Tag Archives | News of Powai

DYFA elec bill

वाढीव वीजबील विरोधात माकपचे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाला निवेदन

मागील दोन महिन्यांपासून आयआयटी पवई परिसरातील नागरिकांना अव्वाच्या सव्वा रकमेची वीज देयके पाठविण्यात येत आहेत. टाळेबंदीमुळे अगोदरच त्रस्त असलेल्या नागरिकांमध्ये याबाबत संताप होता. याबाबत विभागातील काही नागरिकांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पवई शाखेशी संपर्क साधून सदर प्रकरणी लक्ष देण्याची विनंती केली होती. पक्षाच्या पवई शाखेने २४ जुलै रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ भांडूप यांना निवेदन सादर […]

Continue Reading 0
rahul with MSO S ward

पवईत कोविड-१९ शासकीय रूग्णालय बनवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

प्रतिक कांबळे: कोरोना वायरस या महाभयंकर विषाणूने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. या सुक्ष्म विषाणूनी अनेकांना आपल्या जाळ्यात ओढले आहे. अनेकांचा मृत्यू झाला आहे. अजूनही या विषाणूवर औषध येणे बाकी असून, दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढत आहे. जगभरात हाहाकार माजवलेल्या या व्हायरसने पालिका भांडूप ‘एस’ विभागात येणाऱ्या पवई परिसरात देखील थैमान घातले आहे. यालाच पाहता पवईतील […]

Continue Reading 0
online cheating

ऑनलाईन मोटारसायकल खरेदी करणे तरुणाला पडले महागात; गमावली तिप्पट रक्कम

सेकंडहॅन्ड मोटारसायकल ऑनलाईन खरेदी करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या २५ वर्षीय तरुणाला ऑनलाईन फसवणूकीत ७२,००० रुपयांची टोपी लागली आहे. २५,००० रुपये किंमतीच्या त्या मोटारसायकल खरेदीत रस असणाऱ्या तरुणाला त्याच्या जवळपास तिप्पट रक्कम गमवावी लागली आहे. यासंदर्भात साकीनाका पोलिस भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करत या प्रकरणाची चौकशी करत […]

Continue Reading 0
aayesha3

गप्पाटप्पा आणि बरेच काही – अभिनेत्री आयेशा कडुस्कर

सुषमा चव्हाण: पवईला लाभलेला निसर्गाचा अनमोल खजिना मुंबईकरांसाठी नेहमीच आकर्षणाचा राहिला आहे. त्याबरोबरच पवई तलाव, आयआयटी कॅम्पस, हिरानंदानीसारखे उच्चभ्रू वसाहत ही पवईची ओळख बनलेली आहे. अशा या आपल्या पवईला अनेक दिग्गज मंडळी, उद्योजक, लेखक, कलाकार मंडळीचा वारसा लाभलेला आहे. त्यांच्यामुळे पवईच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. पवईच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी एक गोड अशी […]

Continue Reading 0
vba powai food distribution

वंबआ मुंबईच्या वतीने पवईत अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

लॉकडा्ऊन शिथिल करत अनलॉकचा दिशेने प्रवास सुरु झाला असला तरीही या काळात हातावर पोट असणाऱ्या अनेकांच्या हाताला अजूनही काम नाही आहे. असे लोक उपाशी राहू नयेत यासाठी वंचित बहुजन आघाडी मुंबईच्यावतीने सोमवारी पवई येथे मोफत अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. मा प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार मुंबईप्रदेश सदस्य भारत हराळे यांच्या नेतृत्वाखाली गरजू गरीब […]

Continue Reading 0
main1

पवईत उच्चभ्रू इमारतीत चोराने मारला मोठा डल्ला

पवईतील लेक फ्रंट सॉलीटेअर इमारतीत एका चोरट्याने घरफोडी करत मोठा डल्ला मारल्याची घटना सोमवार, २० जुलै रोजी घडली आहे. इमारतीच्या ५व्या मजल्यावर असणाऱ्या ५०२ फ्लॅटमधून चोरट्याने ९ लाख २५ हजाराचे सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने आणि रोकडीवर हात साफ केला आहे. चोरीला गेलेल्या मालमत्तेची नोंद घेणे सुरु असून, हा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. विशेष […]

Continue Reading 0
MLA and corporators Inspected security wall in Powai

पवईतील सुरक्षा भिंतीची आमदार, नगरसेवक यांच्याकडून पाहणी

मुंबईतील सततच्या पावसामुळे पवईतील मोरारजीनगर, रमाबाई आंबेडकर ग्रुप नं २, शिवनेरी हिल, देवीनगर, गरीबनगर, इंदिरानगर, गौतमनगर, हरीओमनगर लोकवस्तीला जाणाऱ्या मार्गावर असणारी सुरक्षा भिंतीचा भाग गुरुवार, १६ जुलैला पडल्याची घटना घडली होती. यानंतर स्थानिक आमदार आणि नामनिर्देशित नगरसेवक यांनी परिस्थितीची पाहणी करत यंत्रणांना त्वरित कारवाईचे आदेश दिले आहेत. मुंबईत आठवड्याच्या मध्यंतरापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. […]

Continue Reading 0
studio-in-chandivali-caught-fire-no-casualties

चांदिवलीत स्टुडिओला आग, जीवितहानी नाही

साकीविहार रोडवर चांदिवली येथे असणाऱ्या एका स्टुडिओला आग लागल्याची घटना आज, शनिवार, १८ जुलै रोजी घडली. एसीमध्ये ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे सगळेच बंद असल्यामुळे सिनेमा आणि मालिकांचे चित्रीकरण सुद्धा बंद होते. मात्र काही दिवसांपूर्वीच चित्रीकरणाला पुन्हा सुरुवात झाली आहे. “चांदिवली येथे असणाऱ्या या […]

Continue Reading 0
bike-theft

मोटारसायकल चोरी करणाऱ्या तिघांना अटक

साकीनाका येथून चोरीला गेलेली काळ्या रंगाची पल्सर २२० मोटारसायकल सह ४ मोटारसायकल पोलिसांनी केल्या हस्तगत सुरक्षित पार्क करून ठेवलेल्या मोटारसायकल वर पाळत ठेवून संधी साधत बनावट चावीने तिची चोरी करून अवैधरित्या विक्री करणाऱ्या टोळीतील तिघांना गुन्हे शाखा कक्ष ११ने बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून ५ मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. त्यातील एक साकीनाका पोलीस ठाणे हद्दीतील […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

ड्रग्स विक्रीसाठी आलेल्या दोघांना १ कोटीच्या ड्रग्ससह साकीनाका येथून अटक

आरोपींच्या चौकशीत पोलिसांना दोघेही महाराष्ट्रात अंमली पदार्थाच्या तस्करी करणार्‍या टोळीचा भाग असल्याचे समोर आले आहे दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) जुहू युनिटने बुधवारी साकीनाका येथे मेफेड्रॉन नामक अंमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेनुसार १.१० कोटी रुपये किमतीचे २.७५ किलोग्रॅमचे मेफेड्रॉन जप्त केले आहे. साकीनाका येथील ९० फिट रोडवर […]

Continue Reading 0
electicity bill

वाढीव वीज बिलाविरोधात नागरिकांचे पवईत आंदोलन

कोरोना महामारीच्या काळात नागरिक आर्थिक अडचणीचा सामना करत असतानाच वीज कंपनीकडून आलेल्या वाढीव वीज बिला विरोधात पवईत नागरिक आणि महिला संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले. प्रेरणा महिला मंडळाच्या नेतृत्वाखाली पवईतील महिलांनी हे आंदोलन केले. कोरोनाने संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे. या महामारीमुळे लोकांना घरात बसण्याचे दिवस आले आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. उद्योगधंदे बंद पडले आहेत. […]

Continue Reading 0

जेव्हीएलआरवर सॅनिटायझर टेम्पो उलटला

सॅनिटायझर कॅन घेऊन जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड (जेव्हीएलआर) वरून ठाणेकडे जाणारा टेम्पो (एमएच ०१ सीव्ही ८३०२) पवई प्लाझाजवळ उलटल्याची घटना आज, गुरुवार १६ जुलै रोजी संध्याकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास पवईत घडली. दुभाजकाला धडकल्याने टेम्पो पलटी झाल्याचे टेम्पो चालकाने सांगितले. टेम्पो चालक अब्दुल रेहमान यात बचावला आहे. मुख्य मार्गावरच टेम्पो उलटल्याने जेव्हीएलआरवर बराच काळ वाहतूक कोंडी […]

Continue Reading 0
panchkutir

गणेशनगर ८ दिवस लॉकडाऊन; कोरोना प्रसार रोखण्यासाठी स्थानिकांचा निर्णय

परिसरात वाढणारा कोरोना प्रसार रोखण्यासाठी सामान्यतः पालिकेतर्फे परिसर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात येतो. मात्र, पवईतील गणेशनगर (पंचकुटीर) येथील वाढत्या कोरोना बाधितांचा आकडा पाहता येथील स्थानिक नागरिकांनीच आपला परिसर सिल म्हणजेच लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवार १७ जुलै ते शुक्रवार २४ जुलै या कालावधीत हा लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. या कालावधीत मेडिकल आणि दूध विक्री […]

Continue Reading 0
फोटो: संतोष सागवेकर

पाणीपुरवठा करणार्‍या तलावात ऑक्टोबर पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा जमा

पवई तलाव ओसंडून वाहू लागला आहे. मात्र या तलावातील पाणी पिण्यासाठी वापरात येत नाही. २०२० वर्षात सरासरीच्या १०० टक्के पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने (IMD)  वर्तवला होता. या अंदाजानुसारच पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच आवश्यक तितका पाऊस होत आहे. आनंदाची बातमी म्हणजे मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात सुरुवातीपासूनच समाधानकारक पाऊस पडला आहे. महाराष्ट्रातील विशेषतः […]

Continue Reading 1
2

साकीनाका येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

@आकाश शेलार वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आणि हॉस्पिटल मध्ये रुग्णांची झालेली वाढ, तसेच ब्लड बैंक मध्ये थैलीसीमिया प्रभावित गरीब आणि गरजू मुलांसाठी दर महिन्याला रक्ताची आवश्यकता असते. रक्ताची वाढती मागणी पाहता समर्पण ब्लड बँकेच्या मागणीनुसार तसेच गरजू व्यक्तींना मोफत रक्त मिळावे या उद्देशाने विश्व हिन्दू परिषद, बजरंग दल कुर्ला उमा महेश्वर प्रखण्डच्या कार्यकर्त्यांतर्फे रविवारी सत्यानगर वाचनालय […]

Continue Reading 0
Inauguration of Pact Telemedicine and Oxygen Center

पवईत सुरु झाले पॅक्ट टेलिमेडिसीन आणि ऑक्सिजन केंद्र

गौरव शर्मा: ‘आशा मुंबई’ या आशा फॉर एज्युकेशन या वंचित मुलांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय चळवळीच्या मुंबई शाखेने सहयोग या पवईतील सामाजिक संघटनेसोबत एकत्र येऊन ‘पॅक्ट’ हे टेलिमेडिसीन व ऑक्सिजन केंद्र पवई येथे सुरू केले आहे. गेली १५ वर्षे आशा मुंबई आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पवईतील चाळसदृश्य वस्त्यांमध्ये शालेय शिक्षण आणि इतर सामाजिक प्रश्नांवर काम करीत […]

Continue Reading 0
accident

आयआयटी पवई येथे मोटारसायकल चालकाला उडवले; डॉक्टरला अटक

रविवारी सकाळी आयआयटी-पवई सिग्नलजवळ एका मोटारसायकल चालकाला धडक देत हयगयने गाडी चालवत त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या एका २४ वर्षीय डॉक्टरला पवई पोलिसांनी अटक केली आहे. सिद्धार्थ सत्येंद्र चौधरी असे अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे. मुलुंडच्या गव्हाणपाडा येथील रहिवासी असणारे सचिन पुतळाजी भोसले (२९) हे या अपघातात मृत पावले आहेत. पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी […]

Continue Reading 0
babar_sudhakar_ration_distribution

पवईकराने उचलला ग्रामीण भागातील ५०० कुटुंबाच्या रेशनचा खर्च

आपली गावे, खेडी सोडून अनेक कुटुंबाना पोटापाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी शहराकडे धाव घ्यावी लागते. मात्र इथे आल्यावर आपल्या गावाला विसरून चालत नाही. कोरोनामुळे अशी अनेक गावे आणि तेथील कुटुंबे आर्थिक अडचणीत आली आहेत. अशाच एका गावचे सुपुत्र पवईकर सुधाकर बाबर यांनी ही परिस्थिती लक्षात घेत गावातील सर्व रेशनधारकांचा खर्च स्वतः उचलत त्यांना आधार दिला आहे. याबद्दल […]

Continue Reading 0
sachin kuchekar

प्रामाणिक पवईकराने परत केली रस्त्यात सापडलेली महिलेची बॅग

लॉकडाऊनमुळे अनेकांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आर्थिक आवक कमी झाली आहे. अशात हाती आलेली संधी गमावण्याचा कोण विचार करेल? मात्र प्रामाणिक माणूस नेहमीच प्रामाणिक असतो याचेच उदाहरण सोमवारी पवईकराच्या रुपात पाहायला मिळाले. सचिन कुचेकर यांना प्रवासा दरम्यान रस्त्यात मिळालेली महिलेची बॅग त्यांनी मालक महिलेला परत करत आपली माणुसकी आणि प्रामाणिकपणाचे एक उदाहरण समोर ठेवले आहे. […]

Continue Reading 0
Sachin Tendulkar inaugurates COVID-19 Plasma Therapy unit at Seven Hills Hospital

सचिन तेंडुलकरच्या हस्ते सेव्हन हिल रुग्णालयातील प्लाझ्मा थेरपी युनिटचे उद्घाटन

क्रिकेट आयकॉन भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी बुधवारी मरोळ येथील सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये कोविड-१९ रूग्णांच्या उपचारांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या प्लाझ्मा थेरपी युनिटचे उद्घाटन केले. प्लाझ्मा थेरपी उपयुक्त ठरत असल्यानेच राज्य सरकारने या थेरपीला परवानगी दिली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी)च्या पुढाकाराने प्लाझ्मा थेरपी युनिट कोरोनाव्हायरसच्या लढाईत एक नवीन आघाडी उघडत आहे. “कोविड -१९च्या साथीच्या रूपाने अभूतपूर्व आव्हान उभे […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!