लॉकडाऊनमुळे अनेकांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आर्थिक आवक कमी झाली आहे. अशात हाती आलेली संधी गमावण्याचा कोण विचार करेल? मात्र प्रामाणिक माणूस नेहमीच प्रामाणिक असतो याचेच उदाहरण सोमवारी पवईकराच्या रुपात पाहायला मिळाले. सचिन कुचेकर यांना प्रवासा दरम्यान रस्त्यात मिळालेली महिलेची बॅग त्यांनी मालक महिलेला परत करत आपली माणुसकी आणि प्रामाणिकपणाचे एक उदाहरण समोर ठेवले आहे. […]
Tag Archives | powai news
सचिन तेंडुलकरच्या हस्ते सेव्हन हिल रुग्णालयातील प्लाझ्मा थेरपी युनिटचे उद्घाटन
क्रिकेट आयकॉन भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी बुधवारी मरोळ येथील सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये कोविड-१९ रूग्णांच्या उपचारांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या प्लाझ्मा थेरपी युनिटचे उद्घाटन केले. प्लाझ्मा थेरपी उपयुक्त ठरत असल्यानेच राज्य सरकारने या थेरपीला परवानगी दिली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी)च्या पुढाकाराने प्लाझ्मा थेरपी युनिट कोरोनाव्हायरसच्या लढाईत एक नवीन आघाडी उघडत आहे. “कोविड -१९च्या साथीच्या रूपाने अभूतपूर्व आव्हान उभे […]
हिरानंदानीतील पेन्शनधारक फिशिंगचे बळी; गमावले दोन लाख
अनोळखी व्यक्तीला ओटीपी शेअर केल्यामुळे पवईतील हिरानंदानी गार्डन येथील एका ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारक यांना पाच व्यवहारांच्या माध्यमातून १.९५ लाखाचा गंडा पडला आहे. तुम्ही दूरसंचार नियामक प्राधिकरण (टेलिकॉम रेग्युलेटरी औथोरीटी ऑफ इंडिया) म्हणजेच ट्रायच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. पुढील काळात तुम्हाला पेन्शन बंद होवू शकते. असे कारण देत सायबर भामट्याने हिरानंदानी येथील एका ज्येष्ठ नागरिक […]
राजगृहावर हल्ला करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा करा, पवई पोलिसांना अनुयायांचे निवेदन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर भागात असलेले निवासस्थान राजगृहावर मंगळवारी दोन अज्ञात इसमांनी हल्ला करत तोडफोड केली. यानंतर त्यांच्या अनुयायांकडून मोठा राग व्यक्त केला जात आहे. मात्र आंबेडकर परिवाराने अनुयायांना शांत राहण्याची विनंती केल्यानंतर पवई परिसरातील अनुयायांतर्फे आरोपींना त्वरित अटक करून, आरोपींवर कठोर कारवाई करावी आणि राजगृह तसेच आंबेडकर परिवाराला सक्षम सुरक्षा प्रदान करण्याची […]
पवईत दोन दिवसात ४ कोरोना बाधितांची नोंद
कोरोना बाधितांच्या संख्येने मुंबई महानगरपालिका एस विभागात उच्चांक गाठला असतानाच पवईकरांसाठी मात्र एक दिलासादायक बातमी आहे. पालिका एस विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या पवई परिसरात ३० जून आणि १ जुलै या दोन दिवसात ४ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. यात ३० जून रोजी एक तर १ जुलै रोजी ३ बाधितांची नोंद झाली आहे. कोरोना विषाणूमुळे बाधित होणाऱ्या […]
मेडिकल स्टोअर मालकाची ऑनलाईन फसवणूक
पवई येथील मेडिकल आणि जनरल स्टोअरच्या मालकाची ₹ २०,०००ची ऑनलाईन फसवणूक करण्यासाठी आपली ओळख सैन्य अधिकारी म्हणून करून देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात पवई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोरोना काळात नागरिकांना आवश्यकता असणाऱ्या मेडिकल किटची गरज लक्षात घेता, आरोपीने हँड सॅनिटायझर, मास्क आणि हँड ग्लोव्हज ऑर्डर करून त्याचे पेमेंट करण्यासाठी क्यूआर कोड पाठवत मेडिकल मालकाची ऑनलाईन […]
एस विभागात कोरोना जनजागृतीसाठी साक्षात विठू – रखुमाईंची नागरिकांना साद
