शाकाहारी जेवणाची ताटे मांसाहारासाठी वापरू नये, आयआयटीत नवा फतवा; विद्यार्थी संतापले

पवई येथील आयआयटी इन्स्टिट्यूटमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक नवा फतवा काढण्यात आला आहे. येथील विद्यार्थ्यांनी कॅन्टीनमध्ये मांसाहार करताना वेगळे ताट घ्यावे. शाकाहारी विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी वापरली जाणारी ताटे मांसाहारासाठी वापरता येणार नाहीत असा फतवाच कॅन्टीन प्रशासनातर्फे काढण्यात आला आहे. याविरोधात विद्यार्थ्यांनी आवाज उठविला असून, यामुळे भांबेरी उडालेल्या प्रशासनाने याबाबत टोलवाटोलवीची उत्तरे देणे सुरू केले आहे.

आयआयटी पवई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलस बनवण्यात आली आहेत. यातील हॉस्टेल क्रमांक अकरामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना कॅन्टीन प्रशासनाने १२ जानेवारीला मेल करून कॅन्टीनमध्ये असणारी जेवणाची ताटे ही मांसाहारासाठी वापरू नयेत, त्यासाठी ट्रे-आकाराच्या वेगळ्या ताटांचा वापर करावा; अशी सूचना दिली आहे.

मेल प्राप्त होताच विद्यार्थ्यांनी या मेलचा स्क्रीनशॉट सरळ सोशल मिडियावर व्हायरल केला आहे. यानंतर भांबावलेल्या प्रशासनाने सारवासारव करण्याचा प्रयत्न सुरु केला.

आयआयटी हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या कॅन्टीगसमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारचे जेवण मिळते. मांसाहार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास फूड काऊंटर्स बनवण्यात आली आहेत. सोबतच येथे जैन आणि उपवासाचे पदार्थही मिळतात. शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी वेगळी टेबलव्यवस्था सुद्धा आहे.

कॅन्टीन प्रशासनाने केलेल्या मेलनुसार, काही विद्यार्थ्यांनी मांसाहार करण्यासाठी स्वतंत्र ताटे ठेवावीत अशी मागणी केली होती. त्यामुळे त्यांच्या सूचनांची दखल घेऊन कॅन्टीनमध्ये ट्रे- आकाराची असलेली ताटे मांसाहारासाठी वापरावीत अशी सूचना करण्यात आली आहे. प्रशासनाने मात्र शुल्क आकारणी सहज व्हावी यासाठी हा मेल करण्यात आला होता. मात्र, विद्यार्थ्यांची गैरसमज झाली असल्याचे स्पष्टीकरण देत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

, , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!