Tag Archives | mumbai

ganesh visarjan incident

पवई तलावात विसर्जना वेळी मुर्ती पडून दोन तरुण जखमी

काल अकराव्या दिवशी पवई तलावावर विसर्जन सुरु असताना क्रेनवरील मूर्तीचा तोल बिघडून पडल्यामुळे दोन तरुण जखमी झाल्याची घटना पवईत घडली. सागर चांडालीया (३२) आणि रफिक शेख (२९) अशी जखमी तरुणांची नावे आहेत. दोन्ही तरुणांवर राजावाडी येथे उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल अकरा दिवसाच्या गणपतींचे विसर्जन पवई तलावावरील […]

Continue Reading 0
56th Convocation of IIT Bombay 1 (2)

स्टार्टअपची क्रांती देशात झाली त्याचा स्त्रोत आयआयटी आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

स्टार्टअपची क्रांती ज्या वेगाने देशात झाली त्याचा स्त्रोत आयआयटी आहेत. आज जग आयआयटींना युनिकॉर्न स्टार्टअप्सची नर्सरी म्हणून ओळखत आहे. तंत्रज्ञानाचा आरसा असलेल्या या संस्थांमधून जगाचे भविष्य आपल्याला दिसत आहे, असे गौरव उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. शनिवारी आयआयटी मुंबईच्या पवई येथील कॅम्पसमध्ये कॉन्वोकेशन हॉलमध्ये पार पडलेल्या आयआयटी मुंबईच्या ५६ व्या वार्षिक दीक्षांत समारंभात ते […]

Continue Reading 0
container truck collided

पवईत पावसाने दाणादाण

झाडे पडली, कंटेनर घसरून अडकून पडल्याने वाहतूक कोंडी, इमारतीत पाणी घुसले, नाले भरून वाहू लागले @प्रमोद चव्हाण मुंबईत शुक्रवारी रात्री पासूनच पावसाचे जोरदार आगमन झाले. शनिवार दिवसभर थोड्या थोड्या कालावधीत बरसत राहिल्याने मुंबापुरी तुंबल्याची चित्रे पहायला मिळत होती. पवई सुद्धा यातून वाचली नाही. पावसाच्या पहिल्या तडाख्यात पवईत अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. कंटेनर घसरून […]

Continue Reading 0
8-lane road

पवईतून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आठ पदरी मार्ग

गोरेगाव – मुलूंड जोडरस्त्याचे काम वायू गतीने सुरु असतानाच पालिकेच्या प्रस्तावित विकास आराखडय़ातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून कान्हेरी गुंफांजवळून नाहूरपर्यंत १२० फूट रुंदीचा (आठ पदरी) रस्ता राज्य सरकारने मंजूर केला आहे. बोरीवलीपासून सुरु होणारा हा मार्ग पवईमार्गे नाहूरपर्यंत जाणार आहे. बोरीवलीतील जय महाराष्ट्रनगरपासून नाहूपर्यंत आठ पदरी महामार्ग महानगरपालिकेने विकास आराखडय़ात प्रस्तावित केला होता. हा प्रस्तावित […]

Continue Reading 1
power cut

वीजवाहिनीला आग लागल्याने पवईमध्ये वीज पुरवठा खंडित

टाटा पॉवरच्या वीजकेंद्रातील वीजवाहिनीला आग लागल्याने बुधवारी सकाळी पवईसह पूर्व उपनगरातील विक्रोळी, विद्याविहार आणि घाटकोपर परिसरातील वीजपुरवठा काही काळासाठी खंडित झाला होता. जवळपास दोन तासाने सव्वाअकरा वाजता वीजपुरवठा पूर्ववत झाला. भर उन्हाळ्यात बत्तीगूल झाल्याने उन्हाच्या पहाऱ्यात उकाड्याने येथील नागरिक घामाघूम झाले होते. टाटा पॉवरने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी साळसेत येथील वीजकेंद्रातील वीजवाहिनीला शोर्टसर्किटमुळे आग लागल्यामुळे […]

Continue Reading 0
1

तहानलेल्या प्रवाशांना मोफत पाणी वाटप

@रविराज शिंदे एप्रिल महिन्याच्या सुरवातीपासूनच मुंबईच्या तापमानाच्या पाऱ्याने अनेकदा ४० अंशाचा आकडा ओलांडला आहे. वाढत्या पारयामुळे घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना हैराण करून सोडले आहे. कडक उन्हामुळे शरीरातील पाण्याची मात्रा कमी झाल्यावर रस्त्यावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे अनेकांना याचा खूप त्रास होत आहे. चक्कर येणे किंवा थकवा जाणवण्याचे प्रकार सुद्धा घडत आहेत. त्यातच पवईतील अनेक बस स्थानकांवर […]

Continue Reading 0

फुलेनगरमध्ये शौचालय दुरुस्तीत दिरंगाई; तरुणास सर्पदंश

@अविनाश हजारे पवईच्या राष्ट्रपिता महात्मा फुलेनगर वसाहतीमधील मुख्य शौचालय बांधणीस मुंबई महानगरपालिका ‘एस’ विभागाकडून होत असलेली दिरंगाई आणि या भागातील लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे या विभागातील एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. वैभव भगत असे या तरुणाचे नाव असून, परिसरात शौचालय उपलब्ध नसल्यामुळे त्याच्या अन्य एका मित्रासोबत तो बाजूच्या जंगलात शौचास गेला असताना विषारी सापाने त्याला दंश केल्याची […]

Continue Reading 0
shivsena durgadevi sharma garden

आयआयटी, पवई येथील दुर्गादेवी शर्मा उद्यानातील झाडांच्या कत्तली विरोधात शिवसेनेचे श्रद्धांजली आंदोलन

पवई, आयआयटी येथील दुर्गादेवी शर्मा उद्यानात शिवसेनेच्या आमदार फंडातून सुरु असलेल्या कामाच्यावेळी लावलेली रोपटी स्थानिक नगरसेवकांच्या दबावाखाली पालिका ‘एस’ उद्यान विभागाने उपटून टाकून त्यांची हत्या केल्याचा आरोप करत शिवसेनच्यावतीने आज पवईमध्ये श्रद्धांजली आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी दुर्गादेवी शर्मा उद्यानात जमा होत उद्यानात काढून फेकलेल्या आणि सुकलेल्या रोपट्यावर सफेद कपडा टाकून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. […]

Continue Reading 0
vehicle theft

स्वस्तात गाडी मिळवून देण्याच्या बहाण्याने ठगणाऱ्या भामट्याला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

बँकेने जप्त केलेल्या गाडय़ा कमी किमतीत मिळवून देतो सांगून मुंबईकरांना लाखो रुपयांना ठगणाऱ्या भामटय़ाला पवई पोलिसांनी अटक केली आहे. सुनील किशनचंद जगतीयानी उर्फ मनीष लालवाणी (४१) असे अटक आरोपीचे नाव आहे. सुनीलने मुंबई, ठाणेसह पुणे, दिल्ली आणि हरियाणा भागात अनेकांची फसवणूक केली असून, त्याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यांत गुन्ह्यांची नोंद आहे. हप्ते न-भरल्याने बँकेने जप्त […]

Continue Reading 0
car theft powai police recovred car

वाहन चोरीच्या गुन्ह्यात फुलेनगरमधून एकाला अटक

@प्रमोद चव्हाण पवई आणि आसपासच्या परिसरातून चार चाकी वाहने चोरी करणाऱ्या चोरट्याला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. किशोर वानखेडे (बदलेले नाव) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. त्याचा टूअर्स अंड ट्राव्हल्सचा व्यवसाय असून, त्यासाठी तो या चोरीच्या गाड्या वापरत होता. आतापर्यंत पवई पोलिसांनी त्याच्याकडून इनोव्हा, सुमो आणि स्विफ्ट डीजायर अशा गाड्या हस्तगत केल्या आहेत. […]

Continue Reading 0
football

चांदिवली येथे रिंक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन

@ सुषमा चव्हाण चांदिवली येथे रिंक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ५, ६ व ७ जानेवारीला चांदिवली म्हाडा येथील मैदानात ही स्पर्धा होणार आहे. अंध मुलांच्यात होणारी फुटबॉल सामना हे या स्पर्धेचे आकर्षण असणार आहे. मुंबईसह महाराष्ट्रात फुटबॉल या खेळाला चालना मिळावी यासाठी नियमित प्रयत्नशील असणारे शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांच्या प्रेरणेतून, शिवसेनेच्या नगरसेविका […]

Continue Reading 0
sofiya

सोफियाला भावली भारतीय संस्कृती; आयआयटी टेकफेस्टमध्ये दिली विद्यार्थ्यांच्या प्रश्नाची उत्तरे

@रविराज शिंदे, सुषमा चव्हाण सौदी अरेबियाचे नागरिकत्व प्राप्त झालेल्या “सोफिया रोबोट”ने काल (शनिवारी) आयआयटी पवईमध्ये सुरु असणाऱ्या टेकफेस्टमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला. नारंगी – पांढरी साडी नेसलेल्या सोफियाने यावेळी त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. आपल्या भाषणाची सुरुवात करतानाच नमस्ते इंडिया! मी सोफिया! अशी सुरुवात करत तिने उपस्थितांची मने जिंकली. आशिया खंडातील सर्वात मोठा असा विद्यान – […]

Continue Reading 0
छायाचित्र: दैनिक भास्कर

बिहटा हत्या प्रकरणातील “महाकाल” गॅंगच्या दोघा म्होरक्यांना पवईमध्ये अटक

पटना बिहटा येथील चित्रपटगृह मालक निर्भय सिंघ यांची गोळ्या घालून हत्या करून फरार झालेल्या “महाकाल” गॅंगच्या दोघा म्होरक्यांना आज (शनिवारी) पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तुंगा येथून अटक करून पटना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. बिहाट, पटना येथील नामांकित व्यक्तिमत्व आणि येथील उदय चित्रमंदिर सिनेमा हॉलचे मालक निर्भय सिंघ यांची चित्रपटगृहाच्या समोर मोटारसायकलवरून आलेल्या काही अज्ञात […]

Continue Reading 0

वीजबिल भरणा केंद्र बंद केल्याच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन, सह्यांची मोहीम

आयआयटी येथील रिलायन्स एनर्जींचे एकमेव वीजबिल भरणा केंद्र कंपनीने अचानक बंद करण्याचा निर्णय घेतल्याने येथील स्थानिक नागरिकांची फार मोठ्या प्रमाणावर गैरसोय होऊन लोक त्रस्त झाले होते. या त्रासाबद्दल लक्षात येताच शिवसेनेतर्फे वीजबिल भरणा केंद्र पुन्हा सुरू करण्यासाठी सह्यांची मोहीम घेत हे केंद्र पुन्हा सुरु करण्यात यावे म्हणून गुरुवारी केंद्राच्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

पवईतील ज्वेलरचे अपहरण करणाऱ्या ७ जणांना क्राईम ब्रांचने ठोकल्या बेड्या

पवईतील ज्वेलर जितेश परमार व दुकानातील कामगार प्रकाश सिंग यांचे मिलिंदनगर येथून अपहरण करून त्यांना मारहाण करून १.८० लाखाची लुट करून ठाण्यात सोडून पसार झालेल्या ७ अपहरणकर्त्यांना अखेर काल क्राईम ब्रांच युनिट ११ ने अटक केली आहे. अन्वर सय्यद (२६), युनुस सय्यद उर्फ शेरू (२१), रेहान शेख (३६), निझाम मकरानी (२०), समीर शेख (२८), तबरेज […]

Continue Reading 0

शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी कम्युनिस्ट पक्षाचे पवईत सरकार विरोधात निदर्शने

– अविनाश हजारे – ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर सरकारविरोधी वणवा पेटला असतानाच, त्याची ठिणगी शहरी भागातही येऊन पोहोचली आहे. ठिकठिकाणी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अनेक संस्था, संघटना पुढे येत आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, डीवायएफआय व अन्य समविचारी संघटनेंच्यावतीने बुधवारी ७ जूनला पवईमध्ये सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी इतिहासात पाहिल्यांदाच शेतकऱ्यांनी संपाचे हत्यार उपसत […]

Continue Reading 0

पोलिस भरतीमध्ये उमेदवाराने उंची वाढवण्यासाठी केसांत लपवली कॅरमची सोंगटी

पोल‌िस भरतीमध्ये डमी उमेदवार उभे केलेल्या तरुणांना पवई पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना ताजी असतानाच, अजून एका उमेदवाराने चक्क च्युइंगमच्या सहाय्याने काळी सोंगटी चिकटवून उंची वाढविण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. गेल्या आठवड्यात मरोळ येथे पोलिस मैदानावर भरती दरम्यान हा प्रकार उघडकीस आला. याबाबत पवई पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंद करत उमेदवाराला अटक केली आहे. मुंबईत होणाऱ्या […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!