आयआयटीतील शिक्षक, विद्यार्थ्यांना बाहेर जाण्यास मनाई; कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने निर्णय

पवई स्थित इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (आयआयटी) मुंबई कॅम्पसमध्ये पाठीमागील काही दिवसात समोर येणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या पाहता आयआयटीतील शिक्षक, विद्यार्थ्यांना बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने प्रसार रोखण्यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कॅम्पस बाहेर सलूनमध्ये जाण्याने हा संसर्ग झाला असण्याची शक्यता येथील पथकाने वर्तवली आहे.

मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे म्हटले जात आहे. पाठीमागील काही दिवसात कोरोना बाधितांचा मंदावलेला वेग झपाट्याने वाढू लागला आहे. राज्य सरकारने कठोर पाऊले उचलत याला रोखण्यासाठी कंबर कसली आहे. मुंबईच्या पवई परिसरात असणाऱ्या आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये सुद्धा पाठीमागील २ आठवड्यात कोरोना बाधित मिळून आले आहेत. याला रोखण्यासाठी शासकीय नियामवली सोबतच आयआयटी मुंबईने आपली स्वतःची एक नियमावली सुद्धा बनवली आहे. त्यानुसार बाहेरून कॅम्पसमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचे १० दिवस अलगीकरण केले जाते. तसेच सोशल डीस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन केले जाते.

कोरोनाची तीव्रता कमी झाल्यानंतर आणि टाळेबंदी हटवल्यानंतर बरेच विद्यार्थी आणि शिक्षक कॅम्पसमध्ये परतले होते. पाठीमागील काही दिवसात कोरोनाने मुंबईला पुन्हा आपल्या विळख्यात घेण्यास सुरुवात केलेली असताना, आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये सुद्धा बाधित मिळून आले आहेत. वाढत जाणारा हा प्रसार रोखण्यासाठी आयआयटी प्रशासनाने निर्बंध लावत कॅम्पसमधील शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना बाहेर जाण्यास मनाई केली आहे.

याबाबत बोलताना आयआयटी जनसंपर्क अधिकारी यांनी सांगितले की, “याला निर्बंध म्हणणे योग्य ठरणार नाही. आम्ही विध्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांना परिस्थिती पाहता बाहेर न-जाण्याची विनंती केली आहे.”

कॅम्पसमध्ये मिळालेले बाधित हे कोणाच्या संपर्कात आले होते याची तपासणी करण्यासाठी संस्थेचे एक पथक काम करत आहे. बाधित हे कॅम्पसबाहेर सलूनमध्ये गेल्याने त्यांना याची लागण झाली असल्याची शक्यता या पथकाने वर्तवली आहे. त्यामुळे कोरोनाचा कहर कमी होईपर्यंत तरी हा नियम कॅम्पसमध्ये लागू असण्याची शक्यता आहे.

यापूर्वीही कॅम्पस परिसरात मास्क बंधनकारक सारखे काही कडक नियम करण्यात आले होते. याचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड देखील केला जात होता.

, , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!