Tag Archives | maruti mandir

IMG_5175

कडक पोलीस बंदोबस्तात आदि शंकराचार्य मार्गावरील मारुती मंदिर भुईसपाट

१९२५ पासून थाटात उभे असणारे आदि शंकराचार्य मार्गावरील मारुती मंदिर आज सकाळी ४.१५ वाजण्याच्या सुमारास हटवण्यात आले आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करत पालिकेने सकाळी हि निष्कासनाची कारवाई केली. भक्तांच्या भावनांचा उद्रेक होवून वातावरण बिघडू नये म्हणून कडक पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. ९२ वर्षापूर्वी पवई तलावाचे काम सुरु असताना मारुतीची मूर्ती श्रीधर परांजपे […]

Continue Reading 0

आयआयटी येथील जेव्हीएलआरवरील मारुती मंदिर अखेर हटणार, भक्तांचा आंदोलनाचा इशारा

गेली अनेक वर्षे मारुती मंदिर वाचवण्यासाठी भक्तांची चालू असलेली धडपड अखेर संपुष्टात आली आहे. लवकरच पवईमधील आयआयटीजवळ जेव्हीएलआरवर असणारे मारुती मंदिर हे हटवून बाजूलाच असणाऱ्या राम मंदिरात येथील मूर्ती स्थापित करण्यात येणार आहे. ५ डिसेंबर रोजी न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार मंदिर मालक परांजपे यांनी याला संमती दर्शवली असून, विशेष […]

Continue Reading 0

भरधाव ट्रेलर मारूती मंदीरात घुसला, मोठे नुकसान

जोगेश्वरी – विक्रोळी लिंकरोडवर भरधाव वेगात धावणारा एक ट्रेलर आयआयटी पवई येथील मारुती मंदिरामध्ये घुसल्याची घटना (आज) रविवारी रात्री ३.३० वाजता घडली. या घटनेत मंदिराचा मंडपासह परिसरात असणारे एक जुने झाड आणि मूळ गाभाऱ्याची उजव्या बाजूची भिंत पडून मोठे नुकसान झाले आहे. ट्रेलर चालक जमादार मोहम्मद अली (४०) याला पवई पोलिसांनी अटक केली आहे. घटना […]

Continue Reading 0

पवईतील जेव्हीएलआरवरील मारुती मंदिराला तात्पुरता दिलासा

पवईतील  आयआयटी येथे जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर असणाऱ्या मारुती मंदिर प्रशासनाने कारवाई थांबण्यासाठी कोर्टात धाव घेतल्यानंतर, मुंबई उच्च न्यायालयाने याला तात्पुरती स्थगिती देत, ३ ऑगस्ट पर्यंत नोटीसवर कोणताही निर्णय घेवू नये असे आदेश पालिकेला दिले आहेत. आदि शंकराचार्य मार्गावर (जोगेश्वरी – विक्रोळी लिंक) गेल्या ९२ वर्षापासून मारुती मंदिर उभे आहे. पुढे जेव्हीएलआरच्या निर्मिती नंतर हे […]

Continue Reading 0

पवईतील हनुमान रोडच्या मारुती मंदिरावर पालिकेची कारवाई

@रमेश कांबळे स्थानिकांचा विरोध आणि भावनिक गुंतागुंतीत अडकून पडलेल्या पवईतील हनुमान रोडवरील मारुती मंदिरावर आज अखेर पालिकेने कडक पोलीस बंदोबस्तात कारवाई केली. जेसीबीच्या सहाय्याने संपूर्ण मंदिर पाडण्यात आले आहे. मंदिरावरील कारवाईमुळे स्थानिक जनता भडकली असून, मोठी मोठी आश्वासने देणारी नेतेमंडळी आज गेली कुठे? असा प्रश्न उपस्थित करत ते याच्या विरोधात त्यांच्या कार्यालयांवर आज मोर्चा काढणार […]

Continue Reading 0

आयआयटी येथील मारुती मंदिरावर कारवाईची टांगती तलवार

आयआयटी येथील मारुती मंदिर वाचवण्यासाठी भक्तगणांनी आंदोलन, सह्याची मोहीम, अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी असे सर्वोतोपरी खटाटोप करूनही मारुती मंदिराच्या निष्काशनाची टांगती तलवार अजूनही लटकत आहे. गेल्या आठवड्यात पालिकेतर्फे या मंदिराला हटण्यासाठीची दुसरी नोटीस मंदिर मालकांना देण्यात आली आहे. आदि शंकराचार्य मार्गावर (जोगेश्वरी – विक्रोळी लिंक) गेल्या ९२ वर्षापासून उभ्या असणाऱ्या मारुती (हनुमान) मंदिराला पिटीशन फॉर लिव्ह टू […]

Continue Reading 2

मारुती मंदिर वाचवण्यासाठी सह्यांची मोहीम

आयआयटी येथील मारुती मंदिराला पालिका ‘एस’ विभागाने निष्कासनाची नोटीस बजावल्यानंतर आता हे मंदिर केवळ एका व्यक्तीच्या मालकीचे नसून आम्हा सर्वांचे आहे म्हणत भक्तमंडळी मैदानात उतरली आहेत. मारुती मंदिर बचाव मोहिमेअंतर्गत मंदिर वाचवण्यासाठी आणि प्रशासनावर दबाव बनवण्यासाठी आज (११ एप्रिल २०१७) मारुती मंदिर परिसरात हनुमान जयंती आणि सह्यांची मोहीम असा दुहेरी उपक्रम राबवला जात आहे. मुंबईतील […]

Continue Reading 3

आयआयटी येथील मारुती मंदिर सात दिवसात हटवण्याची पालिकेची नोटीस

आदि शंकराचार्य मार्गावर (जोगेश्वरी – विक्रोळी लिंक) ९२ वर्षापासून उभ्या असणाऱ्या मारुती (हनुमान) मंदिराला पिटीशन फॉर लिव्ह टू सिव्हीलच्या सर्वोच्य न्यायालयाच्या निर्णयाचा व महाराष्ट्र शासनाचा ०४.१०.२०१० रोजी अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याच्या पारित करण्यात आलेल्या आदेशाचा हवाला देत पालिकेच्या एस विभाग सहाय्यक आयुक्त कार्यालयातून गुरुवारी (०६ एप्रिल २०१७) मंदिर प्रशासनाला ७ दिवसाच्या आत हनुमान मंदिर […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes