kirit s

सोमय्यांची पवई तलावाला भेट, पालिका अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर

अविनाश हजारे पवई तलावाचे होणारे गटार रोखण्यासाठी आवर्तन पवई, पॉज मुंबई आणि पवईकर यांनी हाती घेतलेल्या पवई तलाव मोहिमेला उदंड प्रतिसाद मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून मंगळवारी खासदार किरीट सोमय्या यांनी तलावाला भेट देत त्याची पाहणी करून झालेल्या दुरावस्थेसाठी पालिका अधिकाऱ्यांना फैलावर घेत त्वरित समस्या सोडवण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या पवई […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक

लेकहोममध्ये घरफोडी, २.५ लाखाचा ऐवज साफ

मंगळवारी चांदिवली येथील लेकहोम, एव्हरेस्ट हाईट इमारतीच्या बाराव्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक १२०७/१ मध्ये, डक्टच्या साहय्याने बाथरूममध्ये घुसून, घरातील ६ लाख रुपये किंमतीच्या ऐवजावर अज्ञात चोरट्याने हात साफ केला आहे. पवई पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंद करत सोसायटीत असलेल्या सीसीटीव्हीच्या फुटेजच्या  आधारे तपास सुरु केला आहे. लेकहोम, एव्हरेस्ट हाईट इमारतीच्या बाराव्या मजल्यावरील १२०७/१ मध्ये सहकुटुंब राहणारे विश्वनाथ […]

Continue Reading 0

पालिका उद्यानातील शौचालयाचा प्रश्न अखेर मिटला

सहाय्यक आयुक्तांनी उद्यान व मलनीसारण विभागाच्या अधिकाऱ्यांसह उद्यानाची पाहणी करून शौचालयाच्या वाहिनीला मालनिसारण वाहिनीशी त्वरित जोडण्याचे दिले आदेश हिरानंदानी येथील आंब्रोसिया इमारतीजवळील पालिका उद्यानातील शौचालयाला मलनीसारण जोडणीला जोडण्यास पालिकेची परवानगी मिळत नसल्याने, त्याचे गोडाऊन झाल्याची बातमी आवर्तन पवईने केली होती. स्थानिक शाखाप्रमुख निलेश साळुंखे यांनी सुद्धा हा मुद्दा लावून धरत पालिकेला पत्रव्यवहार केला होता. याची […]

Continue Reading 1
DSCN0221

पवई तलावाला मगर पार्क घोषित करा – पॉज मुंबई

पवई तलावात सोडले जाणाऱ्या दुषित, घाण पाण्यामुळे तलाव प्रदूषित होत आहे. जे पाहता प्लॅंट एंड एनिमल वेल्फेअर सोसायटी (पॉज) मुंबईने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री (वन आणि पर्यावरण) प्रकाश जावडेकर यांना पत्राद्वारे पवई तलावाला ‘मगर पार्क’ घोषित करण्याची मागणी केली आहे. सोबतच तलाव भागात परवाना आणि विनापरवाना दोन्ही प्रकारे चालणारी मच्छिमारी रोखण्याची मागणी सुद्धा […]

Continue Reading 0
shivvada stall

पवईतील शिववडापावच्या गाड्या विनापरवाना

पवईत रस्त्यांवर ठिकठिकाणी शिववडाच्या नावावर स्टॉल व गाड्या लावून खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या गाड्यांबद्दल महानगरपालिकेकडे पवईकराने माहितीच्या अधिकारानुसार केलेल्या अर्जातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पवई भागात चालणाऱ्या कोणत्याही शिववडापाव गाडीस पालिकेतर्फे मंजुरी देण्यात आली नसून, राजरोसपणे बेकायदेशीररित्या चालवल्या जात असल्याचे समोर आले आहे. पवईत ठिकठिकाणी फुटपाथ व रस्त्यावर राजरोसपणे बेकायदेशीररित्या स्टॉल व गाड्या लावून […]

Continue Reading 0
asd

शिक्षणाच्या अधिकारासाठी पवईकराची उपशिक्षण अधिकाऱ्याकडे धाव

कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून सरकारने शिक्षणाधिकार कायदा मंजूर केला आहे. मात्र मुंबईतील काही शाळा यांना बगल देत पैसे उकळण्याचे काम करत आहेत. असेच एक पिडीत आणि पवईकर गौतम अंगरखे यांनी शाळेच्या या व्यवहाराला वैतागून सरळ उपशिक्षण अधिकाऱ्यांकडे धाव घेत तक्रार केली आहे. गौतम अंगरखे यांनी आपल्या सहा वर्षाचा मुलगा ईशान याच्या पहिल्या […]

Continue Reading 0
c

पवई तलावाचे झाले गटार, निसर्गप्रेमी चिंतेत

करोडो रुपये खर्च करून सौंदर्यीकरण करण्यात आलेल्या पवई तलावातील पाण्यात आसपासच्या परिसरातून गटाराचे पाणी सोडण्यात येत आहे, त्यामुळे तलावातील पाणी दुषित होत असून, तलावात घाणीचे साम्राज्य पसरून तलावाचे रूपांतर हळूहळू गटारात होत आहे. संपूर्ण पवई तलावाच्या परिसरातून जाताना लोकांना येथून येणाऱ्या दुर्गंधीमुळे नाकावर रूमाल ठेवून प्रवास करावा लागत आहे. मुंबईकर राजेश पिल्लाई यांनी फोन आणि […]

Continue Reading 1
fitnes centre

पवईत लवकरच ‘ओपन जिम’

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सर्वसामान्यांसाठी ओपन जिमची आधुनिक संकल्पना मांडली आहे. या संकल्पनेनुसार पवईमध्ये सुद्धा अशाच प्रकारची ओपन जिम निर्माण केली जावी म्हणून शिवसेना पुढे आली असून, शिवसेना शाखा ११५ चे शाखाप्रमुख निलेश साळुंखे यांनी हिरानंदानी समूहाच्यावतीने पालिकेला नुकत्याच हस्तांतरीत करण्यात आलेल्या पालिका उद्यानात पवईकरांसाठी ओपन जिम तयार करण्याची मागणी केली आहे. लवकरच या […]

Continue Reading 1
2let

पालिका उद्यानातील शौचालय गेले चोरीला

हिरानंदानी येथील आंब्रोसिया इमारतीच्या बाजूला असणाऱ्या पालिका उद्यानात बांधण्यात आलेले शौचालय मलनिसारण वाहिनीला जोडले गेले नसल्याने ते वापरात नसून, त्याचे गोडाऊन झाले आहे. त्यामुळे या उद्यानातील शौचालय चोरीस गेले कि काय? अशी चर्चा स्थानिकांमध्ये आहे. याबाबत पुढाकार घेत शिवसेना शाखाप्रमुख निलेश साळुंखे यांनी पालिका प्रशासनाला पत्रव्यवहार करत लवकरात लवकर शौचालय मलनिसारण वाहिनीला जोडून जनतेसाठी खुले […]

Continue Reading 1

३८ लाखांच्या ‘एमडी’ अंमली पदार्थासह पवईतील एकाला अटक

अंमली पदार्थ विकण्यासाठी आलेल्या तीन इसमांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने टागोरनगर, विक्रोळी येथून ३८ लाखांच्या ‘एमडी’ या अंमली पदार्थासह अटक केली आहे. अटक तीन आरोपींमधील एक इसम हा पवई भागातील रहिवाशी असून, यात एका महिलेचा सुद्धा समावेश आहे. हा साठा त्यांनी कुठून आणला व कोणास विकणार होते? याचा पोलिस आता शोध घेत आहेत. विक्रोळी येथील […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes