भांडण सोडवायला गेलेल्या व्यावसायिकाचे चोरट्याने १५ लाख पळवले

प्रातिनिधिक

  • दुचाकीस्वार आणि रिक्षाचालकात होणारे भांडण सोडवायला गेलेल्या साकीनाका येथील एका व्यावसायिकाचे १५ लाख रुपये पळवल्याची घटना पवईतील मारवाह रोडवर घडली आहे. सोमवारी रात्री व्यापारी ऑटो रिक्षामधून प्रवास करीत असताना ही घटना घडली. पवई पोलिसांनी या प्रकरणी चोरीचा गुन्हा नोंदवित तपास सुरु केला आहे.

व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीनुसार, त्वरित वैयक्तिक आर्थिक गरज असल्यामुळे रात्री १०.३० वाजता पैसे घेऊन तो पवईतील मारवाह रोडने रिक्षाने प्रवास करत होता. या रोडवर असताना एक दुचाकी रिक्षाला येऊन धडकली. दुचाकीवर असणाऱ्या दोन इसमांनी रिक्षा चालकाशी हुज्जत घालत त्याला बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. जे पाहता व्यावसायिक बॅग रिक्षात ठेवून त्यांच्यातील भांडणे सोडवायला खाली उतरला.

‘मध्यस्तीने काही वेळाने वाद मिटला आणि दुचाकीस्वार सुद्धा त्या ठिकाणाहून निघून गेले. जेव्हा व्यावसायिक व चालक परतले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की रिक्षात ठेवलेली बॅग गायब आहे,’ असे याबाबत बोलताना पवई पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले कि, ‘घडल्या प्रकरणाविषयी व्यावसायिकाने दिलेल्या माहितीच्या आधारे चोरीच्या प्रकरणाची नोंद करून, परिसरात असणाऱ्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासले जात आहे. ही एक पूर्व नियोजित चोरी असल्याचा संशय आहे.’

, , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes