Tag Archives | Powai

DSC09622

पवई तलाव बनला मृत्यूचा सापळा, असुरक्षिततेच्या मगरमिठीत

करोडो रुपये खर्च करून सुशोभित करण्यात आलेला पवई तलाव सध्या मृत्यूचा सापळा बनून असुरक्षिततेच्या मगरमिठीत सापडलेला आहे. पवई तलाव आणि परिसराच्या सुशोभिकरणासाठी पालिकेने तब्बल 100 कोटी रुपये खर्च केले आहेत, परंतु सुरक्षेच्या दक्षतेच्या अभावी तलावात असलेल्या मगरींनी पाण्यात उतरलेल्या अनेक लोकांना जखमी केले आहे तर काहींचा जीव सुद्धा घेतला आहे. केवळ गेल्या १५ दिवसात मासेमारी […]

Continue Reading 0
adivasi padas

एस. एम. शेट्टी शाळेतील मुलांनी ‘जॉय ऑफ गिव्हिंग’ उपक्रमांतर्गत पसरवला आदिवासी मुलांच्या चेहऱ्यावर आनंद

पवईमध्ये येणाऱ्या साईबंगोडा, उलटणपाडा, खांबाचापाडा असे २७ पाडे अजूनही शिक्षणापासून बरेच दूर आहेत. या मुलांना शिक्षणाचा हात आणि साथ देण्यासाठी पवईच्या एस. एम. शेट्टी शाळेतील मुलांनी आपले शिक्षक व मुख्याध्यापिका यांच्यासोबत या आदिवासी पाड्यातील मुलांसाठी चालणाऱ्या शाळेंना भेट देऊन ‘जॉय ऑफ गिव्हिंग’ उपक्रमांतर्गत शैक्षणिक साहित्य देऊन मदतीचा हात दिला. दोन्हीकडील मुलांनी एकमेकांचे आचार विचार संस्कारांची […]

Continue Reading 1
panch srushti police

पंचसृष्टीला सुरक्षा कवच, सोनसाखळी चोरी रोखण्यासाठी पोलीस पथकाची नियुक्ती

पंचसृष्टी परिसरात सोनसाखळी चोरीच्या घटनांनी हैदोस घातला असून, फेडरेशनच्यावतीने परिसरात गस्त वाढवावी यासाठी पोलिसांना पत्र दिले होते. या समस्येला पोलिसांच्या समोर आणत ‘आवर्तन पवई’ने ‘पंचसृष्टी कॉम्प्लेक्स सोनसाखळी चोरांचा अड्डा’ या मथळ्याखाली बातमी केली होती. स्थानिकांचा पाठपुरावा आणि आवर्तन पवईच्या बातमीची दखल घेत अखेर आता इथे गर्दीच्या वेळी, सकाळी आणि संध्याकाळी होणाऱ्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवण्यासाठी […]

Continue Reading 0
आम्हाला आमची संस्कृती जपायची आहे, आम्हाला मराठी शाळेत शिकायचे आहे. असे म्हणत हजारोच्या  संख्येने विद्यार्थी आणि पालकांनी शाळा तोडायला आलेल्या प्रशासनाच्या विरोधात जनांदोलन केले

शाळा तोडण्याच्या नोटीसीच्या विरोधात विद्यार्थी, पालक रस्त्यावर

एकीकडे राज्य सरकार सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी प्रयत्न करीत असतानाच, दुसरीकडे मात्र गुरुवारी चांदिवलीमधील संघर्षनगर भागातील कुशाभाऊ सेठ बांगर विद्यालय, या मराठी शाळेला ती अनधिकृत ठरवून तोडण्यासाठी प्रशासन पोलिसांचा फौजफाटा घेऊन पोहचले होते. इंग्रजी शाळेचा स्तोम वाढत असतानाच, मराठी शाळा मात्र बंद पडत आहेत. आम्हाला आमची संस्कृती आणि मराठी शाळा दोन्ही वाचवायचे आहे, म्हणून […]

