आयआयटी मुंबईच्या पवई कॅम्पसमध्ये शिकणाऱ्या एक विद्यार्थिनीला ऑनलाईन पिझ्झा मागवणे चांगलेच महागात पडले आहे. खराब डिलीव्हर झालेल्या पिझ्झाच्या भरपाई रकमेला मिळवण्याच्या नादात सायबर चोरांच्या जाळ्यात अडकून तिला आपल्याच खात्यातील २७ हजार रुपये गमवावे लागले आहेत. पवई पोलीस याचा अधिक तपास करत आहेत. यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयआयटी पवई कॅम्पसमध्ये शिकणाऱ्या सीचा वाजपेयी हिने ऑनलाईन फूड […]
