आदित्य ठाकरे यांच्यातर्फे पवई तलाव परिसरातील सायकल, जॉगिंग ट्रॅकच्या कामाची पाहणी

पवई तलाव परिसरात तयार करण्यात येणाऱ्या सायकल ट्रॅक आणि जॉगिंग ट्रॅक बरोबरच सौंदर्यकरण कामाचा राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी रविवारी संध्याकाळी पाहणी केली. यावेळी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलारासू, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, स्थानिक नगरसेविका चंद्रावती मोरे, तसेच पालिका अधिकारी उपस्थित होते.

मुंबईच्या पर्यटनस्थळापैकी एक महत्वाचे ठिकाण असणाऱ्या पवई तलाव परिसरातील सुशोभिकरण व संवर्धनाचे काम करतानाच १० किलोमीटर लांबीचा सायकल ट्रॅक आणि जॉगिंग ट्रॅकची निर्मिती करण्यात येत आहे. रविवारी आदित्य ठाकरे यांनी पवई तलाव परिसराला संध्याकाळी ६ वाजता भेट देत या कामची पाहणी केली.

निसर्गसौंदर्य जपून आंतररार्ष्ट्रीय दर्जाची कामे करावीत असे निर्देश त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. तसेच परिसरात लहानांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी योग्य व्यवस्था, विविध ठिकाणावरून एन्ट्री-एक्झिटची सोय यासारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यास सांगितले. निसर्गाशी साधर्म्य साधणारी रंगसंगती ठेवून, निसर्गाची हानी होणार नाही याची दक्षता घेत हिरवळ जपत नागरिकांना आकर्षित करणारे पर्यटनस्थळ विकसित करण्याच्या सूचनाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिल्या.

, , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!