इमारतीत घुसून माजी आयआयटी प्रोफेसरच्या कारची तोडफोड

सोसायटीत दोन्ही इसम रिक्षातून उतरताना

११ जानेवारी २०१८ रोजी रात्री ९.१५ वाजता दोन अज्ञात लोकांनी एसएम शेट्टी शाळेच्या पाठीमागे असणाऱ्या आयआयटी बॉम्बे स्टाफ कॉटर्समध्ये रिक्षातून प्रवेश करून, वरिष्ठ नागरिक प्रोफेसर डॉ एस जी मेहंदळे (आयआयटी बॉम्बेचे सेवानिवृत्त वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी) यांच्या एस्टिलो कारची विंडशील्ड काच फोडल्याची घटना घडली. ही संपूर्ण घटना सिसिटीव्हीमध्ये कैद झाली असून, पवई पोलीस त्या दोन अज्ञात व्यक्तींचा शोध घेत आहेत.

दोन्ही व्यक्ती कॉम्प्लेक्स परिसरात गाडीची काच फोडण्यापूर्वी अर्धा तास वावरत होते. गाडीचे नुकसान करणे हेच त्यांचे उद्देश असल्याचे सिसिटीव्ही फुटेजवरून लक्षात येत आहे. शिवनेरी बिल्डिंगच्या समोर खुल्या पार्किंमध्ये उभी असणाऱ्या गाडीची ओळख पटताच एका व्यक्तीने कारची विंडशील्ड तोडली तर दुसरा व्यक्ती दुसरीकडे कोणी येत नाही यावर नजर ठेवून आहे. गाडीचे नुकसान केल्यानंतर ते दोघेही इसम आरामशीर बाहेर चालत गेले असून, संपूर्ण घटना सोसायटीत असणाऱ्या सिसिटीव्हीत कैद झाली आहे.

मेहंदळे यांची तोडफोड केलेली कार

डॉ. मेहेंदळे यांच्या ही घटना समोर येताच त्यांनी पवई पोलीस ठाण्यात याबाबत गुन्ह्याची नोंद केली आहे.

“असे दिसते आहे की कोणीतरी कारला हानी करण्यासाठी या दोन व्यक्तींना सांगितले होते. या सोसायटीत अनेक जेष्ठ आणि निवृत्त नागरिक राहतात, या घटनेमुळे सुरक्षेचा एक मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. सदर घटना सोसायटीतील सुरक्षा व्यवस्थेतील कमकुवतपणा दर्शविते. भविष्यात अशा घटना घडू नयेत आणि ज्येष्ठ नागरिक व रहिवाशांच्या सुरक्षेसाठी सोसायटी कमिटीने योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.” असे मेहंदळे यांनी याबाबत बोलताना सांगितले.

ते पुढे म्हणाले, “मी ७७ वर्षे शांततेत आयुष्य घालवले आहे. मी व माझी पत्नी आम्ही दोघेही जेष्ठ नागरिक आहोत. उरलेले आयुष्यही शांततेत जावे अशी आमची अपेक्षा आहे; मात्र दुर्दैवाने गेल्या काही महिन्यांपासून समाजातून आम्हाला त्रास देणाऱ्या घटनाच घडत आहेत.

सिसिटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेळे दोन्ही अज्ञात इसम 

काही महिन्यांपूर्वी चांदिवली येथील एका सोसायटीत आपल्या मित्राकडे आलेल्या व्यक्तीची कार काही इसमांनी पेटवून दिल्याची घटना घडली होती. पवई परिसरात घडणारी ही दुसरी घटना आहे त्यामुळे पोलिसांनी सुद्धा अशा प्रवृत्तीच्या लोकांच्या लवकरात लवकर मुसक्या आवळण्याची मागणी येथील स्थानिक नागरिक करत आहेत.

, , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!