चैतन्यनगरचे भाजी मार्केट ५ दिवस बंद, व्यापारी संघटनेची घोषणा

भाजी मार्केट बंद

पवई आयआयटी मार्केट येथे असणारे चैतन्यनगर भाजी मार्केट २६ जून ते ३० जून २०२० या कालावधीत बंद राहणार आहे. व्यापारी संघटनेकडून हा निर्णय घेण्यात आला असून, याबाबत परिसरात बोर्ड लावून व्यापारी संघटनेने सूचित केले आहे.

पालिका ‘एस’ विभागात कोरोना बाधितांची संख्या ही दुपटीने वाढू लागली आहे. यामुळेच पवई वगळता अनेक भागात पालिका एस विभागातर्फे पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्या परिसरात नागरिकांना विनाकारण बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. पवई परिसर मात्र यापासून बचावला आहे. यामुळेच मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडून परिसरात फिरताना आढळून येत आहेत.

भाजी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक फिरताना आढळून येत होते. नागरिक काळजी घेत नसल्याने इतरांना त्याचा धोका होता. जे पाहता व्यापाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि कोरोनाचा प्रसार रोखता यावा म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे काही व्यापाऱ्यांनी सांगितले.

भाजी मार्केट बंद

मासळी बाजारावर शुक्रवारी याचा कोणताही परिणाम जाणवला नाही. शुक्रवारी २६ जूनला एका बाजूला संपूर्ण भाजी मार्केट बंद असल्याचे तर दुसऱ्या बाजूला मासळी बाजार सुरु असल्याचे चित्र पहायला मिळत होते.

मार्केटमधील व्यापाऱ्याच्या घरातील व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, असेही काही नागरिकांनी याबाबत बोलताना सांगितले.
आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.

, , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!