आपल्या कामाच्या ठिकाणी जात असताना एका सुरक्षा रक्षकाला डंपरने चिरडल्याची घटना पवई परिसरात घडली आहे. अतुल खरोसे असे या घटनेत मृत पावलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव असून, याबाबत पवई पोलिसांनी निष्काळजीपणे वाहन चालवत मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या डंपर चालकाला अटक केली आहे. कांजूरमार्ग येथील एमएमआरडीए कॉलनीत राहणारे अतुल खरोसे हे पवई येथील एल अँड टी भागात सुरक्षारक्षक […]
Tag Archives | powai updates
जितेंद्र सोनावणे पवई पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी; अकोला किडनी रॅकेट गुन्हा तपासाचे केले होते नेतृत्व
पवई पोलीस ठाण्याचे (Powai police station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक (वपोनि) (Senior Police Inspector) बुधन सावंत ३० ऑगस्टला सेवानिवृत्त (retired) झाले असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सिताराम सोनावणे (Sr. PI Jitendra Sonavane) यांनी पदभार स्वीकारला आहे. महाराष्ट्रभर विविध पदांवर काम करणाऱ्या सोनावणे यांनी अकोला किडनी रॅकेट गुन्ह्याच्या तपासाचे नेतृत्व केले होते. गुरुवार, १४ सप्टेंबरला त्यांनी पवई […]
पवई विहार रोड सोमवारी रात्री वाहतुकीसाठी बंद; रस्ता निर्मितीच्या कामामुळे राहणार बंद
पवई विहार कॉम्प्लेक्स रोडवर करण्यात येणाऱ्या दुरुस्तीच्या कामामुळे एका रात्रीसाठी हा रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. लेकहोम किंवा चांदिवलीकडे जाणाऱ्या नागरिकांनी यासाठी एस एम शेट्टी मार्गे किंवा रामबाग, डी पी रोड नंबर ९ मार्गे प्रवास करायचा आहे. सोमवारी रात्री १० ते मंगळवार सकाळी ६ पर्यंत हा रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. पाठीमागील वर्षी […]
मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात तरुणीला अटक; भंगारात मिळाली मोटारसायकल
मोटारसायकल चोरी म्हणजे पुरुषाचा सहभाग असा समज आहे. पवई येथील एका मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात मात्र या उलट घडले आहे. पवई पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात एका २१ वर्षीय तरुणीला अटक केली आहे. पवई पोलिसांनी देवनार डम्पिंग ग्राउंड येथून तिने चोरी केलेली गाडी हस्तगत केली आहे. २६ वर्षीय तक्रारदार किरण पठाडे हे स्विगीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम […]
पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये साजरा झाला मन आणि शरीराच्या आरोग्याचा उत्सव
पवईतील सर्वात जुन्या असणाऱ्या आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये सोमवार, २१ जून रोजी ७वा ‘जागतिक योग दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मोठ्या संख्येत शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी या ऑनलाईन कार्यक्रमात सहभाग नोंदवत योगाचे धडे गिरवले. शिक्षक आणि योगा इन्स्ट्रक्टर कोमलम सुनील आणि आर्ट ऑफ लिविंगच्या योगा इन्स्ट्रक्टर निवेदिता घोशाल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन […]
पवईत कोरोनायोद्धा प्रमाणपत्रांचे पेव
@अविनाश हजारे – सध्या लॉकडाऊनचे कठोर नियमन सुरू असताना स्वकौतुकाचे डोहाळे लागलेल्यांनी स्वतःची पाठ थोपटवून घेण्यासाठी वेगळीच शक्कल लढवली आहे. विविध संस्थांच्या नावे ‘कोरोनायोद्धा’ सन्मानपत्र मिळवत हे आपले कौतुक करून घेत आहेत. असे सन्मानपत्र देणाऱ्या आणि घेणाऱ्या दोघांचेही पवई आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पेव फुटले आहेत. कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णसेवक, […]
तीन रुग्णालयाने नाकारलेल्या गर्भवतीची त्यांनी घरीच केली प्रसूती
वैद्यकीय यंत्रणा कोरोना विषाणूंशी पूर्णपणे लढत असतानाच अनेकवेळा सामान्य नागरिकांना इतर उपचारांसाठी वैद्यकीय सुविधा मिळवताना मोठे खटाटोप करावे लागत आहेत. अशीच वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने नाविलाजास्तव घरात अडकून पडलेल्या गर्भवतीची एका डॉक्टरने घरीच प्रसूती करत तिला आणि बाळाला एक नवीन जीवनदान दिले आहे. डॉक्टर रविंद्र म्हस्के असे त्यांचे नाव असून, चांदिवली संघर्षनगर येथे ते आपली […]