पुश पिनने साकारले उद्धव ठाकरे आणि रतन टाटांचे अनोखे पोट्रेट

चेतन राऊत ने पुश पिनने साकारले उद्धव ठाकरे आणि रतन टाटांचे अनोखे पोट्रेटजेजे स्कूल ऑफ आर्टचा विध्यार्थी असलेल्या पवईकर चेतन राऊत ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संकट समयी नेहमीच देशाच्या सोबत असणाऱ्या टाटांसमूहाच्या रतन टाटा यांचे एक अनोखे पोट्रेट साकारले आहे. त्यांनी कोरोनाच्या लढाईच्या काळात दिलेल्या योगदान आणि कार्याला मानवंदना चेतनने आपल्या या कलेतून दिली आहे. यापूर्वीही त्याने आपल्या कलेच्या माध्यमातून विश्वविक्रमी पोर्ट्रेट साकारली आहेत.

देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांसह कलाकारदेखील घरीच बसून आहेत. मात्र कलाकार हा नेहमीच प्रत्येक संधीत आपल्या कलेला वाव देत असतो. अशाच प्रकारे पवईकर आणि जेजे स्कुल ऑफ आर्टचा विध्यार्थी असलेल्या चेतन राऊतने या वेळेचा सदुपयोग करताना या कठीण प्रसंगी राज्याला आधार देणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मदतीचा हात देणाऱ्या रतन टाटा यांचे एक अनोखे पोट्रेट पुशपिनने साकारले आहे.

चेतन राऊत ने पुश पिनने साकारले उद्धव ठाकरे आणि रतन टाटांचे अनोखे पोट्रेट३८८८ पुशपिनचा वापर करत चेतन राऊत ने घरात बसून ही पोट्रेट साकारली आहेत. पेपर बोर्डवर अडकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पुशपिनचा अशा प्रकारे सुद्धा वापर होऊ शकतो याचा विचार कुणीही करू शकणार नाही. मात्र चेतन हा नेहमीच अशा वस्तूंचा वापर करून आपली कला सादर करत जागतिक विक्रमच्या यादीत आपले नाव नोंदवत असतो.

कोरोनाशी लढ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नागरिकांच्या हिताचे आणि योग्य निर्णय घेत आहेत. त्यांच्या कामाचे कौतुक करण्यासह त्यांच्या या कार्याला सलाम करण्यासाठी आपण हे पोट्रेट बनविले असल्याचे चेतनने बोलताना सांगितले.

टाटासमूह संकटाच्या समयी नेहमीच देशासोबत उभा राहीला आहे. कोरोनाशी लढण्यासाठी यावेळी रतन टाटा यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल मी एक सामान्य माणूस म्हणून माझ्या कलेतून त्यांचे आभार मानले आहेत. असेही चेतन याने यावेळी बोलताना सांगितले.

चेतनने यापूर्वीही असे अनेक पोट्रेट बनवले आहेत. ज्याची जागतिक पातळीवर नोंद करण्यात आली आहे. त्याने चार हजारहून अधिक कॅसेट्सचा वापर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चित्र साकारले होते. पिक्सेल आणि थ्रीडी पेंटिंग यांचे फ्युजन असणारे शिवरायांचे मोझॅक आर्ट सुद्धा त्याने साकारले होते. स्क्रॅप मार्केटमधून कीबोर्डची बटणे जमा करून ८७ हजारपेक्षा अधिक बटनांचा वापर करून त्याने डॉ एपीजी अब्दुल कलाम यांचे पोट्रेट तयार केले होते. तर आपल्या कलेतून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहिली होती. पवईत त्याने २ लाख दिव्यांचा वापर करत राम दरबार सुद्धा साकारला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!