Continue Reading 0
HNG drainage issue

हिरानंदानीकरांचा प्रवास गटाराच्या पाण्यातून, शाळेतील मुले पडत आहेत आजारी

हिरानंदानी येथील ओर्चीड एव्हेन्यू रोडवरील हिरानंदानी स्कूल शेजारील गटाराचे घाण सांडपाणी संपूर्ण रस्त्यावर पसरत असल्याने, पवईकर आणि खास करून हिरानंदानी परिसरातील नागरिकांना गटाराच्या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. शेजारीच असणाऱ्या हिरानंदानी शाळेतील मुले आजारी पडत असल्याबाबत मुलांच्या पालकांकडून तक्रारी केल्या जात आहेत. “आम्ही कारण शोधून काढले असून काम सुरु केले आहे. २ दिवसापूर्वी सुरु झालेल्या […]

Continue Reading 0
FOB HNG fnl

पवईतील पादचारी पूल नक्की कोणासाठी? पुलावर भिकारी, गर्दुल्यांचे अतिक्रमण

पवई येथील हिरानंदानी बसस्थानक पादचारी पुलावर गेल्या काही महिन्यांपासून भिकारी, गर्दुले यांनी अतिक्रमण केले आहे. या पुलावर छेडछाड, चोरीच्या घटना घडू लागल्याने आता पादचाऱ्यांनी या पुलाचा वापर करणेच टाळले आहे. ही केवळ याच नाही तर पवईमधील बऱ्याच पादचारी पुलांची अवस्था आहे. या संदर्भात स्थानिक शिवसेना शाखाप्रमुख निलेश साळुंखे यांनी मनपा प्रशासन व पवई पोलिसांना लेखी […]

Continue Reading 0
dr

सुकृतः फाऊन्डेशन – गरिब गरजूंना मोफत शिक्षण, वैद्यकीय सुविधा आणि आवश्यक गोष्टी देणारी संस्था

माझ्या प्रत्येक कृतीतून मला फायदा कसा होईल, या विचाराने वागणाऱ्या समाजात. आपल्याला प्रत्येक कार्यात मदत करणाऱ्या, गरीब आणि गरजू अशा घरकाम करणाऱ्या स्त्रिया, त्यांचा परिवार, अनाथ, रस्त्यांवर राहणाऱ्या लोकांसाठी मोफत शिक्षण, वैद्यकीय सुविधा देण्याचे काम, पवईमधील रहेजा येथील सुकृतः ही संस्था करत आहे. एवढ्यावरच न थांबता ही संस्था, या लोकांसाठी चांगले काहीतरी करा म्हणून लोकांना […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

पवई तलावात बुडून लाइफ गार्डचा मृत्यू, अति-आत्मविश्वास पडला महागात

पवई तलावात मस्ती करता करता एका 27 वर्षाच्या मुलाचा बूडन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी संध्याकाळी पवई तलावात घडली. मृत युवकाचे नाव विलास कडव असे असून, तुंगा गांव येथील रहिवाशी आहे. पवई तलावातील कचरा काढ़णे, गणेश विसर्जन करणे आणि लाइफगार्ड म्हणून तो काम करायचा. शनिवारी आपल्या मित्रांसोबत तलावावर असताना श्वास रोखून पाण्यात बुडून राहण्याचा खेळ […]

Continue Reading 0
pl2

पवई तलाव बत्ती गुलची तक्रार पोहचली हॉटलाईनवर, त्वरित दिवे चालू करण्याचे शिवसेना भवनातून आदेश

मरीन ड्राईव्ह येथील क्वीन नेक्लेसच्या धर्तीवर करोडो रुपये खर्च करून पवई तलाव परिसरात सुशोभिकरण करून पदपथावर लावलेले दिवे, गेले एक महिने बंद पडले आहेत. याची तक्रार जल अभियंते आणि कार्यकारी अभियंते यांच्याकडे पवईकरांकडून वारंवार करून सुद्धा, पदपथावरील दिवे चालू झाले नाहीत. शेवटी कंटाळून पवईकर नागरिकांनी महानगरपालिकेत सत्ता असणाऱ्या शिवसेनेने तक्रार नोंदवण्यासाठी सुरु केलेल्या हॉटलाईनवर याबाबत तक्रारी […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes