दरवर्षी मोठ्या प्रमाणात कोसळणाऱ्या पावसात मुंबईत डोंगराळ भागात दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. यावर्षी देखील मुसळधार पावसात दरड कोसळण्याचा धोका आणि पाण्याच्या लोंढ्यामुळे झोपड्यात पाणी शिरून वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारी म्हणून पालिका ‘एस’ विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या पवई, भांडूप, विक्रोळीतील डोंगराळ भागातील चाळसदृश्य घरात राहणाऱ्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन पालिका […]
Tag Archives | land slide
पवई कैलासनगर भागात दरड कोसळली
मंगळवारी मुंबईसह उपनगरात झालेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे पवई कैलासनगर भागात दरड कोसळण्याची घटना घडली. मंगळवार दुपारच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने नागरिकांची कसलीही हानी झाली नाही. दरड कोसळल्याने मोठे दगड रस्त्यात आल्याने रस्ता बंद झाला होता. शिवसेना माजी नगरसेविका सौ चंद्रावती मोरे यांना कळताच त्यांनी पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधून जेसीबी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने रस्ता साफ […]
पवईतील सुरक्षा भिंतीची आमदार, नगरसेवक यांच्याकडून पाहणी
मुंबईतील सततच्या पावसामुळे पवईतील मोरारजीनगर, रमाबाई आंबेडकर ग्रुप नं २, शिवनेरी हिल, देवीनगर, गरीबनगर, इंदिरानगर, गौतमनगर, हरीओमनगर लोकवस्तीला जाणाऱ्या मार्गावर असणारी सुरक्षा भिंतीचा भाग गुरुवार, १६ जुलैला पडल्याची घटना घडली होती. यानंतर स्थानिक आमदार आणि नामनिर्देशित नगरसेवक यांनी परिस्थितीची पाहणी करत यंत्रणांना त्वरित कारवाईचे आदेश दिले आहेत. मुंबईत आठवड्याच्या मध्यंतरापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. […]
संघर्षनगरकरांचा संघर्ष संपणार, नागरी सुविधांसाठी पालिकेकडून ८० कोटीची मंजूरी?
पाठीमागील १२ वर्षापासून नागरी सुविधांपासून वंचित असणाऱ्या चांदिवली येथील संघर्षनगरकरांना आता दिलासा मिळणार असल्याचे दिसत आहे. मंगळवारी स्थानिक नगरसेविका, शिवसेना पदाधिकारी, मुंबई महापौर आणि पालिका आयुक्त यांच्यात झालेल्या संयुक्त चर्चेत या परिसरातील नागरी सुविधांसाठी पालिकेतर्फे ८० कोटीचा फंड मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आमदार ऍड अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली महापौर प्रि. विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडे […]
अस्मानी संकट; पवई, चांदिवली भागात दिवसभरात काय घडले?
उशिराने एन्ट्री घेतलेल्या पावसाने गेल्या चार दिवसांपासून मुंबईकरांची चांगलीच धुलाई केली आहे. पावसाने रौद्ररुप धारण केल्याने मुंबईवर अस्मानी संकट कोसळले असून, अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे दाणादाण उडाली आहे. मुसळधार पावसामुळे साकीनाका, चांदीवली, आयआयटी पवई परिसरातील अनेक घरात पाणी भरल्याने स्थानिकांच्या घरातील किंमती वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले आहे. मुंबईत गेल्या चार दिवसांत झालेल्या पावसाने जून महिन्यातील […]