आयआयटी मुंबई विद्यार्थ्यांच्या कॅम्पस भ्रमंतीसाठी १० इलेक्ट्रीक बग्गीज जानेवारी अखेर पासून होणार दाखल. व्यवस्थापनाने १७ मिनी बस सेवा ज्यांना टम-टम म्हणून ओळखले जात होते त्यांना बंद केल्याच्या काही महिन्यांनंतरच ई-बग्गीज सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.
ग्रीन कॅम्पस पुढाकाराचे पुढील एक पाऊल म्हणून इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (आयआयटी-बी) कॅम्पस परिसरात प्रवासी वाहतुकीसाठी जानेवारीच्या अखेरीस १४-सीटर इलेक्ट्रिक बग्गी सुरु करणार आहे. प्रायोगिक रित्या सहा महिन्यांसाठी १० ई-बग्गीज सुरु केल्या जाणार आहेत. ५ किलोमीटरच्या कॅम्पस परिसरात ‘पे-पर-राइड’ आधारावर विद्यार्थी, कर्मचारी या सेवेचा लाभ घेऊ शकणार आहेत. बेंगलुरू स्थित मैनी ग्रुपद्वारे या वाहनांचे उत्पादन व देखभाल केली जाणार आहे.
“कॅम्पस परिसरात सायकल, ऑटो रिक्षा, खाजगी वाहने आणि पायी चालत प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा चांगला पर्याय ठरणार आहे.
विद्यार्थ्यांना कॅम्पस परिसरात खाजगी वाहने वापरण्यास बंदी घालण्यात आल्यानंतर २००८ साली १७ मिनी बस सेवा, ज्यांना टम-टम्स म्हणून ओळखले जात असे कॅम्पस परिसरात सुरु करण्यात आली होती. मात्र काही महिन्यांपूर्वी त्यांनाही बंद करण्यात आले होते. टम टम बंद करण्याच्या काही महिन्यातच ई-बग्गीज सादर करण्याचा निर्णय घेतला गेला.
बरीच वाहने मेंटेनन्ससाठी पडून असल्याने मर्यादित संख्येतील मिनी बसेस मोठ्या संख्येने असणाऱ्या विद्यार्थ्यांना सेवा पुरवण्यात अयशस्वी ठरत असे, एका इंग्रजी माध्यमाशी बोलताना आयआयटी मुंबईच्या अधिका-याने सांगितले.
विद्यार्थ्यांना सुविधा देणाऱ्या ई-बग्गीवर २ किमीच्या प्रवासासाठी ₹ १० किंमत मोजावी लागणार आहे. कॅम्पसमध्ये चार मार्गांवर सुविधा पुरवली जाणार असून, मागणीनुसार नॉन-क्लासच्या दरम्यान सुद्धा सेवा सुरु असेल.
“ई-बग्गीची सेवा कॅम्पस परिसरात चालणारी वाहतुकीची वेगवान आणि सोयीस्कर सुविधा असणार आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांना संपूर्ण टम-टम भरण्याची वाट पहावी लागत असे मात्र ई-बग्गी सेवेत याला मोडीत काढण्यात येईल. कॅम्पसमधील बग्गीजचे ठिकाण जाणून घेण्यासाठी मोबाईल ऍप्लिकेशन सादर करण्याचाही विचार आहे.
No comments yet.