माणूसकी फाऊंडेशन अंतर्गत चिमुकल्यांची पवईत स्वच्छता मोहिम

माणूसकी फाऊंडेशन

माणूसकी फाऊंडेशन पवईच्यावतीने ‘माझं पवई मी स्वछ ठेवणार’ या विचाराला घेऊन पवई तलाव आणि परिसरातील गार्डनमध्ये स्वछता मोहीम राबवण्यात आली. माणूसकी फाऊंडेशन चे पवई विभागाचे प्रतिनिधी रोशन पुजारी यांच्या आयोजनाखाली होळी आणि धुलीवंदनच्या दिवशी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

माणूसकी फाऊंडेशन

या स्वछता मोहीम उपक्रमात गौतमनगर येथील लहान मुलांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला होता. संस्थेचे ५ ते १६ वयोगटातील स्वयंसेवकांनी या उपक्रमाची धुरा सांभाळली. होळीमुळे सुट्टीचा दिवस असतानाही ही मुले होळीचा आनंद लुटायचा सोडून स्वच्छतेचे धडे गिरवताना पहायला मिळाली. पवई तलाव विसर्जन घाट ते रामबाग परिसर या लहानग्या स्वयंसेवकांनी स्वच्छ केला. त्यांना पाहून तिथे फिरायला आलेल्या अनेक तरुणांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेत या स्वछता मोहिमेस आपला हातभार लावला.

यावेळी बोलताना या चिमुकल्यांनी सांगितले की, “गार्डन खेळण्यासाठी फिरण्यासाठी आहेत पण काही मुंबईकर येथे बसून मद्यपान, खानपान आणि अश्लील चाळे करत असतात. गार्डनमध्ये पूर्ण कचऱ्याचे साम्राज्य झाल्यामुळे ते खूप अस्वच्छ झाले होते, म्हणून आम्ही हा परिसर स्वच्छ करण्याचे ठरवले.”

पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या, गुटख्याची पाकीटे, वेफरची पाकीटे, दारूच्या बाटल्या सारखा कचरा जमा करून येथे असणाऱ्या कचरापेटीत टाकून देत परिसर स्वच्छ करण्यात आला. ही स्वछता मोहीम पुढे सुट्टीच्या काळात सुद्धा अशीच चालू ठेवणार असल्याचेही यावेळी बोलताना मुलांनी सांगितले.

कचऱ्याची जागा कचरापेटीत आहे त्याला तिथेच टाका. या स्वच्छता मोहिमेत जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घेऊन त्यांनी या स्वछता मोहिमेस हातभार लावावा असे आवाहन सुद्धा या चिमुकल्यांनी यावेळी केले.

या मोहिमेत माणुसकी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. तुषार कदम, कोषाध्यक्ष श्री. मनोज धोत्रे तसेच सदस्य सागर भाऊ यांनी चिमुकल्यांसह सहभाग नोंदवला.

माणूसकी फाऊंडेशन

, , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!