ऑनलाईन गैरवर्तन आणि महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी वाकाची विशेष मोहीम

ऑनलाईन गैरवर्तन आणि महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी वाकाची विशेष मोहीमवूमन अगेन्स्ट सायबर अ‍ॅब्युज फाउंडेशन (डब्ल्यूएसीए) अर्थात वाकाच्या माध्यमातून जागतिक महिलादिनाचे औचित्य साधत सायबर जागरूकता, मोबाईल फोन आणि सोशल मीडियाच्या वापरावर महिला सक्षमीकरणासाठी एक मोहीम सुरू करत आहे. ऑनलाईन गैरवर्तन आणि महिलांवरील हिंसाचाराचा सामना करण्यासाठी वाकाची ही विशेष मोहीम असणार आहे.

आज २१व्या शतकात स्त्रियांना स्मार्टफोनशिवाय दिवस घालवणे शक्य नाही. यासोबतच यापूर्वी कधीही आणि अकल्पनीय वाटणारे धोके महिलांसाठी निर्माण झाले आहेत. वय आणि भोगोलिक बंदी नसणाऱ्या तंत्रज्ञानाचा पूर्ण वापर करण्यासाठी जागरूक, सुरक्षित असणे आवश्यक आहे.

उद्भवणारे धोके आणि समस्यांना सामोरे जाण्यासाठी सुरक्षिततेच्या सुविधा आणि कायद्यांचा काही उपयोग नाही जोपर्यंत ऑनलाइन सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी या गोष्टी कशा वापरायच्या याबद्दल महिला आणि मुलींना ज्ञान नाही. हे पाहता वाका जागतिक महिला सुरक्षा साप्ताहच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थिनी, विविध कार्यालयातील महिला आणि मदतनीसांना प्रशिक्षण देणार आहे. महिलांना त्यांच्या जवळील मोबाइल फोन योग्य रीतीने आणि सुरक्षितपणे कसा वापरावा याबद्दल मार्गदर्शन यावेळी केले जाणार आहे.

के.जे. सोमैया इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये पार पडलेल्या महिला दिन कार्यक्रम ‘मनस्विनी’ पासून या सप्ताहाची मोहीम सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे आणि स्वत:ला कसे सुरक्षित करावे याविषयी माहिती देण्यात आली. मुला-मुलींनी सायबर जगात सुरक्षित राहण्याची आणि एकमेकांना मदत करण्याचा संकल्प सुद्धा यावेळी केला.

वाकाच्या प्रवक्त्याच्या म्हणण्यानुसार, “महिलांच्या सुरक्षिततेवर आणि सक्षमीकरणावर गंभीर परिणाम होऊ शकणार्‍या ऑनलाइन अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे आता त्यांना याच्या योग्य वापराचे ज्ञान असणे काळाची गरज आहे. स्त्रियांमध्ये इंटरनेट, हॅकिंग, सायबर सुरक्षा आणि सायबर गुन्हेगारीविषयी जागरूकता निर्माण असणे आवश्यक आहे. ज्यामध्ये मोबाइलच्या माध्यमातून होणाऱ्या स्टॅकिंग, अश्लील चित्रफिती, फसवणूक आणि छळ यांचा समावेश आहे.”

महिलांवरील सायबर गुन्हे आणि धमक्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचे आढळून आले आहे. विशेषतः सूड, अश्लीलता आणि सेक्सटोरेक्शन सारख्या काही संवेदनशील गुन्ह्यांचे ते मुख्य लक्ष्य आहेत. याच्यापाठीमागे आर्थिकसोबतच सामाजिक आणि सांस्कृतिक बंधने देखील कारणीभूत आहेत. जे महिलांना इंटरनेट वापरण्यास प्रतिबंधित करते.

, , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!