अयान शांकताला पवई तलाव वाचवण्याच्या प्रकल्पासाठी इंटरनॅशनल यंग इको-हिरो पुरस्कार

पर्यावरण क्षेत्रासाठी काम करणाऱ्या पवईतील १२ वर्षीय अयान शांकता याच्या पर्यावरणासंबंधित कठीण समस्यांवर उपाय काढण्याच्या प्रकल्पासाठी ‘२०२१ इंटरनॅशनल यंग इको-हिरो’च्या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. अयान याने ‘पवई तलावाचे संवर्धन आणि पुनर्वसन यासाठी ८-१४ वर्ष वयोगटात तिसरे स्थान पटकवले आहे.

अयान हा जगभरातील २५ तरुण पर्यावरण कार्यकर्त्यांपैकी एक असून ‘अॅक्शन फॉर नेशन’ने त्याला इंटरनॅशनल यंग इको-हिरो पुरस्काराने सन्मानित केले आहे. या पुरस्कारा अंतर्गत पर्यावरण प्रती जागृक असलेल्या, पर्यावरणाच्या समस्या सोडवण्यासाठी पाउले उचलणाऱ्यां ८ ते १६ वयोगटातील तरुणांना सन्मानित केले जाते.

अयानचे पालक त्याला दर रविवारी पवई तलावाच्या साफसफाईच्या मोहिमेवर घेऊन जात असत. जिथे त्याने तलावात टाकला जाणारा कचरा, पाण्याची पातळी हळूहळू कमी होत चालली आहे, जवळजवळ अर्धा तलाव शेवाळे आणि जलपर्णीने झाकला गेला असल्याचे पाहिले. त्याने तलावाच्या या र्‍हासाबद्दल विचार करतानाच परिसराचा एकंदर पर्यावरणीय समतोल कसा राखता येईल आणि तलाव वाचवता येईल का याबद्दल काही उपाययोजना आखल्या.

अयान याच्या योजनेचे मुख्य उद्दिष्ट प्रदूषण, तलावाला स्वच्छ करणे आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी जागृकता निर्माण करणे आहे. अयान याने तलावाच्या स्थितीवर एक रिपोर्ट सुद्धा तयार केला आहे. तो सध्या पवई तलावावरील एका डॉक्युमेंटरीवर काम करत आहे.

“या तलावाला स्वच्छ आणि सजीव स्त्रोत बनवणे हे माझे ध्येय आहे. पवई तलाव हा एकेकाळी खूप सुंदर होता मात्र येथे आता सर्वत्र कचरा आणि गटाराचे पाणी जमा होवून त्याची अवस्था बिकट झाली आहे, असे याबाबत बोलताना अयानने म्हटले.

, , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!