@ सुषमा चव्हाण कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे. १५ मे पर्यंतचा लॉकडाऊन वाढून आता ३१ मे पर्यंत झाला आहे. या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना वगळता इतर नागरिकांना बाहेर पडण्यास मुभा नाहीये. मे महिना म्हणजे शालेय सुट्ट्या आणि नागरिकांच्या पर्यटनाचे दिवस मात्र, या लॉकडाऊनच्या काळात बाहेर पडता येत नसल्याने हे शक्य […]
Tag Archives | Powai
अभिनेत्याची ८६ हजाराची ऑनलाईन फसवणूक
३३ वर्षीय मालिका अभिनेता नुकताच नवीन ऑनलाईन फसवणुकीला बळी पडला आहे. कर्जाची रक्कम सेटलमेंटच्या नावाखाली सायबर चोरट्याने त्याची ८६ हजाराची फसवणूक केली. ई-वॉलेटच्या माध्यमातून शिल्लक कर्जाची माहिती मिळवत सायबर चोरट्याने हा डाव साधला. यासंदर्भात पवई पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून, पैसे हस्तांतरित झालेल्या बँकेच्या मालाड येथील शाखेतील खाते गोठवत अधिक तपास करत आहेत. या संदर्भात […]
चार्टर्ड अकाऊंटंटला ४८ हजाराला गंडा
पवईतील एका चार्टर्ड अकाऊंटंटला त्याच्या घरातील वाय-फाय ब्रॉडबँड सेवेसाठी ऑनलाईन केवायसी करण्याच्या बहाण्याने एका सायबर चोरट्याने ४८ हजार रुपयाला गंडा घातला आहे. सायबर चोरट्याने एक अॅप डाउनलोड करण्यास सांगत तक्रारदार यांच्या फोनचा रिमोट एक्सेस मिळवून प्रत्येकी २४ हजाराच्या दोन व्यवहाराद्वारे पैसे ट्रान्सफर केले. ७ एप्रिल रोजी तक्रारदार यांनी आपल्या घरात ब्रॉडबँड सेवा सुरु केली होती. […]
जामिनावर सुटलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीसह तिघांना हत्याराचा धाक दाखवून जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक
पवई परिसरातील शिवशक्ती नगर येथील एका साडीच्या दुकानात घुसून बंदुकीचा धाक दाखवून, दुकान मालकाला चाकूने जखमी करून जबरी चोरी करणाऱ्या ४ आरोपींना पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अटक आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. गुन्ह्यातील मुख्य आरोपीला काही महिन्यांपूर्वीच जामिनावर सोडण्यात आले होते. तो खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत होता. २१ एप्रिलला ४ अज्ञात इसम हे […]
जागर मानवतेचा समुहातर्फे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त आयोजित स्पर्धेचा निकाल जाहीर
जगभरात थैमान घातलेला कोरोना वायरसला रोखण्यासाठी उत्सव आणि सण घरीच साजरे करण्याची विनंती प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. याचीच दक्षता घेत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३०वी जयंती आंबेडकरी अनुयायांनी सरकारी आदेशाचे पालन करीत घरीच राहून साजरी केली. जागर मानवतेचा (सुरुवात एका नव्या पर्वाची) या समुहातर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त डिजिटल पध्दतीने विविध स्पर्धांचे आयोजन […]
पवईत सापडले बिबट्याचे पिल्लू; आईसोबत पाठवण्यासाठी वनाधिकाऱ्यांचे प्रयत्न
पवईतील नॅशनल इस्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग (नीटी) परिसरात बिबट्याचे एक पिल्लू आढळून आले आहे. येथील बंद असलेल्या एका गोडाऊनमध्ये हे पिल्लू मिळून आले आहे. त्याची त्याच्या आईसोबत भेट घडवून परत पाठवण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी आणि वन्यजीव रक्षक प्रयत्न करत असून, पिल्लावर नजर ठेवून आहेत. बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीला लागून पवईतील बराच परिसर […]
पवईसह पालिका एस विभागात दुपारनंतर मेडिकल स्टोअर वगळता सर्व दुकाने बंद
पालिका एस विभागात दुपारी १२ नंतर अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने बंद करून केवळ होम डिलिव्हरी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मेडिकल स्टोअरला मात्र यातून वगळण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कडक नियम करत कोरोनाला रोखण्यासाठी कंबर कसली आहे. मात्र, नागरिक अजूनही नियमांची पायमल्ली करत अनावश्यक गर्दी करत असल्याचे प्रकार घडत आहेत. याला […]
मेट्रो ६ प्रकल्प: पवईतील दोन पादचारी पूल हटवण्यास सुरुवात
प्रमोद चव्हाण, गौरव शर्मा स्वामी समर्थनगर ते विक्रोळी (पूर्व धृतगती मार्ग) या मार्गावर सुरु असणाऱ्या मेट्रो ६च्या मार्गात येणाऱ्या पवईतील २ पादचारी पुलांना हटवण्याची तयारी सुरु झाली आहे. यामध्ये आयआयटी मार्केट गेट समोरील पादचारी पूल आणि मिलिंदनगर येथील पादचारी पुलाचा समावेश आहे. जेवीएलआर मार्गाच्या निर्मितीवेळी भविष्यात येथून जाणाऱ्या वाहनांच्या संख्या आणि रस्ता क्रॉसिंगला येणाऱ्या अडचणी […]
पवई लायन्स क्लबने दत्तक घेतले आयआयटी मेनगेट समोरील सार्वजनिक शौचालय
डागडुजी आणि अस्वच्छतेमुळे पाठीमागील अनेक महिन्यांपासून खितपत पडलेले आयआयटी मेनगेट जवळील सार्वजनिक शौचालय लायन्स क्लब ऑफ पवईतर्फे दत्तक घेण्यात आले आहे. येथून पुढील काळात त्याच्या डागडुजी आणि स्वच्छतेचे काम संस्था पाहणार आहे. क्लबचे अध्यक्ष कपिलदेव सिंह आणि सदस्य भवानी शंकर शर्मा यांच्या संयुक्त विद्यमाने शौचालय दत्तक घेण्यात आले आहे. नुकतेच शौचालयाचे नूतनीकरण करून ते सार्वजनिक […]
एज्युकेशन लोनच्या नावाखाली आयटी प्रोफेशनलला एक लाखाचा गंडा
पवईकर आणि आयटी प्रोफेशनल असणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेला सायबर चोरट्यांनी १.१ लाख रुपयांना ऑनलाईन फसवले आहे. सदर महिला एमबीएमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक कर्ज मिळवण्यासाठी ऑनलाईन माहिती शोधत होती. कर्ज घेण्यासाठी आर्थिक संस्थेचा शोध घेत असताना या महिलेने इंटरनेटवर सापडलेल्या नंबरवर संपर्क साधला, परंतु ती तिच्या बचतीतून १.१ लाख रुपये गमावून बसली. या संदर्भात […]
आयआयटीतील शिक्षक, विद्यार्थ्यांना बाहेर जाण्यास मनाई; कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने निर्णय
पवई स्थित इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (आयआयटी) मुंबई कॅम्पसमध्ये पाठीमागील काही दिवसात समोर येणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या पाहता आयआयटीतील शिक्षक, विद्यार्थ्यांना बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने प्रसार रोखण्यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कॅम्पस बाहेर सलूनमध्ये जाण्याने हा संसर्ग झाला असण्याची शक्यता येथील पथकाने वर्तवली आहे. मुंबईसह महाराष्ट्रात […]
पवईत १७ वर्षीय तरुणाचा खून; मारहाणीचा व्हिडीओ केला शूट; आरोपींना ५ तासात अटक
पवईतील मिलिंदनगर परिसरात राहणाऱ्या एका १७ वर्षीय तरूणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बुधवार, ३१ मार्चला पहाटे उघडकीस आली होती. अनिकेत रामा बनसोडे असे या तरुणाचे नाव असून, त्याला मारहाण करत त्याचा खून केल्याचे समोर येताच पवई पोलिसांनी पाच तासात ४ आरोपींना अटक केली आहे. अटक आरोपी जेविएलआरवर सुरु असणाऱ्या मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षारक्षक म्हणून काम […]
पवई, चांदिवलीत मंगळवारी ४९ कोरोना बाधितांची नोंद
मुंबईत कोरोनाचा प्रसार वाढत असतानाच पवई आणि चांदिवलीत सुद्धा कोरोना बाधितांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. मंगळवार, २३ मार्चला एकाच दिवसात पवई आणि चांदिवली परिसरात मिळून ४९ नव्या बाधितांची नोंद पालिकेकडे झाली आहे. विशेष म्हणजे संपूर्ण वर्षभरातील या परिसरातील कोरोना बाधितांची ही सर्वांत मोठी वाढ आहे. कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या बाधितांमध्ये इमारत भागात राहणाऱ्या रहिवाशांची […]
मित्रांसोबत पार्टी साजरी करण्यासाठी विद्यार्थ्याने केली फसवणूक; पुण्यातून अटक
पवईकराच्या लोणावळ्यातील एका व्हिलाच्या छायाचित्रांचा वापर करून बनावट जाहिरात आणि आयडी तयार करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या २१ वर्षीय विद्यार्थ्याला पवई पोलिसांनी पुणे येथून अटक केली आहे. बांद्रा येथे निर्माण करण्यात आलेल्या सायबर युनिटच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. आकाश जाधवानी असे अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. व्हिला बुकिंगसाठी मोठी सूट देत डझनभरापेक्षा जास्त पर्यटकांना […]
पवईत मंगळवारी १२ तासांसाठी पाणीपुरवठा खंडित; मुंबईत काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा
पवईतील अँकर ब्लॉक येथे तानसा पूर्व सागरी ९०० मी.मी. व्यासाच्या झडपाच्या दुरुस्ती आणि पवई उच्चस्तरीय जलाशय-१च्या दुरुस्तीचे काम महानगरपालिकेतर्फे हाती घेण्यात आले आहे. मंगळवार, २३ मार्चला या कामामुळे पालिका ‘एस’ विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या पवईतील काही भागात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबईतील अंधेरी पूर्व, धारावी, वांद्रे भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. पालिका जल […]
मोटारसायकल चोराच्या ८ तासाच्या आत आवळल्या मुसक्या; पवई पोलिसांची कारवाई
पवई पोलिसांच्या हद्दीतून मोटारसायकल चोरी करणाऱ्या चोरट्याच्या पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुन्ह्याच्या ८ तासाच्या आत मुसक्या आवळल्या आहेत. सरफराज शेख (१९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चोरी केलेली मोटारसायकल हस्तगत केली असून, अजूनही काही गुन्ह्यात त्याचा सहभाग आहे का? याचा पोलीस शोध घेत आहेत. व्यवसायाने फोटोग्राफर असणारे हर्षद दिलीप जिमकाडे […]
१.६ किलो गांजासह पवईत एकाला अटक
वरिष्ठ पोलीस निरीक्षक (वपोनि) आबुराव सोनावणे यांनी पवई पोलीस ठाण्याचा पदभार स्विकारताच पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा विक्रेते आणि सेवन करणारे यांच्यावर धडक कारवाई करत त्यांचे कंबरडे मोडले आहे. शनिवारी पवई पोलिसांनी पुन्हा कारवाई करत १.६ किलो गांजासह एका विक्रेत्याला बेड्या ठोकल्या आहेत. इर्शाद सरताज अली शेख (२८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. […]
जेविएलआरवर आयआयटी मार्केट गेटजवळ धावत्या कारला आग
जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर पवई येथील आयआयटी मार्केट गेटजवळ एका कारला आग लागल्याची घटना आज, शुक्रवार १२ मार्चला संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. जोगेश्वरीच्या दिशेने आलेली ह्युंडाई एक्सेंड कार क्रमांक एमएच ४७ एन ५८७६ ही टूरिस्ट कार गांधीनगरच्या दिशेने जात असताना ही घटना घडली. गाडीच्या इंजिन भागातून धूर निघत असल्याचे लक्षात येताच चालकाने गाडी बाजूला घेतल्याने […]
रामबाग उड्डाणपुलाजवळ डिव्हायडरला धडकून अपघातात मोटरसायकल चालकाचा मृत्यू
पवई, रामबाग उड्डाणपुलाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असल्याची घटना गुरुवारी रात्री पवईत घडली. २० वर्षीय तरुण विक्रोळीच्या दिशेने जात असताना डिव्हायडरला (दुभाजक) धडकून हा अपघात झाला आहे. या संदर्भात पवई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरु आहे. स्वप्नील सुभाष अहिवले (२०) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. रात्रपाळी कर्तव्यावर असणाऱ्या पवई […]
‘शासन तुमच्या दारी’: वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हिरानंदानीत जन बैठकीचे आयोजन
‘शासन तुमच्या दारी’ संकल्पने अंतर्गत हिरानंदानी भागात रविवार, ३ मार्चला जन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संदीप कर्णिक, अतिरिक्त पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग); महेश्वर रेड्डी, पोलीस उपायुक्त (परिमंडळ १०); रमेश नांगरे, सहाय्यक आयुक्त (साकीनाका विभाग); आबुराव सोनावणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (पवई पोलीस ठाणे); पोलीस निरीक्षक दिलीप धामुनसे (गुन्हे); आमदार दिलीप (मामा) लांडे, हिरानंदानी […]