महानगरपालिका एस विभागाने उत्तर देताना आम्ही संबंधित विभागाला आपली तक्रार देवू असे उत्तर दिले. पावसाळा आणि रोडवरील खड्डे हे गणित मुंबईकरांना काही […]
संघर्षनगरच्या रस्त्यावरून भाजपा आक्रमक; विकासकाच्या कार्यालयावर हल्लाबोल
चांदिवली संघर्षनगर भागात विकासक, पालिका, स्थानिक प्रतिनिधी सर्वांनीच दुर्लक्ष केल्यामुळे अजूनही येथील नागरिक मुलभूत सुविधांपासून वंचित राहिलेले आहेत. याबाबत सतत पाठपुरावा करूनही काहीच परिणाम जाणवत नसल्यामुळे शुक्रवारी स्थानिक भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विकासक सुमेर कॉर्पोरेशनच्या कार्यालयावर हल्लाबोल करत धरणे दिले. बोरीवली राष्ट्रीय उद्यान आणि आसपासच्या परिसरात असणाऱ्या राहणाऱ्या हजारो परिवारांना दहा वर्षापूर्वी झोपडपट्टी पुनर्वसन योजने […]