आयआयटी बॉम्बेला केंद्र सरकारची सीआयएसएफची सुरक्षेची मागणी, सुरक्षा ऑडिट नियोजित

पवई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबई केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) सुरक्षित केले पाहिजे अशी केंद्र सरकारने मागणी केली आहे. सीआयएसएफ राष्ट्रीय संस्था, विमानतळ, रिफायनरीज आणि शासकीय-संचालित हत्यार कारखाना आणि कंपन्यांना सुरक्षा प्रदान करते.

आयआयटी मुंबईकडे सध्या शंभर पेक्षा अधिक सुरक्षा रक्षक आहेत. यातील काही माजी सैनिक सुद्धा आहेत. आयआयटी मुंबई हे पवई तलाव आणि विहार तलावाच्या संरक्षित भागासह २२३ एकर क्षेत्रात पसरलेले आहे. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर (जेव्हीएलआर) असणाऱ्या मुख्य प्रवेशद्वार पासून किनाऱ्यावर कडेला लागून असलेल्या भागात उंच भिंत आहे.

आयआयटी मुंबईला सीआयएसएफची सुरक्षा देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय राज्याच्या गृह विभागाला कळविण्यात आला आहे. ‘आयआयटी मुंबईला सीआयएसएफ संरक्षण मिळावे यासाठी सरकारच्या मागणीची आम्ही तपासणी करीत आहोत,’ असे याबाबत माध्यमांशी बोलताना प्रधान सचिव (कायदा व सुव्यवस्था) अमिताभ गुप्ता म्हणाले. सीआयएसएफचे सुरक्षा कवच देण्याची मागणी का करण्यात आली आहे हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

आयआयटी मुंबई एक प्रमुख संस्था आहे. लवकरच आयआयटीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करून सुरक्षा ऑडिट केले जाईल. त्यानंतर संस्थेच्या संरक्षणासाठी किती सीआयएसएफ जवानांची आवश्यकता आहे ते ठरवू, असे राज्याच्या गृह विभागाकडून सांगण्यात येत आहे.

केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे येथील कर्मचारी आणि त्यांच्या परिवारात मात्र संभ्रम निर्माण झाला आहे. सध्या असणारी सुरक्षा ही आयआयटीच्या सुरक्षेसाठी सक्षम असताना अजून कडक सुरक्षा व्यवस्था विद्यार्थ्यांसह कर्मचारी आणि त्यांच्या परिवाराला त्रास देणारी ठरणार आहे. शासनाने याचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे, असे याबाबत बोलताना काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.

आयआयटीच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मात्र याला समर्थन दर्शवले आहे. ‘येथील बरेच अधिकारी माजी सैनिक आहेत. मात्र कोणत्याही अचानक झालेल्या मोठ्या हल्ल्याच्या प्रसंगाशी लढण्यास सुरक्षारक्षक सक्षम नाहीत. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी आत्ताच्या सुरक्षा व्यवस्थेसोबतच सीआयएसएफ सारखी सुरक्षा संस्थेला आवश्यक आहे’, असेही याबाबत बोलताना काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.

, , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!