ऑनलाईन फसवणूकीत एका ज्येष्ठ नागरिकाने गमावलेले ७४,५०० रुपये काही तासातच साकीनाका पोलिसांनी कारवाई करत परत मिळवून दिले आहेत. घर भाड्याने घेण्याच्या बहाण्याने रिअल इस्टेट ब्रोकरच्या माध्यमातून कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधून, लष्करात अधिकारी असल्याचे सांगत महिलेने ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक केली होती. पोलिसांच्या या कारवाईची प्रशंसा करताना ज्येष्ठ नागरिक यांनी मुंबई पोलिस दलाची स्कॉटलंड यार्डशी तुलना केली आहे. […]
Tag Archives | cyber fraudster
बँक खात्यात नॉमिनी नोंद करून देण्याच्या बहाण्याने फसवणूक
साकीनाका येथील एका २३ वर्षीय महिलेला तिच्या बहिणीच्या बँक खात्यात नॉमिनी नोंद करून देण्याच्या बहाण्याने एका सायबर चोरट्याने १.८८ लाखाची फसवणूक केली आहे. फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने तो बँकेचा प्रतिनिधी असल्याचा दावा केल्याने महिलेचा विश्वास बसल्याचा फायदा घेत सायबर चोरांनी तिच्या खात्यातून पैसे काढले. काही दिवसांपूर्वी तक्रारदार महिलेच्या १८ वर्षाच्या बहिणीला अमित मिश्रा नामक एका व्यक्तीचा […]
आयआयटीच्या प्राध्यापकांची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
प्राध्यापकाच्या मित्राचा मेल हॅक करून त्याच्या आधारे कोविड-१९ आजाराच्या उपचारासाठी पैशांची मागणी करत आयआयटी मुंबईच्या एका प्राध्यापकाची २ लाखाची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच पवईत समोर आला आहे. या संदर्भात माहिती तंत्रद्यान कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करून पवई पोलीस तपास करत आहेत. लॉकडाऊनमध्ये संपूर्ण देश अडकून पडलेला असताना, या सगळ्यांचा ऑनलाईन चोरट्यांनी फायदा उचलला […]
ऑनलाईन डेटिंग फसवणूकीत चार्टर्ड अकाऊटंटला ३.३ लाखाचा गंडा; एकाला अटक
पवई पोलिसांनी पवई येथील ५४ वर्षीय चार्टर्ड अकाऊटंटला साथीदार मिळवून देण्याच्या बहाण्याखा ली ३.३ लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी एकाला वेस्ट बेंगाल येथून अटक केली आहे. अर्णब सिंग उर्फ नील रॉय बनमाळी (वय २६) हा कोलकाता येथील हावडा येथील रहिवाशी असून, त्याला शनिवारी अटक करण्यात आली. पवई पोलिस त्याच्या इतर दोन साथीदारांचा शोध घेत आहेत. दोनदा […]