आयआयटीतील मांसाहार वाद बंद करा, युवासेनेचा आंदोलनाचा इशारा

@अविनाश हजारे, रमेश कांबळे

वईतील आयआयटी कॅम्पसमध्ये मागील काही दिवसांपासून शाकाहारी- मांसाहारी वाद पेटलेला असतानाच युवासेनेने यात उडी घेत, संस्थेतील सर्व कँटिंगमध्ये सारखीच नियमावली लागू करावी अशी मागणी करणारे निवेदन घेवून सोमवारी आयआयटीत धडक दिली. आयआयटी मुंबईचे कुलसचिव प्रेमकुमार यांची भेट घेवून, त्यांच्याशी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर चर्चा करत लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा यावेळी युवासेनेने दिला.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार माजी महापौर दत्ता दळवी यांच्या नेतृत्वाखाली साईनाथ दुर्वे, प्रवीण पाटकर, योगेश पेडणेकर, नगरसेविका (वॉर्ड १२१) चंद्रावती मोरे, शाखाप्रमुख निलेश साळुंखे, अरविंद शिंदे, मनिष नायर, डॉ.स्नेहल मांडे सह अनेक शिवसैनिकांनी ही धडक दिली.

गेल्या महिन्यात आयआयटी इन्स्टिट्यूटमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ईमेल पाठवून एक नवा फतवा काढण्यात आला. विद्यार्थ्यांनी कॅन्टीनमध्ये मांसाहार करताना वेगळे ताट घ्यावे. शाकाहारी विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी वापरली जाणारी ताटे मांसाहारासाठी वापरता येणार नाहीत असे त्या ईमेलमध्ये लिहण्यात आले होते.

गेल्या आठवड्यात सिव्हिल कॅफेमध्ये मांसाहारी जेवण मिळणार नसल्याचा आदेश निघाल्यानंतर युवासेनेने यात उडी घेण्याचा निर्णय घेतला.

आयआयटी देशातील एक अग्रगण्य आणि प्रतिष्ठित संस्था आहे. येथे देशाच्या विविध भागातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. अशा वेळी त्यांच्या खाण्या-पिण्याची योग्य सोय करण्याची जबाबदारी आयआयटी प्रशासनाची आहे. शाकाहारी विद्यार्थ्यांच्या प्रमाणात मांसाहार करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून जास्त शुल्क घेतले जाते. असा दुजाभाव का? असा सवाल करत युवासेनेने यावेळी प्रशासनाला याचा जाब विचारला.

आयआयटी पवईमध्ये जेवणासाठी २० कँटिंग आहेत या सर्वांकडे योग्य त्या परवानग्या आहेत का? गेल्याच आठवड्यात कँटिंगमध्ये आग लागण्याचा प्रकार घडला होता अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी काय उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत? कँटिंगवर नियंत्रण ठेवणारी समिती स्थापन करण्यात आली आहे का? असे अनेक प्रश्न यावेळी युवासेनेकडून उपस्थित करण्यात आले.

आयआयटी प्रशासनाने यावर बोलताना मांसाहारी खाद्य पदार्थांवर कोणतीही बंदी घातली नसल्याचे सांगतानाच सर्व कँटिंगसाठी नवीन नियमावली बनवत असल्याचे सांगितले.

, , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes