संविधान जाळल्याच्या निषेधार्थ पवई पोलीस ठाण्यावर धडकला युवकांचा मोर्चा

दिल्लीतील जंतर-मंतर येथे भारतीय जनतेच्या अस्मितेचे प्रतिक असलेले भारतीय संविधान जाळण्यात आले. भारतीय संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. या कुप्रवृत्तीचा देशाच्या कानाकोपऱ्यात निषेध नोंदवला जात असून, पवईमधील सर्व संस्थांनी मिळून पवई पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत आपला निषेध नोंदवला. यावेळी पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांना निवेदन देवून संविधानाचा व राष्ट्रपुरुषाचा अवमान करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली.

निवेदनानुसार, जातीयवादी मानसिकतेच्या दिल्ली येथील युथ इक्वालिटी फाउंडेशन (आजादसेना) संघटनेच्या विकृत कार्यकर्त्यांनी ९ ऑगस्ट २०१८ रोजी भारतीय संविधानाची प्रत जाळत घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात घोषणा देवून देशद्रोहाचा गुन्हा केला आहे. सदर कृत्य करणाऱ्या समाजकंठकांवर (Preventation of insult to National Honour Act 1971 & 124 A of IPC तसेच Astrocity Act व IT Act कलमाखाली गुन्हा नोंद करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.

पवईतील संस्थांच्यावतीने भाऊ पंडागळे, संजय गाडे, विनोद लिपचा, लक्ष्मण धवन, दीपक खंडागळे, तुकाराम खंडागळे, हरी घाडगे, विलास कुशेर, आशा आढाव, सिद्धार्थ गायकवाड, बाबू देठे, सुनील गंगावणे, शांता गाडे, शशिकला पवार, राहुल गच्छे यांनी नेतृत्व केले.

याबाबत बोलताना आंदोलकांनी सांगितले की, भारताच्या संविधानाबद्दल भारतीय जनतेच्या मनात असीम आदर व स्वाभिमान आहे. असे असताना काही विकृतांनी बुरसट विचारसरणीच्या लोकांना सोबत घेवून जंतर-मंतरसारख्या सार्वजनिक ठिकाणी भारतीय संविधानाची होळी करण्याचे केलेले कृत्य हे निंदनीय आणि देशद्रोही आहे.

ते पुढे म्हणाले, ‘या समाजकंटकांविरोधात ‘प्रिव्हेंशन ऑफ इन्सल्ट ऑफ नॅशनल ऑनर अ‍ॅक्ट १९७१ अ‍ॅण्ड १२४ ए, एससी एसटी अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्ट’ आणि व्हीडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्याबद्दल आयटी अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल करून अटक करावी अशी आमची मागणी आहे.’

, , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!