अवि हजारे: एस विभागात नागरिकांना कोरोना चे गांभीर्य समजावून सांगण्यासाठी पालिकेने केलेल्या अनेक प्रयत्नानंतर सुद्धा नागरिक त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने शेवटी साक्षात विठ्ठल- रखुमाई नागरिकांच्या दारोदारी जावून जनजागृती करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना अनेकमार्गे मार्गदर्शन आणि रोखून देखील लोक घराबाहेर पडत आहेत. कोरोना चा एस विभागात वाढता आकडा लक्षात घेता, लोकांना कोरोनाचे गांभीर्य समजावून सांगण्यासाठी […]
रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी एस विभाग प्रयत्नशील
नागरिकांनी सहकार्य न केल्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढला – डॉ. विलास मोहकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी ( एस विभाग) अवि हजारे: एस विभाग हद्दीमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एस विभाग कोरोना बाधितांच्या यादीत ५व्या क्रमांकावर पोहचला आहे. ही वाढती लोकसंख्या विचारात घेता राजकारणी आणि नागरिक प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. मात्र, एस विभागाने आपण पूर्णपणे ग्राउंड लेव्हलवर […]
पवईत व्यावसायिकाची कारमध्ये गळफास घेवून आत्महत्या
पवईतील जलवायू विहारच्या पाठीमागील जैन मंदिर रोडवर शुक्रवार २६, जूनला सकाळी एका कारमध्ये ४१ वर्षीय व्यवसायिकाचा मृतदेह पवई पोलिसांना मिळून आला आहे. नैराश्यातून त्याने कारमध्ये गळफास घेवून आत्महत्या केली असल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. अधिक तपास सुरु आहे. या संदर्भात पवई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी मुख्य नियंत्रण कक्षाकडून एसएम शेट्टी शाळेजवळील म्हाडा इमारत क्रमांक […]
गांधीनगरजवळ भरधाव कार पलटली, दोन जण जखमी
पवईकडून कांजुरमार्गच्या दिशेने जाणारी भरधाव मोटार कार गांधीनगर पुलाजवळ पलटली. बुधवार, २४ जूनला संध्याकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत चालकासह एक महिला सुद्धा जखमी झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ०३ बीएस ८४२८ डस्टर कार जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवरून (जेविएलआर) मुलुंडच्या दिशेने चालली होती. “भरधाव वेगात जाणारी ही कार […]
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी पवईत सॅनिटायझेशन ट्रॅक्टरच्या माध्यमातून निर्जंतुकीकरण
कोरोना व्हायरसच्या उद्रेक दरम्यान पवईतील विविध भागात सॅनिटायझेशन ट्रॅक्टरच्या माध्यमातून निर्जंतुकीकरण करण्यात आले. स्थानिक नगरसेविका वैशाली पाटील आणि नामनिर्देशित नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी यांच्या प्रयत्नाने शनिवारी पवईत ही फवारणी करण्यात आली. शनिवारी एकाच दिवसात देशात १४,५१६ नवीन कोविड-१९ प्रकरणांची नोंद झाली. ज्यामुळे शनिवारी बाधितांची संख्या ३,९५,०४८ वर पोहचली होती. ज्यापैकी २.१ लाख रूग्ण बरे झाले आहेत. […]
पवईत कोरोना बाधित मिळण्याचा वेग मंदावला
पालिका एस विभागांतर्गत येणाऱ्या पवई परिसरात कोरोना बाधित मिळण्याचा वेग मंदावला असून, सोमवार २२ जून रोजी पवईमध्ये ३ बाधितांची नोंद झाली आहे. पवई परिसरात जून महिन्याच्या सुरुवातीपासून मध्यंतरापर्यंत मिळालेल्या बाधितांचा आकडा पाहता पवई परिसरात बाधित मिळण्याचा वेग मंदावला असल्याचे समोर येत आहे. कोरोना विषाणूंनी मुंबईवर आपली पकड घट्ट केली असून, पालिका ‘एस’ विभाग कोविड-१९च्या यादीत […]
युवासेना व भारतीय विद्यार्थी सेनेतर्फे पोलीस दलातील महिलांना सॅनिटरी पॅडचे वाटप
शिवसेचा ५४वा वर्धापन दिवस आणि पर्यावरण- पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमीत्त युवासेना व भारतीय विद्यार्थी सेनेतर्फे २० जून २०२० रोजी पवई आणि आसपासच्या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना अर्सेनिक अल्बम तर पोलीस दलातील महिलांना सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. मराठी बाणा आणि कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणी असलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वात उभी राहिलेली शिवसेना […]
हिरानंदानीत नालेसफाईच्या कामांना वेग
जून महिना अर्ध्यावर पोहचला असून, पावसाच्या तुरळक सरींनी हजेरी लावत आपल्या आगमनांचे संकेत दिले आहेत. मात्र लॉकडाऊन आणि कोरोनाच्या महामारीत अडकून पडलेल्या पालिका प्रशासनाला यावर्षी नालेसफाईला वेळेच्या नियोजनासाठी मोठी कसरत करावी लागली. मात्र आता पालिकेच्या माध्यमातून ठिकठिकाणी नालेसफाईच्या कामांना वेग आला आहे. पवईतील हिरानंदानी भागात सुद्धा नालेसफाई सुरु असल्याची चित्रे लोकांना दिसू लागली आहेत. मार्च […]
शाल्मली खोलगडे यांनी वडिलांना वाढदिवशी दिले अनोखे सरप्राईज
गायक आणि पॉपस्टार शाल्मली खोलगडे यांनी त्यांच्या वडिलांच्या ६८व्या वाढदिवसानिमित्त सरप्राईज देत त्यांना एक गोड भेट दिली. त्यांनी आपल्या वडिलांना आणि आईला आश्चर्यचकित करत दिलेल्या या भन्नाट भेटीचे चित्रीकरण आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. या व्हिडिओमध्ये शाल्मली खोलगडे म्हणतात “आज बाबांचा वाढदिवस आहे आणि मी त्याच्यासाठी खास त्यांच्या आवडीचा ‘आलू पराठा’ बनवित आहे आणि मी […]
मेट्रो कामात जलवाहिनी फुटली; रात्री ९ नंतर पाणी येण्याची शक्यता
महाराष्ट्रात सध्या अनलॉक १ सुरु झाला असून, विविध ठिकाणी लॉकडाऊन काळात अडकलेल्या कामांना गती दिली जात आहे. असेच काम सुरु असताना जोगेश्वरी – विक्रोळी लिंकरोडवर ‘मेट्रो-६’च्या कामात आयआयटी मेनगेट समोर जलवाहिनी फुटली. यामुळे बुधवारी दिवसभर पवईतील अनेक भागात पाणीपुरवठा खंडित झाला होता. रात्री ९ नंतर पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता पालिका पाणीपुरवठा विभागाने वर्तवली आहे. ८ […]
पवईत कोरोनायोद्धा प्रमाणपत्रांचे पेव
@अविनाश हजारे – सध्या लॉकडाऊनचे कठोर नियमन सुरू असताना स्वकौतुकाचे डोहाळे लागलेल्यांनी स्वतःची पाठ थोपटवून घेण्यासाठी वेगळीच शक्कल लढवली आहे. विविध संस्थांच्या नावे ‘कोरोनायोद्धा’ सन्मानपत्र मिळवत हे आपले कौतुक करून घेत आहेत. असे सन्मानपत्र देणाऱ्या आणि घेणाऱ्या दोघांचेही पवई आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पेव फुटले आहेत. कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णसेवक, […]
तुंगागाव, मुरंजनवाडी कंटेन्मेंट झोन; संचारास निर्बंध
साकीविहार रोडवरील तुंगागाव आणि मुरंजनवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित मिळत असल्याने वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी पालिकेने हा परिसर कंटेन्मेंट झोन/ प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. सोमवार ८ जून २०२० पासून ते २१ जून २०२० पर्यंत हा आदेश लागू करण्यात आला आहे. या काळात व्यवहार आणि संचारास निर्बंध घालण्यात आले आहेत. मुंबईत कोरोना विषाणूमुळे […]
तीन रुग्णालयाने नाकारलेल्या गर्भवतीची त्यांनी घरीच केली प्रसूती
वैद्यकीय यंत्रणा कोरोना विषाणूंशी पूर्णपणे लढत असतानाच अनेकवेळा सामान्य नागरिकांना इतर उपचारांसाठी वैद्यकीय सुविधा मिळवताना मोठे खटाटोप करावे लागत आहेत. अशीच वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने नाविलाजास्तव घरात अडकून पडलेल्या गर्भवतीची एका डॉक्टरने घरीच प्रसूती करत तिला आणि बाळाला एक नवीन जीवनदान दिले आहे. डॉक्टर रविंद्र म्हस्के असे त्यांचे नाव असून, चांदिवली संघर्षनगर येथे ते आपली […]
कोविड 19 अपडेट: पवईमध्ये सॅनिटायजेशनचे काम सुरू
बातम्यांच्या अपडेटसाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा