पवईतील स्कायवॉकवर अज्ञात इसमाची गळफास घेवून आत्महत्या

प्रातिनिधिक छायाचित्र

पवईतील आयआयटी मेनगेट येथील स्कायवॉकवर एका अज्ञात इसमाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे. आत्महत्या करणाऱ्या इसमाची ओळख अद्यापही पटली नसून, पवई पोलीस अधिक तपास करत आहेत.

यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या एका तरूणाला स्कायवॉकवरून जात असताना एक इसम गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. तरूणाने तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. “आमच्या पथकाने तिथे पोहचत त्वरित त्याला राजावाडी रुग्णालय येथे दाखल केले.” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

“ते पुढे म्हणाले “अंदाजे ६० ते ६५ वयोगटातील हा इसम असून, त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र आढळून आले नाही. रस्त्यांवर आणि पादचारी पुलांवर झोपणाऱ्या बेवारस इसमांपैकी तो असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर येत आहे. त्याच्या नातेवाईकांचा शोध सुरु आहे.

, , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!