पवईतील ३१ वर्षीय महिला व्यावसायिकेला २.५ दशलक्ष पौंड देण्याचे आमिष दाखवत एका अज्ञात व्यक्तीने ४५.६९ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सायबर चोराने इमेल द्वारे आपण यूकेचा नागरिक असल्याची बतावणी करून, तिला भारतात २.५ दशलक्ष पौंड देणगी द्यावयाची आहे, जेणेकरुन ती भारतात चॅरिटीचे काम करू शकेल असे सांगत तिची फसवणूक केली […]
