पवईकर आणि माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव खटल्यात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (आयसीजे) आज निकाल सुनावला. ६.३० वाजता सुरु झालेल्या या निकालात भारताच्या बाजूने निकाल देण्यात आलेला आहे. १६ न्यायमूर्तींनी दिलेल्या या निकालात १५ विरुद्ध १ असा निर्णय भारताच्या पारड्यात पडला. केवळ पाकिस्तानच्या न्यायमूर्तींनी या विरोधात आपले एक मत नोंदवले. या निर्णयामुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला […]
Tag Archives | Navy officer
मानवी साखळीच्या माध्यमातून पवईकरांची कुलभूषण जाधवांच्या सुटकेची मागणी
माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने सुनाविलेल्या फाशीच्या शिक्षेनंतर देशभरातून सेलिब्रिटींजसह सर्वसामान्य नागरिक विविध माध्यमातून आपला निषेध व्यक्त करत आहेत. गुरुवारी सकाळी पवईकरांनी हिरानंदानी येथील सिल्वर ओक या त्यांच्या राहत्या घराच्या इमारतीबाहेर ‘मानवी साखळी’ करुन शासनाकडे जाधवांना परत आणण्याची मागणी केली. यात जाधव यांचा लॉन्ड्री बॉय विजय कनोजियाचा सुद्धा सहभाग होता. पवईकर व माजी […]
कथित गुप्तहेर कुलभूषण जाधव यांना पाकिस्तान लष्करी कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा
भारतीय गुप्तचर यंत्रणा रिसर्च अँड अॅनॅलिसिस विंग (रॉ)चे गुप्तचर असल्याचा दावा करत, कराची आणि बलुचिस्तानमध्ये घातपाताचा कट रचल्याच्या आरोपाखाली रावळपिंडीच्या लष्करी कोर्टाने सोमवारी पवईकर आणि निवृत्त नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली. गेल्या वर्षी ३ मार्चला बलुचिस्तानमधून पाकिस्तानच्या सुरक्षा दलांने जाधव यांना अटक केली होती. कुलभूषण जाधव यांची फाशीची शिक्षा निश्चित केल्याचे पाकिस्तानी […]
पाकिस्तानकडून कुलभूषण यांच्या कबुलीनाम्याची ध्वनीचित्रफित जाहीर, भारताने सर्व आरोप फेटाळले
पवईकर, भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना गुप्तहेर असल्याच्या संशयात पाकिस्तानने अटक केली आहे. भारतावर दबाव वाढवण्यासाठी कुलभूषण जाधव ‘रॉ’चे एजंट असल्याची व बलुचिस्तानमधील दहशतवादी, फुटीरतावादी व भारतीय गुप्तचर संघटना यांच्यात माहितीची देवाण घेवाणीचे काम करण्यात सहभाग असल्याची कबुली देत असलेली ध्वनीचित्रफित पाकिस्तान सरकार आणि लष्कराने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जारी केली आहे. मात्र […]
पवईकरास पाकमध्ये हेरगिरीच्या संशयावरुन अटक
हिरानंदानी, पवई येथील रहिवाशी व व्यावसायिक असणारे कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या संशयात शुक्रवारी पाकिस्तानने बलुचिस्तानमधील चमन येथून अटक केली आहे. ते भारतीय गुप्तचर संघटना ‘रॉ’चे अधिकारी असून, ते हेरगिरीसह बलुचिस्तानात फुटीरतावाद्यांना आर्थिक रसद पुरवण्याचे काम करत असल्याचा आरोप पाकिस्तानने त्यांच्यावर ठेवला आहे. भारताच्यावतीने याबाबत स्पष्टीकरण देताना ‘ते नौदलाचे निवृत्त अधिकारी असून, त्यांचा भारत सरकारशी सध्या […]