Tag Archives | powai news

Powai police handcuffed 31 year old auto rickshaw thief

अट्टल रिक्षा चोराला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पवईसह मुंबई परिसरात रिक्षा चोरी करणाऱ्या अट्टल चोराला पवई पोलिसांनी रविवारी बेड्या ठोकल्या आहेत. शांताराम अशोक धोत्रे (३१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. धोत्रे याच्या विरोधात मुंबईत अशाच प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद असून, १५ दिवसांपूर्वीच तो जामिनावर सुटून आला होता. यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरज पंडित हे भाडेतत्वावर रिक्षा चालवतात. त्यांच्या ताब्यातील चालवण्यासाठी […]

Continue Reading 0
Tadipar accused and his two partners arrested in robbery case

जबरी चोरीच्या गुन्ह्यात तडीपार आरोपीसह २ जणांना अटक

अंगावर गाडी घातल्याचा खोटा बहाणा करून एका कारचालकाला संगनमत करून जबरी लुटणाऱ्या ३ जणांना पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अटक तिन्ही आरोपी पवई परिसरातील रहिवाशी आहेत. यातील एक आरोपी अभिलेखावरील सराईत आरोपी असून, त्याला एक वर्षा करीता मुबंई, पालघर, ठाणे परिसरातून हद्दपार केले असताना त्याने हा गुन्हा केला आहे. फिर्यादी हे हिरानंदानी, पवई येथील ‘जनरल […]

Continue Reading 0
Powai police arrested a gang robbing youths, through luring dating apps

पवई पोलिसांनी मोटार सायकल चोराला ठोकल्या बेड्या

पवई परिसरातून मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका तरुणाला पवई पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. संकेत रामचंद्र गोरे (वय २० वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीस गेलेली मोटारसायकल हस्तगत केली आहे. त्याच्याकडे चौकशी सुरु असून, मुंबईत अजून कोठे अशा प्रकारचे गुन्हे नोंद आहेत का याचा पोलीस शोध घेत आहेत. फिर्यादी नामे अतिन […]

Continue Reading 0
Powai police arrested a trio who travels by plane and carried out more than 280 burglaries

विमानाने प्रवास करून २८० पेक्षा अधिक घरफोड्या करणाऱ्या तिकडीला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

सुमारे तीन आठवड्यांपूर्वी पवईतील हिरानंदानी भागातील सेवानिवृत्त नौदल अधिकाऱ्याच्या घरातून रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू असा २४.७१ लाखांचा डल्ला मारल्याच्या आरोपाखाली पवई पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. जलवायू विहार येथे राहणारे माजी नौदल अधिकारी पत्नीसह आगरतळा येथे गेले होते. आपल्या घराची चावी त्यांनी घरकाम करणारी बाई शैला शिर्के यांच्याकडे सोपवल्या होत्या. “शिर्के फक्त घर […]

Continue Reading 0
We don't want cycle track destroying beauty of Powai Lake; Nature lovers oppose construction of cycle track

पवई तलावातील सायकल ट्रॅक प्रकल्पाविरोधात पवईकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

पवई तलाव वाचवा मोहिमेला आता चांगलीच गती मिळाली असून, पवई तलावातून आणि सभोवतालच्या परिसरातून जाणाऱ्या सायकल ट्रॅकच्या विरोधात पवईकरांच्या एका गटाने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. तलावाच्या आतील भागातून सायकल ट्रॅकच्या बांधकामावर त्यांनी धक्का व्यक्त करताना हा प्रकल्प किती हानिकारक आहे याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधत त्यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. पवईकर […]

Continue Reading 0
2

पवई तलावावर बाप्पांना भावपूर्ण निरोप

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर ! या अशा गर्जनेत, ढोल-ताशांच्या निनादात आणि आबालवृद्धांच्या उस्फुर्त उत्साहात अनेक घरगुती व सार्वजनिक गणपतीचे बुधवारी पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देवून भावपूर्ण आणि जड अंतकरणाने विसर्जन पवई तलावाच्या दोन्ही घाटांवर करण्यात आले. शुक्रवारी वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या गजरात आगमन झालेल्या बाप्पांनी भक्तांच्या घरी पाहुणचार घेतल्यानंतर रविवारी दीड दिवसाच्या आणि बुधवारी […]

