The construction of the Police Beat Chowky outside the Heritage Garden on Cliff Avenue Road in Hiranandani, Powai has been completed and will be inaugurated on Friday, September 29th at 7 pm. Deputy Commissioner of Police (Zone X) Datta Nalavde will be inaugurating this police post, which was made possible through the efforts of Chandivali […]
Tag Archives | heritage garden
हिरानंदानी पोलीस बीट-चौकीचे काम पूर्ण; शुक्रवारी होणार उद्घाटन
हिरानंदानी पवई येथील क्लिफ अव्हेन्यू मार्गावर हेरीटेज उद्यानाच्या बाहेर बनत असलेल्या बीट चौकीचे काम पूर्ण झाले आहे. शुक्रवार, २९ सप्टेंबरला संध्याकाळी ७ वाजता याचे उद्घाटन केले जाणार आहे. पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या हस्ते या चौकीचे उद्घाटन केले जाणार आहे. चांदिवली विधानसभा आमदार दिलीप लांडे यांच्या प्रयत्नातून ही बीट चौकी बनवण्यात आली आहे. हिरानंदानी परिसरात […]
हिरानंदानीत, हेरीटेज उद्यान परिसरात पोलीस पथक तैनात
हिरानंदानी, पवई परिसरात पाठीमागील आठवड्यात घडलेल्या दोन गंभीर घटनेनंतर हेरीटेज गार्डन, एवलोन परिसरात पुन्हा पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्तांच्या अखत्यारीतील विशेष पोलीस पथकाला या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. लवकरच या परिसरात नवीन बीट चौकी देखील बनवण्यात येणार असून, संपूर्ण पोलीस पथक येथे कार्यरत असणार आहे. पवईतील हिरानंदानी परिसरात महाविद्यालयीन मुलांचा रस्त्यांवर, खाण्याच्या […]
पवईत कारमधून लॅपटॉप, आयपॅड चोरी
पार्किंगमध्ये पार्क केलेल्या कारची काच फोडून लॅपटॉप आणि आयपॅड चोरीस गेल्याची घटना काल पवईमध्ये घडली आहे. याबत पवई पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे पार्किंगमध्ये गाड्या लावणाऱ्या मालक व चालकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे. या बाबत मिळालेल्या माहितीनुसार हेमंतकुमार तरवरे हे शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता पवईत कामानिमित्त आले होते. कामाच्या […]
अजून एक दिशाहिन बंदुकीची गोळी हिरानंदानीत
दिशाहीन बंदुकीच्या गोळीने टोरीनो इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला आपले शिकार बनवण्याच्या घटनेला एक आठवडाही उलटला नसेल कि, अजून एक अशीच दिशाहीन गोळी हिरानंदानीतील एवलॉन इमारतीत २६व्या मजल्यावरील घरातील बाथरूममध्ये पोहचली. याबाबत पवई पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र बैलेस्टिक तज्ञांनी पाहणी करून, मिळालेली गोळी ही जवळच्या अंतरावरून आल्याचे […]
हिरानंदानीत सुरक्षा रक्षक दिशाहिन बंदुकीच्या गोळीचा शिकार
घाटकोपर पोलीस प्रशिक्षण केंद्रातून दिशाहिन झालेल्या बंदुकीच्या गोळीने मंगळवारी हिरानंदानी येथील टोरिनो इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या प्रकाश दास (२८) यास आपले टार्गेट बनवले. सुरक्षा रक्षकाच्या मानेत घुसलेली गोळी पवई हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करून काढण्यात आली असून, तो आता पूर्णपणे बरा असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत पवई पोलिसांनी गोळी चाचणीसाठी पाठवून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला […]
पर्यावरण रक्षणासाठी पवईकर सायकलवर
पर्यावरण रक्षणासाठी यंग इन्वायरमेंटलिस्ट ट्रस्टच्या वतीने रविवारी हिरानंदानी येथे आयोजित सायक्लोथॉनमध्ये अबाल वृद्धांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. मुंबईचे डब्बेवाले, सायकलवर कर्तब करणारे, शालेय विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, महिला आणि विविध संस्थांच्या मुलांनी या उपक्रमात सहभाग नोंदवत प्रदूषण आणि वाहन विरहीत रविवारचा आनंद लुटला. त्यावेळी टिपलेली काही छायाचित्रे.
पवई सायक्लोथॉनमध्ये मुंबईचे डब्बेवाले
ऊन, वारा, पाऊस काहीही असो सायकलवरून प्रवास करत वेळेच्या आत चाकरमान्यांना त्यांचा डब्बा पोहचवणारे आणि जगात मँनेजमेंट गुरु म्हणून स्थान असणारे मुंबईचे डब्बेवाले, पर्यावरण संरक्षणाच्या मुद्यावर पुढे सरसावत रविवारी १३ डिसेंबरला (उद्या) होणाऱ्या पवईच्या पहिल्या वहिल्या सायक्लोथॉनमध्ये विद्यार्थी, सायकल प्रेमी, मान्यवर, ज्येष्ठ नागरिकांसोबत शामिल होणार आहेत. हिरानंदानीच्या डोंगर, हिरवळीतून बनलेल्या रस्त्यातून आपल्या सायकलवर हे डब्बेवाले […]
१३ डिसेंबरला पवईत सायक्लोथॉनचे आयोजन
मुलांना शाळेत, महाविद्यालयात जाताना सायकलचा वापर करण्यासाठी यंग इन्वायरमेंटलिस्टचे आवाहन वाहनाच्या बाहेर पडणाऱ्या धुरातून वातावरणात मोठ्या प्रमाणात कार्बन पसरल्याने वायूप्रदूषणात कमालीची वाढ झाली आहे. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्याबरोबरच एक उत्तम आरोग्य मिळावे म्हणून पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी काम करणाऱ्या यंग इन्वायरमेंटलिस्ट ट्रुस्टच्या वतीने लोकांनी सायकल संस्कृती जपावी म्हणून सायक्लोथॉनचे आयोजन केले आहे. १३ डिसेंबरला हिरानंदानीमधील हेरीटेज […]