पावसाच्या हजेरीत मुंबईत पडलेल्या खड्डयांमुळे एकंदरीत पालिका कारभाराचे पितळ उघडे पडले आहे. नागरिकांच्या वारंवार तक्रारीनंतर ऍक्शन मोडवर असलेल्या पालिका आयुक्तांच्या निर्देशाला सहाय्यक अभियंत्यांनीच उघड्यावर सोडल्याचे चित्र समोर आले आहे. पवईतील आयआयटी भागात पडलेल्या खड्यांवर पालिकेने वेस्ट मटेरियल टाकून खड्डे भरण्याची अजब युक्ती लढवत लोकांच्या जीवाशी खेळ केला आहे. मुंबईत पाठीमागील काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी […]
Tag Archives | powai roads
माता रमाबाई आंबेडकर नगरच्या मदतीला ‘जनता राजा’ आला धावून
पवईतील माता रमाबाई आंबेडकर नगर येथील रोडच्या समस्येंशी कित्येक वर्ष लढणाऱ्या स्थानिक रहिवाशांच्या हाकेला एकही लोकप्रतिनिधी येत नसल्याचे पाहत, पवईचे जनतेचे राजे, माजी नगरसेवक चंदन शर्मा स्वतः पुढे सरसावले आहेत. या परिसरातील रोडच्या सिमेंटीकरणाचे काम स्वखर्चातून करून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेत, रविवारी या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केला. यावेळी शर्मा यांच्यासह राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस, युवा नेते […]
डी पी रोड ९च्या कामाचा नारळ फुटला
चांदिवलीत सध्या चालू रोडची काम पूर्ण झाल्यानंतर डीपी रोड ९च्या दुरुस्तीचे काम सुरु करण्याची चांदिवलीकरांची मागणी चांदिवलीला जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडशी (जेविएलआर) जोडणारा आणि वर्षानुवर्ष खितपत पडलेल्या डी पी रोड ९च्या दुरुस्तीच्या कामाचा नारळ शुक्रवारी फुटला. आमदार दिलीप मामा लांडे यांच्या प्रयत्नातून होणाऱ्या या कामाचा शुभारंभाचा नारळ ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते फोडत शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार […]
पवई विहार रोड सोमवारी रात्री वाहतुकीसाठी बंद; रस्ता निर्मितीच्या कामामुळे राहणार बंद
पवई विहार कॉम्प्लेक्स रोडवर करण्यात येणाऱ्या दुरुस्तीच्या कामामुळे एका रात्रीसाठी हा रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. लेकहोम किंवा चांदिवलीकडे जाणाऱ्या नागरिकांनी यासाठी एस एम शेट्टी मार्गे किंवा रामबाग, डी पी रोड नंबर ९ मार्गे प्रवास करायचा आहे. सोमवारी रात्री १० ते मंगळवार सकाळी ६ पर्यंत हा रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. पाठीमागील वर्षी […]
पवई विहारचा रस्ता खड्डयात; नागरिक विद्यार्थ्यांचे हाल
पवई विहार येथील अंतर्गत रस्त्याला बनवण्याचा कामाचा मोठा धुमधडाक्यात गाजावाजा करत शुभारंभ करूनही अखेर या पावसाळ्यात ही रस्ता खड्डयात गेल्याचे समोर येत आहे. यामुळेच या भागात राहणाऱ्या नागरिकांची आणि येथील शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची चांगलीच दैना झाली असून, प्रवाशाला येथून घेवून जाण्यास रिक्षावाले मनाई करू लागले आहेत. त्यामुळे किमान रस्ता दुरुस्त तरी करा अशी मागणी आता […]