रविकिरण विद्यालयात चिमुकल्यांच्या संगतीत गुरु पौर्णिमेचा कार्यक्रम

आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्याला मार्गदर्शन करणारी वेगवेगळी व्यक्तिमत्वे आपली गुरूच असतात – सविता गोविलकर

१६ जुलै, आषाढ शुद्ध पौर्णिमेला देशभर गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. याचेच औचित्य साधत पार्कसाईट येथील रविकिरण विद्यालयात सुद्धा मोठ्या उत्साहात आपल्यागुरूंना वंदत गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुण्या सौ गिरीजा देशपांडे (रोटरी क्लब ऑफ बॉम्बे पवईच्या अध्यक्षा) आणि विशेष सन्माननीय पाहुण्या सौ सविता गोविलकर (रोटरी क्लब ऑफ बॉम्बे पवईच्या प्रोजेक्ट्स डायरेक्टर) यांच्या हस्ते शाळेतील शिक्षक -शिक्षिकांना गौरवण्यात आले.

शाळेचे संस्थापक आणि विश्वस्त श्री विलास पवार आणि मुख्याध्यापिका सौ फडतरे यांच्या हस्ते मानव विकास मंत्रालयाकडून ‘नॅशनल मीन्स कम मेरीट स्कॉलरशीप’ योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती मिळालेल्या शाळेतील विद्यार्थी – विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला.

विद्यार्थीनिंनी गायिलेल्या सुरेल स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ज्यानंतर विद्यार्थ्यांनी विनोदी बोधप्रद नाट्यप्रवेश सादर केला. शिक्षकांसाठी बनवण्यात आलेले सन्मान गीत गात विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे आपल्या प्रती असणारे ऋण व्यक्त करत त्यांना वंदन केले.

प्रमुख पाहुण्या सौ गिरीजा देशपांडे यांनी यावेळी त्यांच्या स्वतःच्या विद्यार्थी दशेतील अनुभव कथन करत विद्यार्थी शिष्य नात्यातील संबंध उलगडले.

सौ सविता गोविलकर यांनी यावेळी गुरूर्ब्रम्हाः या प्रार्थनेनचा उगम उलगडतानाच गुरूंना आदिकाळापासून पूजनीय मानण्याची भारतीय प्रथा, त्यात काळानुरूप घडत असणारे बदल आणि आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्याला मार्गदर्शन करणारी वेगवेगळी व्यक्तिमत्वे आपली गुरूच असतात यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यातील गुरुचे महत्व पटवून दिले.

आपल्या आयुष्यात आपली पहिली गुरु आईच असते, मात्र आयुष्याच्या प्रत्येक काळात वडील रुपी गुरुचे असणारे महत्व सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे. चाणक्य – चंद्रगुप्त, महात्मा गांधी – श्रीमद राजचन्द्र आणि गोपाळकृष्ण गोखले यांच्यातील गुरुशिष्य नाते. झुकरबर्ग आणि शॉन पार्कर यांच्या मार्गदर्शनपर मैत्रीचे काही पैलूवर सुद्धा त्यांनी यावेळी प्रकाश टाकला. एकलव्याची शिष्य म्हणून महती खरी पण इतक्या मोठ्या त्यागाची शिष्याकडून गुरूने अपेक्षा करणे आजच्या काळात बरोबर नाही, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

मुलांनी ऑनलाईनच्या युगात सोशल मिडिया नेटवर्किंग आणि चॅटिंगमध्ये अडकून न पडता, याच रुपात मिळालेल्या गुगल, ऑनलाईन वाचनाच्या वेबसाईट आणि एप्सच्या माध्यमातून वाचन करत ज्ञानाचा शोध घ्यावा, असा सल्ला सुद्धा त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

सराफ कॉलेज, कांदिवलीच्या माजी मुख्याध्यापिका आणि रोटरीक्लब ऑफ बॉम्बे पवईच्या सचिव सौ. कमलिनी पाठक यांनी शिक्षक आणि प्राध्यापक यांच्या दृष्टीकोनातून गुरु पौर्णिमेचे महत्व सांगितले.

यावेळी रोटरीक्लब ऑफ बॉम्बे पवईच्या दिपा दत्ता आणि साधना भावे यांनी सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली.

, , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!