आमदार चषक २०२३; पवईत भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन

स्थानिक आमदार सुनील भाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा १२२च्यावतीने पवईमध्ये मुंबई उपनगर असोसिएशनच्या मान्यतेने जिल्हास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पवई येथील आयआयटी मेनगेट समोरील सिनेमा ग्राउंड मैदानात १० फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

पवई परिसरात पहिल्यांदा अशा प्रकारचे सामने आयोजित करण्यात आले आहेत. प्रथम श्रेणी पुरुष गट, द्वितीय श्रेणी पुरुष गट आणि महिला गट अशा ३ गटात हे सामने खळले जाणार आहेत.

“सायंकाळी ६ ते १० वाजताच्या दरम्यान हे सामने खेळले जाणार आहेत. या सामन्यांचे थेट प्रक्षेपण यु टयूबवर आणि डेन केबलवर पाहता येणार आहे,” असे शाखाप्रमुख सचिन मदने यांनी सांगितले.

, , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!