हिरानंदानी रुग्णालयातून उध्वस्त करण्यात आलेल्या किडनी रॅकेटसाठी खोटी कागदपत्रे बनवून देणाऱ्या व्यक्तीचा सुरु असलेला पवई पोलिसांचा शोध अखेर संपला आहे. पोलिसांसोबत लपाछपीचा डाव खेळत असणाऱ्या सईद अहमद खान (६७) याला पवई पोलिसांनी या गुन्ह्यात अटक केली आहे. खानने किडनी रॅकेटचा मुख्य सूत्रधार भेजेंद्र भिसेन याला सर्व खोटी कागदपत्रे पुरवल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. शनिवारी […]
Tag Archives | KIDNEY SCAM
किडनी रॅकेट: अटक डॉक्टरांना २६ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी
किडनी रॅकेटमध्ये सहभाग असल्याच्या आरोपात अटक करण्यात आलेल्या हिरानंदानी रुग्णालयाच्या पाचही डॉक्टरांना शुक्रवारी २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. यात रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, वैद्यकीय संचालक व तीन डॉक्टरांचा समावेश आहे. जुलै महिन्यात हिरानंदानी रुग्णालयात बोगस किडनी रॅकेट उघडकीस आले होते. मुख्य सूत्रधार भैजेन्द्र भिसेनसह विविध ९ आरोपींना पवई पोलिसांनी यामध्ये अटक केली होती. […]
किडनी रॅकेट: अटक केलेल्या पाचही डॉक्टरांना १३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
आरोग्य संचालनालयाच्या अहवालाच्या आधारे व अवयव प्रत्यारोपण समन्वयकाच्या जवाबाच्या आधारावर डॉक्टरांना अटक हिरानंदानी रुग्णालयातील किडनी रॅकेटमध्ये सहभाग असल्याच्या आरोपात अटक करण्यात आलेल्या पाचही डॉक्टरांना १३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आरोग्य संचालनालयाच्या अहवालाच्या आधारे व अवयव प्रत्यारोपण समन्वयकाच्या जवाबाच्या आधारावर डॉक्टरांना अटक करण्यात आल्याचे समोर येत आहे. अटक केलेल्या पाच डॉक्टरांपैकी एक जण रुग्णालयाचा […]
पवई किडनी रॅकेट: हिरानंदानी हॉस्पिटलच्या सीईओसह पाच डॉक्टरांना अटक
पवईतील हिरानंदानी रुग्णालयात चालणारे किडनी रॅकेट गेल्या महिन्यात उघडकीस आले आहे. ज्यात ९ लोकांना अटक करण्यात आली होती. याचाच तपास करणाऱ्या पवई पोलिसांनी हिरानंदानी रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासह पाच डॉक्टरांना मंगळवारी रात्री अटक केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुजित चटर्जी, वैद्यकीय संचालक डॉ अनुराग नाईक, डॉ मुकेश शेटे, डॉ मुकेश शहा, व डॉ प्रकाश […]