बसमध्ये चोरी करणाऱ्या चोरट्याच्या पवई पोलिसांनी आवळल्या मुसक्या

बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू आणि मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याच्या पवई पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. नागेश शंकर गायकवाड (२९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अटक आरोपी हा अभिलेखावरील गुन्हेगार असून, मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद आहे.

पवई परिसरात जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड (जेविएलअर) मार्गावरून बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांचे मोबाईल, मौल्यवान वस्तू चोरीच्या तक्रारी सतत पवई पोलीस ठाण्यात येत होत्या. या तक्रारींची दखल घेत गुन्हे प्रकटीकरण पथकाची विशेष टीम बनवून बस थांबे आणि बसेसमध्ये नजर ठेवली जात होती.

“सोमवारी बसमधून प्रवास करणाऱ्या एका तरुणाचा आयआयटी मार्केट गेटजवळ मोबाईल चोरी झाल्याची त्याने तक्रार करताच आमच्या पथकाने धाव घेत संशयिताला ताब्यात घेतले,” असे याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.

“चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून तक्रारदार यांचा चोरी केलेला मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे,” असे याबाबत बोलताना गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विनोद लाड यांनी सांगितले.

आरोपी हा अभिलेखावरील गुन्हेगार असून, यापूर्वी त्याच्या विरोधात भादवि कलम ४२० (फसवणूक), ३८० (चोरी) नुसार गुन्हे नोंद आहेत.

पवई पोलिसांनी भादवि कलम ३९२ नुसार गुन्हा नोंद करत त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

, , ,

2 Responses to बसमध्ये चोरी करणाऱ्या चोरट्याच्या पवई पोलिसांनी आवळल्या मुसक्या

  1. राजेंद्र मुरलीधर जोशी March 5, 2021 at 9:53 am #

    आपण नेहमी आवश्यक अन खूप बहुमूल्य माहिती देत असता त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार

    • आवर्तन पवई March 5, 2021 at 4:40 pm #

      धन्यवाद सर,

      आपणा सारख्या वाचकांच्या प्रतिक्रिया आम्हाला जोमाने काम करण्याची प्रेरणा देतात.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!