मुंबईमध्ये बलात्कार प्रकरणांमध्ये पवई दुसऱ्या स्थानावर

मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आकडेवारीनुसार २०१७ मध्ये शहरात नोंदवलेल्या बलात्काराच्या तक्रारींची संख्या पाहता या प्रकरणांमध्ये मुंबईत पवई दुसऱ्या स्थानावर असून, ओशिवरा पोलीस ठाण्यात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. पवईमध्ये गेल्यावर्षी १८ गुन्हे दाखल करण्यात आले होते तर ओशिवरा येथे बलात्काराच्या २६ गुन्ह्यांची नोंद आहे. ज्यामध्ये श्रीमंत उद्योजक आणि बॉलीवूडमधील कलाकारांनी एक चतुर्थांश बलात्कार प्रकरणे रेकॉर्ड केली आहेत.

पवईमध्ये घडलेल्या घटनांमध्ये गेल्या वर्षी ६ जुलै रोजी या प्रकरणातील सर्वात धक्कादायक घटना घडली होती. दोन अल्पवयीन मुलांवर काही अज्ञात व्यक्तींनी बलात्कार केला होता. ज्यानंतर विष प्राशन करून दोन्ही मुलांनी आत्महत्या केली होती. या घटनेतील आरोपींचा अजूनही मागमूस लागलेला नाही.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस ठाण्यात नोंद होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये केवळ मोजक्याच गुन्ह्यांमध्ये आरोपी हा ओळखीचा नसणारा व्यक्ती असतो. नोंद होणाऱ्या जास्तीत जास्त गुन्ह्यांमध्ये आरोपी हा पिडीताला ओळखणाराच असतो. अनेक घटनांमध्ये लिव्हइनमध्ये राहणाऱ्या महिला किंवा लग्नास नकार दिल्यानंतर महिला तक्रारी करतात. अशा प्रकरणांमध्ये स्त्रियांना मदतीचा स्त्रोत म्हणून पोलिस कायदा पाहतात.

“पवईमध्ये नोंद झालेल्या गुन्ह्यांमध्ये लहान मुलांवरील अत्याचारांचे गुन्हे वगळता लग्नास नकार देणाऱ्या किंवा टेक्निकल गुन्ह्यांची संख्याच जास्त आहे. महिलांना योग्य न्याय मिळावा म्हणून ते पोलिसांकडे पाहतात त्यामुळे आम्ही प्रत्येक तक्रार नोंद करून घेतो” असे याबाबत सांगताना पवई पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई पोलीस प्रवक्ते पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीत म्हणतात, पोलिसांनी महिला तक्रारींकडे दुर्लक्ष केले नाही आणि खटले दाखल केले आहेत; त्यामुळे बलात्काराच्या या घटनेची संख्या खूप आहे.

, , , , , , , , , , ,

One Response to मुंबईमध्ये बलात्कार प्रकरणांमध्ये पवई दुसऱ्या स्थानावर

  1. Baba Mumbaiwala March 12, 2018 at 6:15 pm #

    पवई चं सोडा…. मुंबई सारख्या मराठमोळ्या आणि महाराष्ट्र सारख्या कर्तुत्वनिष्ठ राज्या मध्ये असल्या लाजिरवाणी घटना घडताहेत हेच दुर्दैव…..

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes