साकीनाका येथे राहणाऱ्या एका ३२ वर्षांच्या युवकाचा मालवण किनाऱ्यावर अपघाती मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारी पॅरासेलिंग करताना हा अपघात घडला. अझर अन्सारी असं या युवकाचं नाव आहे. तो आणि त्याची पत्नी दोघेही १६ जणांच्या एका गटासोबत पॅरासेलिंग करण्यासाठी गेले होते.
साकीनाका येथे राहणाऱ्या एका ३२ वर्षांच्या युवकाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण किनाऱ्यावर अपघाती मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारी पॅरासेलिंग करताना तोल गेल्याने हा अपघात घडला. अझर अन्सारी असं या युवकाचं नाव आहे. हीना (२४) नामक तरुणीसोबत अलीकडेच त्याचा विवाह झाला होता. ते दोघेही १६ जणांच्या एका गटासोबत पॅरासेलिंग करण्यासाठी गेले होते. अशी माहिती मालवण पोलीस ठाण्यातर्फे देण्यात आली.
अझर अन्सारी पॅरासेलिंग करण्याआधी डेकच्या मागच्या भागात बसला होता. तेथून तोल जाऊन समुद्रात पडला. यावेळी त्याने लाइफजॅकेट घातले नसल्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला असल्याची माहिती मालवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चौधरी यांनी माहिती दिली.
बचाव पथकाने त्याला पाण्याबाहेर काढलं आणि तत्काळ नजीकच्या रुग्णालयात नेलं. मात्र तिथे जाण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची अपघाती मृत्यू म्हणून पोलिसांनी नोंद करून अधिक चौकशी करत आहेत.
No comments yet.