संपत्तीच्या वादातून पुतण्याने केला काकीचा खून

वईतील फिल्टरपाडा येथे राहणाऱ्या एका तरुणाने संपत्तीच्या वादातून आपल्याच काकीचा खून केल्याची घटना पवईत मंगळवारी घडली. यानंतर तरुणाने स्वतःवर घाव करून घेत पवई पोलीस ठाणेत हजर झाला. रईसा शेख (४५) असे मृत पावलेल्या महिलेचे नाव असून, तिचा पुतण्या तौसीफ शेख (२६) याला पवई पोलिसांनी उपचारानंतर अटक केली आहे.

“मंगळवारी सकाळी रईसा आणि तौसीफ यांच्यात संपत्तीच्या वाटणीवरून चाललेला वाद विकोपाला गेल्यानंतर त्याने आपल्या सोबत आणलेला बटन चाकूने रईसावर वार करून तिला गंभीर जखमी केले. नंतर आपल्या छातीवर घाव करून तो पोलीस ठाण्याला हजर झाला,” असे याबाबत सांगताना पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पवईमधील फिल्टरपाडा बेस्ट सर्कल येथील भागात सईदा शेख नामक महिलेची सात घरे आणि लखनऊ येथे सुद्धा संपत्ती आहे. तिने करीम आणि अश्मत या दोन मुलांपैकी, करीमला लखनऊ येथील संपत्ती तर उरलेल्या परिवारासाठी पवई फिल्टरपाडा येथील संपत्ती दिली आहे.

करीमच्या मृत्युनंतर त्याची पत्नी रईसा शेख हिच्या नावावर त्याची संपत्ती झाली आहे. मात्र लखनऊ येथील संपत्ती कमी असून, फिल्टरपाडा येथे असणाऱ्या घरांपैकी काही घरे तिच्या नावावर करण्यात यावीत अशी ती मागणी करत होती. या गोष्टीला घेवून परिवारात वाद सुद्धा होत होते.

“आरोपी आणि मयत दोघांच्यावरही पवई पोलीस ठाण्यात यापूर्वी गुन्ह्यांची नोंद आहे,” असेही याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.

मंगळवारी संपत्तीला घेवून पारिवारिक वाद सुरु असताना संतापलेल्या तौसीफ याने चाकूने हल्ला करून रईसाला गंभीर जखमी करून स्वतःवर सुद्धा वार करून घेतले. रईसाला त्वरित राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला.

“आम्ही भादवि कलम ३०२, ४५२, ५०४ नुसार गुन्हा नोंद केला असून, तौसीफ याला उपचारानंतर अटक केली आहे” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांनी सांगितले.

, , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes