पवईतील हिरानंदानी, जलवायू विहार भागात अवजड वाहनांना बंदी असतानाही, अवैधरित्या चालणारी डंपर वाहतूक, अवैध पार्किंग आणि हॉकर्स विरोधात पवईमध्ये बुधवार, २४ फेब्रुवारी रोजी शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आले. स्थानिक आमदार दिलीप (मामा) लांडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन जलवायू विहार चौकात पार पडले. यावेळी आमदार लांडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (साकीनाका विभाग) रमेश नागरे, साकीनाका वाहतूक विभागाचे सपोनि […]


















