शालेय वाहनांमुळे हिरानंदानी हॉस्पिटलजवळ वाहतूक कोंडी

RTE---ok-image---traffic-ouसंपूर्ण पवईला आधीच वाहतूक कोंडीने वेढलेले असतानाच, यात अजून भर पडत चालली आहे ती हिरानंदानी हॉस्पिटल समोर असणाऱ्या शाळेच्या वाहनांच्या बेजबाबदार पार्किंगमुळे. ज्यामुळे परिसरात वाहतूक कोंडीच्या समस्येने डोके वर काढले आहे. शाळा व हॉस्पिटल प्रशासनाने कानाडोळा केला असून, वाहतूक विभागाने सुद्धा याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने समस्या दिवसेंदिवस जटील होत चालली आहे.

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर चालू असलेले मलवाहिनी टाकण्याचे काम आणि वाहतूक कोंडी ही  समस्या पवईकरांसाठी त्रासदायक ठरत असतानाच, हिरानंदानी हॉस्पिटल समोरील शाळांनी येथील रस्त्यांवर गाड्या पार्क करून त्यात आणखी भर टाकलेली आहे.

चांदिवली आणि आयआयटी परिसराला जोडणारा हिरानंदानी मार्ग हा एकमेव दुवा असल्याने, या मार्गाने मोठ्या प्रमाणात येणाऱ्या वाहनांमुळे गेल्या काही महिन्यात या परिसराला वाहतूक कोंडीच्या समस्येने ग्रासले आहे. त्यातच जेव्हीएलआर मार्गावर वाढलेल्या वाहतूक कोंडीमुळे याचा मोठा भार हिरानंदानीमार्गे बाहेर पडणाऱ्या मार्गावर पडला आहे. परिसरातील वाढती वाहतुकीची कोंडी पाहता स्थानिक भागात प्रवास करणाऱ्या वाहनांच्या सोयीसाठी आयआयटी – जीएल कंपाऊंड – हिरानंदानी हॉस्पिटल – अक्षरधाम मंदिर – एमटीएनएल मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे. मात्र, शाळा सुरु झाल्यापासून हिरानंदानी हॉस्पिटल समोर असणाऱ्या पोद्दार स्कूलच्या बसेस संपूर्ण रस्त्यावर उभ्या राहत असल्याने या भागाला वाहतूक कोंडीने वेढले आहे. सोबतच याच भागात नुकतेच नव्याने सुरु झालेल्या हिरानंदानी समूहाच्या पूर्व प्राथमिक शाळेत मुलांना सोडायला येणाऱ्या पालकांच्या गाड्यांनी त्यात भर घातली आहे.

याबाबत बोलताना हिरानंदानी रहिवासी जॉयने सांगितले, “माझे रेस्टोरंट आयआयटी भागात आहे. सकाळी मी जेव्हा रेस्टोरंटला जायला निघतो, तेव्हा शाळेत येणाऱ्या मुलांच्या बस आणि त्यांच्या पालकांच्या गाड्यांनी संपूर्ण रस्ता जाम झालेला असतो. रस्त्यावर चालण्यास सुद्धा जागा उरलेली नसते. केवळ ५ मिनिटांचा रस्ता पार करण्यास कधी कधी अर्धा ते पाऊण तास खर्ची घालावा लागतो आहे.”

अजून एक स्थानिक मिता यांनी सांगितले, “सकाळी मी माझ्या मुलाला येथील शाळेत सोडायला येते. मला गाडी लांब पार्क करून गर्दीतून वाट काढत मुलाला चालत घेवून यावे लागते; कारण इथे प्रत्येक पालकांची आपल्या पाल्याला शाळेच्या गेट पर्यंत सोडायची शर्यत लागलेली असते. ज्यामुळे शालेय बसेसनी संपूर्ण माखलेल्या रस्त्यावर पालकांच्या कार घुसून संपूर्ण रस्ता जाम होतो. हॉस्पिटलमध्ये आलेले लोक सुद्धा रस्त्यावर बेजबाबदारपणे गाडी पार्क करून निघून जातात. या समस्येकडे ना ही हॉस्पिटल प्रशासन, ना ही शाळा प्रशासनाकडून लक्ष घातले जात आहे. वाहतूक पोलीस सुद्धा खाजगी रस्त्याचे कारण देत हात झटकतात. मात्र, दंड वसूल करताना त्यांना हाच खाजगी रोड चालतो. सगळ्यांच्याच नाकर्तेपणामुळे समस्या आता जास्तच जटील होत चालली आहे.”

यासंदर्भात आवर्तन पवईने हिरानंदानी व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , ,

2 Responses to शालेय वाहनांमुळे हिरानंदानी हॉस्पिटलजवळ वाहतूक कोंडी

 1. Suresh Kamble February 28, 2018 at 7:32 am #

  Dear Sir, we want to Promote a Waterless Car Cleaning and Detailing Services in Hiranandani gardens and Powai area. We are a start up company so budget is a constraint. Kindly help us to Promote a Water Saving and mosquito Repellent Solution in all Housing Societies in Powai area. We are also going to create Huge Employment. Skilled workmen will be deployed. Existing car washers will be given a proper employment with training and all other benefits including PF and ESIC. Above all Car Owners will be Satisfied and Happy.

  Awaiting your favorable reply…

  • आवर्तन पवई February 28, 2018 at 5:30 pm #

   जाहिरात किंवा प्रेस नोट स्वरुपात असेल तर 8879310074 या क्रमांकावर संपर्क साधावा

   – वृत्तसंपादक

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes