@अविनाश हजारे | महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानुसार विक्रोळी विभागांतर्गत झालेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला. पवईतील आयआयटी मेनगेट येथील पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये आमदार सुनिल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा क्रमांक १२२च्यावतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये शिवसेना पुरस्कृत अनेक मंडळे, संस्थांच्या कार्यकर्त्यांसह शिवसैनिकांनी समाजाप्रती असलेली आपली […]
Tag Archives | Powai
पवईत कोरोनामुक्त दहीहंडी
कोरोनाने देशभर थैमान घातलेला असल्याने याचे सावट दहीकाला उत्सवावर जाणवले. मुंबईतील अनेक मानाच्या आणि मोठ्या हंड्या रद्द करण्यात आल्या. कोरोनामुळे याही उत्सवावर विरजण पडले असताना अनेक ठिकाणी साधेपणाने उत्सव साजरा करण्यात आला. पवईतही कोरोनाची स्थिती पाहता कोरोनामुक्त दहीहंडी साजरी करण्यात आली. शिवसेना शाखाप्रमुख मनिष नायर आणि माजी शाखाप्रमुख धरमनाथ पंत यांच्या संकल्पनेतून ही दहीहंडी साजरी […]
विंग कमांडर दिपक साठे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
केरळमधील कोझिकोड येथील विमानतळावर ८ ऑगस्टला झालेल्या विमान दुर्घटनेत १९० प्रवाशांचे जीव वाचवताना मृत्युमुखी पावलेले विमानाचे कॅप्टन (विंग कमांडर) दिपक साठे यांच्यावर आज (मंगळवारी) विक्रोळीतील हिंदू स्मशानभूमीत शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांनी आपल्या अतुलनीय कामगिरीने प्रेरणादायी इतिहास रचल्याबद्दल चांदिवली नहार येथील त्यांच्या राहत्या घरी भारतीय वायुसेना आणि मुंबई पोलीस दल यांच्यातर्फे मानवंदना देण्यात आली. […]
पवईत नैराश्यातून १३ वर्षीय मुलीची आत्महत्या
पवईतील कॉस्मोपोलीटन इमारतीत एका १३ वर्षीय मुलीने नैराश्यातून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवार संध्याकाळी घडली आहे. मुलीने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट सुद्धा लिहून ठेवली आहे. एवढे टोकाचे पाऊल उचलत तिने जीवन संपवल्याने तिच्या कुटुंबाला मानसिक धक्का बसला आहे. यासंदर्भात पवई पोलीस अपमृत्युची नोंद करून अधिक तपास करत आहेत. या संदर्भात पवई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार […]
कोझिकोडे एअर क्रॅशमध्ये चांदिवली येथील पायलट दिपक साठे यांचा मृत्यू
काल एअर इंडियाच्या एका विमानाचा केरळ येथील करिपूर विमानतळावर अपघात झाला. या अपघातात १७ जणांचा मृत्यू झाला असून, विमानाचे मुख्य वैमानिक दिपक साठे यांचाही मृत्यू झाला आहे. चांदिवलीमधील नहार कॉम्प्लेक्स मधील रहिवाशी असणारे साठे हे कुशल वैमानिक होते. त्यांच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंबासह चांदिवली आणि पवईकरांवर शोककळा पसरली आहे. साठे यांच्या पश्चात पत्नी सुषमा, मुले शंतनू, […]
पवईत इंदिरानगरमध्ये दरड कोसळली; दोन घरांचे नुकसान
@प्राचा सतत दोन दिवस सुरु असणाऱ्या जोरदार पावसामुळे पवईतील इंदिरानगर भागात बुधवारी पहाटे घरांवर दरड कोसळल्याची घटना घडली. घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून, या घटनेत येथील दोन घरांचे नुकसान झाले आहे. काही दिवसांपूर्वी येथून काहीच अंतरावर असणारी सुरक्षा भिंत पडल्याची घटना घडली होती. शेवटची माहिती हाती आली तेव्हा संध्याकाळी पुन्हा एकदा दरड कोसळण्याची घटना […]
पवईत साजरा झाला राम मंदिर भूमिपूजन उत्साह
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज, बुधवार, ५ ऑगस्ट २०२० रोजी अयोध्या येथे राम मंदिर भूमिपूजन करण्यात आले आहे. त्यासाठी मोदी सकाळी अयोध्येत पोहोचले होते. यावेळी पंतप्रधानांसह उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सरसंघचालक मोहन भागवत हेदेखील उपस्थित होते. याचा आनंद पवईतही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दीप प्रज्वलन करून आणि […]
लॉकडाऊन दरम्यानही प्राण्यांसाठी काम करणारे खरे अवलिया
कोविड-१९ महामारीच्या लॉकडाऊन काळातही प्राणी आणि निसर्गाच्या रक्षणासाठी पॉज मुंबई आणि अम्मा केअर फाऊंडेशन (एसीएफ) सतत कार्यरत आहे. आता अजून एक पाऊल पुढे टाकत एसीएफतर्फे प्राण्यांना मदत करण्यासाठी ‘फेडरेशन ऑफ इंडियन एनिमल प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन’ (एफआयएपीओ) आणि प्लांट एण्ड अॅनिमल वेलफेअर सोसायटी (पॉज-मुंबई) यांच्या सहकार्याने ‘एसीएफ हेल्पिंग हँड फॉर द वॉयलेसलेस’ हा उपक्रम सुरू केला आहे. […]
चंद्रभान शर्मा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत संपादन केले घवघवीत यश
चंद्रभान शर्मा ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्सच्या (सीएससीएससी) विद्यार्थ्यांना प्रत्येक परीक्षेत घवघवीत यश संपादन करण्याची सवयच झाली आहे. एचएससी (बारावी) बोर्डाचा २०२० सालचा निकाल सुद्धा याला अपवाद नाही. दीप गांधी या विद्यार्थ्याने ९३.६९% गुण मिळवत महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर साक्षी सिंग या विद्यार्थिनीने ९०.६१% गुण मिळवत महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागात प्रथम […]
पवईतील शाळांचा एसएससी बोर्ड परीक्षा, २०२०चा १००% निकाल
सुषमा चव्हाण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून, पवईतील सर्वच शाळांचा निकाल १००% लागला आहे. एसएम शेट्टी स्कूल, गोपाल शर्मा मेमोरियल स्कूल, पवई इंग्लिश हायस्कूल आणि ज्ञान विद्या मंदिर ह्या शाळांचा यात समावेश आहे. विशेष म्हणजे उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये डिस्टिंक्शन श्रेणीत गुण संपादन करणाऱ्या […]
कचरयाची कुंडी तुडुंब भरली; पालिकेला उचलायला वेळ मिळेना
पवईतील आयआयटी मार्केट गेट समोरील माता रमाबाई आंबेडकर नगर ग्रुप नंबर २ येथे पालिकेतर्फे ठेवण्यात आलेली कचराकुंडी संपूर्ण भरून कचरा रस्त्यावर पोहचला आहे. यामुळे नागरिकांना घाण दुर्गंधी सारखे त्रास होत असतानाही पालिकेने याकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष केले असल्याचे समोर येत आहे. थोडी विश्रांती घेतलेल्या पावसाने कालपासून पुन्हा हजेरी लावली आहे. या पावसामुळे ठिकठिकाणी साचून राहिलेली […]
कोविड-१९ लढाईत सहकार्य करणाऱ्या पवईतील ४ सोसायट्यांचा पालिकेच्यावतीने सन्मान
देशासह राज्यात कोरोनाचा प्रसार वाढत असतानाच या कोरोनाला रोखण्याच्या लढाईत कोरोना योद्ध्यांना आणि यंत्रणांना सहकार्य करणाऱ्या पवईतील ४ सोसायट्यांचा पालिका एस विभागाच्यावतीने सन्मान करण्यात आला. गुरुवार, २३ जुलै रोजी ‘एस’ प्रभागमधील आरोग्य विभागाच्या एका टीमने पवईच्या चार गृहनिर्माण संस्थांचा त्यांच्या इमारतीत कोविड-१९ व्यवस्थापन करण्यासाठी दिलेल्या चांगल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत कौतुकपत्र देत सन्मान केला. पवईच्या […]
वाढीव वीजबील विरोधात माकपचे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाला निवेदन
मागील दोन महिन्यांपासून आयआयटी पवई परिसरातील नागरिकांना अव्वाच्या सव्वा रकमेची वीज देयके पाठविण्यात येत आहेत. टाळेबंदीमुळे अगोदरच त्रस्त असलेल्या नागरिकांमध्ये याबाबत संताप होता. याबाबत विभागातील काही नागरिकांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पवई शाखेशी संपर्क साधून सदर प्रकरणी लक्ष देण्याची विनंती केली होती. पक्षाच्या पवई शाखेने २४ जुलै रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ भांडूप यांना निवेदन सादर […]
पवईत कोविड-१९ शासकीय रूग्णालय बनवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
प्रतिक कांबळे: कोरोना वायरस या महाभयंकर विषाणूने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. या सुक्ष्म विषाणूनी अनेकांना आपल्या जाळ्यात ओढले आहे. अनेकांचा मृत्यू झाला आहे. अजूनही या विषाणूवर औषध येणे बाकी असून, दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढत आहे. जगभरात हाहाकार माजवलेल्या या व्हायरसने पालिका भांडूप ‘एस’ विभागात येणाऱ्या पवई परिसरात देखील थैमान घातले आहे. यालाच पाहता पवईतील […]
ऑनलाईन मोटारसायकल खरेदी करणे तरुणाला पडले महागात; गमावली तिप्पट रक्कम
सेकंडहॅन्ड मोटारसायकल ऑनलाईन खरेदी करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या २५ वर्षीय तरुणाला ऑनलाईन फसवणूकीत ७२,००० रुपयांची टोपी लागली आहे. २५,००० रुपये किंमतीच्या त्या मोटारसायकल खरेदीत रस असणाऱ्या तरुणाला त्याच्या जवळपास तिप्पट रक्कम गमवावी लागली आहे. यासंदर्भात साकीनाका पोलिस भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करत या प्रकरणाची चौकशी करत […]
गप्पाटप्पा आणि बरेच काही – अभिनेत्री आयेशा कडुस्कर
सुषमा चव्हाण: पवईला लाभलेला निसर्गाचा अनमोल खजिना मुंबईकरांसाठी नेहमीच आकर्षणाचा राहिला आहे. त्याबरोबरच पवई तलाव, आयआयटी कॅम्पस, हिरानंदानीसारखे उच्चभ्रू वसाहत ही पवईची ओळख बनलेली आहे. अशा या आपल्या पवईला अनेक दिग्गज मंडळी, उद्योजक, लेखक, कलाकार मंडळीचा वारसा लाभलेला आहे. त्यांच्यामुळे पवईच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. पवईच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी एक गोड अशी […]
वंबआ मुंबईच्या वतीने पवईत अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
लॉकडा्ऊन शिथिल करत अनलॉकचा दिशेने प्रवास सुरु झाला असला तरीही या काळात हातावर पोट असणाऱ्या अनेकांच्या हाताला अजूनही काम नाही आहे. असे लोक उपाशी राहू नयेत यासाठी वंचित बहुजन आघाडी मुंबईच्यावतीने सोमवारी पवई येथे मोफत अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. मा प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार मुंबईप्रदेश सदस्य भारत हराळे यांच्या नेतृत्वाखाली गरजू गरीब […]
पवईत उच्चभ्रू इमारतीत चोराने मारला मोठा डल्ला
पवईतील लेक फ्रंट सॉलीटेअर इमारतीत एका चोरट्याने घरफोडी करत मोठा डल्ला मारल्याची घटना सोमवार, २० जुलै रोजी घडली आहे. इमारतीच्या ५व्या मजल्यावर असणाऱ्या ५०२ फ्लॅटमधून चोरट्याने ९ लाख २५ हजाराचे सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने आणि रोकडीवर हात साफ केला आहे. चोरीला गेलेल्या मालमत्तेची नोंद घेणे सुरु असून, हा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. विशेष […]
पवईतील सुरक्षा भिंतीची आमदार, नगरसेवक यांच्याकडून पाहणी
मुंबईतील सततच्या पावसामुळे पवईतील मोरारजीनगर, रमाबाई आंबेडकर ग्रुप नं २, शिवनेरी हिल, देवीनगर, गरीबनगर, इंदिरानगर, गौतमनगर, हरीओमनगर लोकवस्तीला जाणाऱ्या मार्गावर असणारी सुरक्षा भिंतीचा भाग गुरुवार, १६ जुलैला पडल्याची घटना घडली होती. यानंतर स्थानिक आमदार आणि नामनिर्देशित नगरसेवक यांनी परिस्थितीची पाहणी करत यंत्रणांना त्वरित कारवाईचे आदेश दिले आहेत. मुंबईत आठवड्याच्या मध्यंतरापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. […]
चांदिवलीत स्टुडिओला आग, जीवितहानी नाही
साकीविहार रोडवर चांदिवली येथे असणाऱ्या एका स्टुडिओला आग लागल्याची घटना आज, शनिवार, १८ जुलै रोजी घडली. एसीमध्ये ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे सगळेच बंद असल्यामुळे सिनेमा आणि मालिकांचे चित्रीकरण सुद्धा बंद होते. मात्र काही दिवसांपूर्वीच चित्रीकरणाला पुन्हा सुरुवात झाली आहे. “चांदिवली येथे असणाऱ्या या […]