माता रमाबाई आंबेडकर नगरच्या मदतीला ‘जनता राजा’ आला धावून

पवईतील माता रमाबाई आंबेडकर नगर येथील रोडच्या समस्येंशी कित्येक वर्ष लढणाऱ्या स्थानिक रहिवाशांच्या हाकेला एकही लोकप्रतिनिधी येत नसल्याचे पाहत, पवईचे जनतेचे राजे, माजी नगरसेवक चंदन शर्मा स्वतः पुढे सरसावले आहेत. या परिसरातील रोडच्या सिमेंटीकरणाचे काम स्वखर्चातून करून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेत, रविवारी या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केला.

यावेळी शर्मा यांच्यासह राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस, युवा नेते कैलाश कुशेर, विश्व हिंदू परिषद बजरंगदल अध्यक्ष (पवई प्रखंड) सजेश पिल्लाई, सुंदरम रोकडे, भारत सिंग आणि मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिक उपस्थित होते.

पवईतील चाळसदृश्य लोकवस्ती असणाऱ्या आयआयटी भागातील माता रमाबाई आंबेडकर नगर परिसरातील सिंड्रेला इमारत ते गुलमोहर इमारत भागात असणारा रस्ता हा जवळपास पाठीमागील अनेक वर्षापासून वाईट, नादुरुस्त अवस्थेत आहे. “यासंदर्भात आम्ही लोकप्रतिनिधी आणि पालिका प्रशासन दोन्हीकडे पाठपुरावा करत होतो. मात्र प्रत्येकवेळी खाजगी रस्ता आहे, फंड नाही अशी विविध कारणे देवून टाळाटाळ केली जात होती.” असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “पाठीमागील नगरसेवकांच्या काळात पवईतील काही रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्यात आले होते. त्यावेळी देखील आम्ही आमचा रस्ता कधी करणार? असे विचारले असता, त्यांनी देखील खाजगी रस्ता आहे, ड्रेनेज लाईनची मंजुरी पालिकेने दिलेली नाही अशी कारणे दिली होती.” यासंदर्भात आवर्तन पवईने माजी नामनिर्देशित नगरसेवक यांना फोन लावला असता त्यांनी फोन उचलला नाही.

“ट्रिनीटी, सिंड्रेला, गुलमोहर या इमारतीमधील लोकांसह माता रमाबाई आंबेडकर नगर परिसरातील अनेक माता भगिनी ही या रस्त्याच्या दुरावस्थेची तक्रार घेवून माझ्याकडे आले होते. कोणीच त्यांच्या या समस्येला गांभीर्याने घेत नसून, मी स्वतः पुढाकार घेवून हे काम करावे अशी त्यांनी माझ्याकडे मागणी केली होती. अखेर नागरिकांच्या सोयीसाठी मी स्वखर्चाने येथील रस्त्याच्या सिमेंटीकरणाचे काम सुरु केले आहे,” असे यावेळी आवर्तन पवईशी बोलताना चंदन शर्मा यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आम्ही ना हरकत प्रमाणपत्र दिले नसल्याचे खोटे सांगून नागरिकांची दिशाभूल करत होते. प्रत्यक्षात आम्ही ना हरकत प्रमाणपत्र हे आधीच दिलेले आहे. जर ते दिलेले नसते तर याच परिसरात विजेचे खांब आणि शिवर लाईन टाकण्याचे काम मग कसे करण्यात आले?”

शर्मा यांनी उचललेल्या या पाउलाचे स्थानिक जनतेकडून कौतूक होत असून, अखेर आमचा ‘जनतेचा राजा’च आमच्या मदतीला धावून आल्याचे अनेक नागरिकांचे म्हणणे आहे.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!