दहीहंडी (गोपाळकाला) उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. माखनचोरच्या या परंपरेत लहानथोर अशी सर्व मंडळी मोठ्या उत्साहाने भाग घेत या दिवशी ठिकठिकाणी हंडी फोडण्यासाठी निघतात. थरावर थर रचत मानवी मनोरे तयार करून हंडी फोडण्याचा एक वेगळाच थरार या दिवशी अनुभवयाला मिळतो. त्यासाठी प्रशिक्षण आणि सराव अशा दोन्ही गोष्टीची सांगड घालत ही पथके प्रत्येकवर्षी जास्तीत जास्त हंडी फोडण्यासाठी सज्ज होत असतात. पवईमधील श्री गणेशनगर गोविंदा पथक सुद्धा असेच एक.
गेले महिनाभर या पथकाचे सराव आणि प्रशिक्षण जोमात सुरु आहे. त्याचे प्रात्यक्षिक म्हणून श्री गणेशनगर गोविंदा पथक आणि हिरानंदानी ग्रुपच्यावतीने रविवारी श्री गणेशनगर येथे चोर दहिहंडीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी तुषार पावसकर यांनी टिपलेले काही क्षण.
No comments yet.