Continue Reading 0
Powaiites be Alert! Traffic CCTV Cameras Installed on Hiranandani roads, More than 2500 e-challan issued

पवईकरांनो सावधान ! हिरानंदानीच्या रस्त्यांवर वाहतूक पोलिसांच्या सीसीटीव्हीची नजर, २५०० लोकांना ई चलन

पवईतील हिरानंदानी परिसरात स्थानिक भागात फिरत आहात आणि  वाहतूक पोलीस नसतात म्हणून वाहतुकीचे नियम मोडत वाहन चालवत असाल तर सावधान! हिरानंदानीतील सेन्ट्रल एव्हेन्यू रोडवर असणाऱ्या वन वे रस्त्यांवर वाहतूक पोलिसांतर्फे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, वाहतूक पोलिसांतर्फे ई चलन द्वारे दंडात्मक कारवाई केली जात आहे. चार वर्षापूर्वी मुंबईत वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड वसूल करण्यासाठी […]

Continue Reading 0
dumpper

डंपर चोरी करणाऱ्या आरोपीस पवई पोलिसांनी अवघ्या पाच तासात ठोकल्या बेड्या

पवई, साकीनाका भागातून डंपर चोरी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला पवई पोलिसांनी अवघ्या ५ तासात माग काढत अटक केली आहे. पप्पु उर्फ बहादुर राममनी आदिवाशी (वय ३० वर्षे) राहणार उत्तरप्रदेश असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीकडून ३० लाख किंमतीचा डंपर हस्तगत केला आहे. फिर्यादी मोहम्मद बिलाल छांगुर चौधरी यांनी दिनांक ७ सप्टेंबर रोजी […]

Continue Reading 0
157 blood donors donated blood on the occasion of Independence Day in Powai

पवईत स्वातंत्र्य दिनानिमित्त १५७ रक्तदात्यांनी केले रक्तदान

@प्रतिक कांबळे कोरोना विषाणुचा झपाट्याने होणारा प्रसार आणि त्यात भासणारा रक्ताचा अपुरा साठा लक्षात घेता पवईतील आयुष्य फांऊंडेशन संघटनेच्यावतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. माता रमाबाई आंबेडकर नगर २ येथील विश्वशांती बुद्ध विहारात आयोजित या शिबिरात १५७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिरात सायन रुग्णालयाची रक्तपेढी लाभली होती. पेढ्यामध्ये असणारा अपुरा […]

Continue Reading 0
online cheating

सैन्यात अधिकारी असल्याचे भासवत माजी सैनिकाला ३.५ लाखाचा गंडा

सैन्यात अधिकारी असल्याचे सांगत एका माजी सैनिकाला ३.५ लाखाचा गंडा घातल्याची घटना सोमवारी पवईत घडली आहे. या संदर्भात पवई पोलीस माहिती तंत्रज्ञान कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करून अधिक तपास करत आहेत. पवईतील हिरानंदानी भागात राहणारे मुकेश भार्गवा यांना आपले घर भाड्याने द्यावयाचे असल्याने त्यांनी याबाबत असे व्यवहार करणाऱ्या एका वेबसाईटवर आपली जाहिरात दिली होती. “जाहिरात […]

Continue Reading 0
PEHS yoga day

पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये साजरा झाला मन आणि शरीराच्या आरोग्याचा उत्सव

पवईतील सर्वात जुन्या असणाऱ्या आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये  सोमवार, २१ जून रोजी ७वा ‘जागतिक योग दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मोठ्या संख्येत शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी या ऑनलाईन कार्यक्रमात सहभाग नोंदवत योगाचे धडे गिरवले. शिक्षक आणि योगा इन्स्ट्रक्टर कोमलम सुनील आणि आर्ट ऑफ लिविंगच्या योगा इन्स्ट्रक्टर निवेदिता घोशाल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन […]

Continue Reading 0
Powai police arrested 26-year-old-man-for-jewellery-store-robbery

३० लाखाचे दागिने चोरी करून पसार झालेल्या इसमास पवई पोलिसांनी ६ तासात ठोकल्या बेड्या

पवईतील ज्वेलरी शॉपमध्ये चोरी करून ३० लाख किंमतीच्या दागिन्यांसह पसार झालेल्या एका २६ वर्षीय व्यक्तीला पवई पोलिसांनी अवघ्या ६ तासात बेड्या ठोकल्या आहेत. हिरालाल लेहरुलाल कुमावत असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हिरालाल यावर्षी २० मे रोजी जामिनावर सुटला होता. पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेले सर्व दागिने हस्तगत केले आहेत. दोन वर्षापूर्वी जुगारात हरल्याने कर्ज फेडण्यासाठी […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

पवईत तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला; एकाला अटक

पूर्व वैमनस्याचा राग मनात ठेवून भांडण काढत एका तरुणावर ४ लोकांनी चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना पवईमध्ये घडली आहे. इसाकीमुत्तू तेवर कटेन असे जखमी तरुणाचे नाव असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यासंदर्भात पवई पोलिसांनी भादवि कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न), ३४ (दोन किंवा अधिक व्यक्तींनी समान उद्देशाने केलेल कृत्य) नुसार गुन्हा नोंद करत मुत्तू […]

Continue Reading 0
Distribution of food-grains in tribal padas by Dipastambh Pratishthan1

दिपस्तंभ प्रतिष्ठानतर्फे आदिवाशी पाड्यांमध्ये अन्नधान्य वाटप

गरीब गरजू मुलांच्या शिक्षणासह सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या पवईतील दिपस्तंभ प्रतिष्ठानच्यातर्फे रविवारी येथील आदिवासी पाड्यांमध्ये अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. संस्थेचे पदाधिकारी आणि पवई पोलिसांतर्फे या किटचे वाटप आदिवासी पाड्यातील बांधवाना करण्यात आले. कोरोनाला थोपवण्यासाठी करण्यात आलेल्या लाकडाऊनमुळे सर्वांनाच घरी बसण्याची वेळ आली आहे. अशात बेरोजगारी आणि कामाच्या कमीमुळे अनेकांच्या पोटापाण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. […]

Continue Reading 0
getway of india

पवईच्या रस्त्यांवर मुंबई दर्शन आणि शिवकालीन इतिहास

@ सुषमा चव्हाण कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे. १५ मे पर्यंतचा लॉकडाऊन वाढून आता ३१ मे पर्यंत झाला आहे. या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना वगळता इतर नागरिकांना बाहेर पडण्यास मुभा नाहीये. मे महिना म्हणजे शालेय सुट्ट्या आणि नागरिकांच्या पर्यटनाचे दिवस मात्र, या लॉकडाऊनच्या काळात बाहेर पडता येत नसल्याने हे शक्य […]

Continue Reading 0
arrested

जामिनावर सुटलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीसह तिघांना हत्याराचा धाक दाखवून जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक

पवई परिसरातील शिवशक्ती नगर येथील एका साडीच्या दुकानात घुसून बंदुकीचा धाक दाखवून, दुकान मालकाला चाकूने जखमी करून जबरी चोरी करणाऱ्या ४ आरोपींना पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अटक आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. गुन्ह्यातील मुख्य आरोपीला काही महिन्यांपूर्वीच जामिनावर सोडण्यात आले होते. तो खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत होता. २१ एप्रिलला ४ अज्ञात इसम हे […]

Continue Reading 0
Public toilet opposite IIT-B main gate adopted by Ward 122 Corporator & Powai’s Lions Club

पवई लायन्स क्लबने दत्तक घेतले आयआयटी मेनगेट समोरील सार्वजनिक शौचालय

डागडुजी आणि अस्वच्छतेमुळे पाठीमागील अनेक महिन्यांपासून खितपत पडलेले आयआयटी मेनगेट जवळील सार्वजनिक शौचालय लायन्स क्लब ऑफ पवईतर्फे दत्तक घेण्यात आले आहे. येथून पुढील काळात त्याच्या डागडुजी आणि स्वच्छतेचे काम संस्था पाहणार आहे. क्लबचे अध्यक्ष कपिलदेव सिंह आणि सदस्य भवानी शंकर शर्मा यांच्या संयुक्त विद्यमाने शौचालय दत्तक घेण्यात आले आहे. नुकतेच शौचालयाचे नूतनीकरण करून ते सार्वजनिक […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!