महिला पोलिस अधिकारी सापडली मोबाईल चोरासोबत हॉटेलमध्ये

मोबाईल चोराला पकडण्यासाठी पोहचलेल्या पोलीस पथकाला एक महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक मोबाईल चोरासोबत हॉटेलमध्ये आढळून आल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत.

खेरवाडी ते विलेपार्ले दरम्यानच्या परिसरात ५ ऑगस्टला तासाभरात सात मोबाईल चोरट्यांनी चोरी केल्याचा प्रकार घडला होता. रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हे सातही मोबाईल चोरले होते. यामध्ये खेरवाडी येथून चोरी केलेल्या एका एअर हॉस्टेसचा आयफोन १४ प्रो मोबाईलचा देखील समावेश होता.

खेरवाडी पोलीस यासंदर्भात तपास करत असताना शिळ रोडवर हा मोबाईल बंद केल्याचे समोर आले होते. त्या परिसरात चौकशी करत असताना अभिलेखावरील गुन्हेगार साबीर शेरअली सय्यद याचा या गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट झाला होता.

पोलीस तांत्रिक माहितीच्या आधारावर आरोपीवर लक्ष ठेवून असताना ७ ऑगस्टला संध्याकाळी आरोपी हा आपल्या एका मित्रासोबत सी वूड मॉल आणि तिथून तीन महिलांसोबत मुंबईत आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

आरोपी हा पवईतील एका हॉटेलमध्ये असल्याची माहिती प्राप्त होताच “मिळालेल्या माहितीच्या आधारावर खेरवाडी पोलिसांच्या पथकाने हॉटेलमध्ये सापळा रचून सय्यद सोबत त्याचा एक मित्र आणि तीन महिलांना लॉबीमध्ये येताच ताब्यात घेतले. यावेळी ताब्यात घेतलेल्या महिलांची ओळख समोर येताच पोलिसांचे भानच हरपले कारण यातील एक महिला ही मुंब्रा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आहे.

खेरवाडी पोलिसांनी सय्यद आणि त्याचा साथीदार शाहरुख याला सदर गुन्ह्यात अटक केली असून, महिला पोलिसांच्या उपस्थितीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती पुरवल्यानंतर ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

 

 

, , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!