क्वारंटाईन केले असताना पळून गेलेल्या तिघांवर कारवाई

क्वारंटाईन

झारखंडचे निवासी असणारे आणि दुबईवरून भारतात परतल्यानंतर मुंबईत होम क्वारंटाईनमध्ये असताना पळून गेलेल्या त्रिकुटाला पकडून कारवाई करत पवई पोलिसांच्या हद्दीत असणाऱ्या अत्यंत सुरक्षित अशा विलगीकरण केंद्रात पाठवले आहे.

या संदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २० मार्च रोजी दुबईमध्ये इलेक्ट्रिशीयन म्हणून काम करणारे दोघे तर भेटण्यासाठी गेलेला एक असे तीन भारतीय नागरिक मुंबईत विमानाने आले होते. एअरपोर्टवर त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारून त्यांना साकीनाका आणि गोरेगाव येथील क्वारंटाईन हॉटेलमध्ये पाठवण्यात आले होते.

त्यांना त्यांच्या मूळगावी शासकीय व्यवस्थेत हलवण्याची तयारी सुरु असतानाच त्यांनी यंत्रणेला न कळविता, २२ मार्चला धूम ठोकत आपल्या मित्राचे वडाला येथील घर गाठले. “या संदर्भात तेथील नागरिकांनी आम्हाला माहिती दिल्यानंतर त्रिकुटाला पकडून पवई पोलिसांच्या हद्दीत असणाऱ्या सुरक्षित अशा शासकीय क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. तसेच तिघांवर कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यात आली आहे” असे याबाबत पोलिसांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा

, , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!