Tag Archives | Jogeshwari-Vikhroli Link Road

आयआयटी येथील जेव्हीएलआरवरील मारुती मंदिर अखेर हटणार, भक्तांचा आंदोलनाचा इशारा

गेली अनेक वर्षे मारुती मंदिर वाचवण्यासाठी भक्तांची चालू असलेली धडपड अखेर संपुष्टात आली आहे. लवकरच पवईमधील आयआयटीजवळ जेव्हीएलआरवर असणारे मारुती मंदिर हे हटवून बाजूलाच असणाऱ्या राम मंदिरात येथील मूर्ती स्थापित करण्यात येणार आहे. ५ डिसेंबर रोजी न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार मंदिर मालक परांजपे यांनी याला संमती दर्शवली असून, विशेष […]

Continue Reading 0

भरधाव ट्रेलर मारूती मंदीरात घुसला, मोठे नुकसान

जोगेश्वरी – विक्रोळी लिंकरोडवर भरधाव वेगात धावणारा एक ट्रेलर आयआयटी पवई येथील मारुती मंदिरामध्ये घुसल्याची घटना (आज) रविवारी रात्री ३.३० वाजता घडली. या घटनेत मंदिराचा मंडपासह परिसरात असणारे एक जुने झाड आणि मूळ गाभाऱ्याची उजव्या बाजूची भिंत पडून मोठे नुकसान झाले आहे. ट्रेलर चालक जमादार मोहम्मद अली (४०) याला पवई पोलिसांनी अटक केली आहे. घटना […]

Continue Reading 0

पवईत धावत्या बसने एकाला चिरडले

बस थांब्यावर बसची वाट बघत उभ्या असणाऱ्यापैकी एकाला चिरडून बस निघून गेल्याची घटना सोमवारी सकाळी पवईतील रामबाग येथे घडली. याबाबत पवई पोलिसांनी गुन्हा नोंद करून सदर बसचा तपास सुरु केला आहे. चांदिवली येथील संघर्षनगर परिसरात राहणारे शुभम शंकर वाघ (२९) हे सकाळी अंधेरी सिप्झ येथे आपल्या कामाच्या ठिकाणी निघाले होते. तिकडे जाण्यासाठी बस पकडण्यासाठी सकाळी […]

Continue Reading 0

एका ट्वीटने दोन तासात हटवला एनटीपीसी सिग्नलला अडथळा बनणारा वाहतूक दर्शक फलक

नव्या पिढीच्या संभाषणाचे माध्यम असणाऱ्या सोशल मिडियामुळे अनेक कामे झटपट होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. असेच गेली अनेक महिने एनटीपीसी सिग्नल समोर लावण्यात आलेल्या वाहतूक फलकामुळे सिग्नल दिसण्यासाठी प्रवाशांना होणारी अडचण एक बँक कर्मचाऱ्याने मुंबई पोलिसांच्या @mumbaipolice ट्वीटरवर टाकताच दोन तासातच अडचण करणारा वाहतुकीचा फलक हटवण्यात आला आहे. घाटकोपर येथील रहिवाशी व बँक कर्मचारी असणारे […]

Continue Reading 0
road work

खड्डेमय पवईची वाहतूक पोलिसांकडून डागडुजी

@ रविराज शिंदे जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडला वाहतूक कोंडीने ग्रासले असतानाच या मार्गावर असणाऱ्या खड्यांनी त्यात आणखी भर घातली होती. एमएमआरडीए, पालिका व स्थानिक प्रतिनिधी यांना तक्रारी जावून सुद्धा त्यांनी याकडे कानाडोळा केल्याने अखेर गुरुवारी पावसाच्या उघडीपीची संधी साधत साकीनाका वाहतूक पोलिसांनी या मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम केले. या कार्यातून त्यांनी स्थानिक प्रतिनिधी आणि प्रशासनाला […]

Continue Reading 0
toilet iit market

जेवीएलआर मार्गावरील पहिले शौचालय जनतेसाठी खुले

रविराज शिंदे जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर बनवण्यात येणाऱ्या चार शौचालयांपैकी, आयआयटी मार्केट येथे पहिले शौचालय बनवण्यात आले आहे. या शौचालयाचे उद्घाटन रविवारी स्थानिक नगरसेवक चंदन शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले असून, मंजुरीनंतर एक वर्षानंतर अखेर आता ते जनतेसाठी खुले करण्यात आले आहे. पुढील दोन महिन्यात उरलेल्या शौचालयांचे काम पूर्ण करून ती जनतेसाठी खुली केली जाणार आहेत. […]

Continue Reading 0
jvlr accident

डंपरच्या धडकेत दोन ठार, १ जखमी

भरधाव डंपरच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी दुपारी जोगेश्वरी- विक्रोळी लिंकरोडवर घडली आहे. डंपरचे ब्रेक निकामी झाल्याने दोन कार, एक रिक्षा, एक टॅक्सी, एक सिमेंट मिक्सचर सह मोटारसायकलला चिरडत डंपर मातीच्या ढिगाऱ्यात जावून थांबला. याप्रकरणी आरे पोलिसांनी निष्काळजीपणे गाडी चालवणे व मृत्यूस कारणीभूत ठरणे या कलमांतर्गत गुन्हा नोंद करुन डम्परचालक रविंदर सिंग […]

Continue Reading 0
iit bus stop issue

आयआयटीचे बस स्टॉप हलवले, पण नक्की कोणासाठी? – संतप्त नागरिक

जोगेश्वरी – विक्रोळी लिंक रोडवरील आयआयटी मेनगेट येथील जोगेश्वरीच्या दिशेने जाणारा बेस्ट बस स्टॉप वाहतुकीला अडथळा आणत असल्याने, १ तारखेपासून आयआयटी मेनगेट पादचारी पुलाजवळ हलवण्यात आला आहे. बस स्टॉपला हलवले गेल्याने येथील स्थानिकांना रहदारीतून रस्ता काढत लांब बस स्टॉपवर जावे लागत आहे. यामुळे हा बस स्टॉप नक्की नागरिकांच्या सेवेसाठी हलवला आहे? की व्यावसायिकाला होणाऱ्या अडचणीला […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!