डीजे आणि वाद्यवृन्दांच्या तालावर बेभान होऊन रास-गरबा, दांडिया नाचणाऱ्या तरुणीला वगळले तर मुंबईकरांना आता वेड लागलेय ते दुर्गा पूजेचे. कलकत्तामध्ये नवरात्रीच्या दिवसात सहाव्या दिवसपासून पाच दिवस मातेचा उत्सव ‘दुर्गा पूजा’ रुपात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तिच संस्कृती आता सगळ्या संस्कृती आणि लोकांना आपलेसे करून टाकणाऱ्या मुंबईत पसरत चालली असून दांडिया, रासगरबापासून दूर पळणाऱ्या लोकांचे पाय आता या दुर्गा पुजेंकडे स्थिर होवू लागले आहेत.
मुंबईतील काही प्रमुख दुर्गापूजांपैकी पवई भागात स्पंदन फाऊन्डेशनची आणि पवई बंगाली वेल्फेअर असोसिअशनची अशा दोन दुर्गापूजा होत आहेत. पवई बंगाली वेल्फेअर असोसिएशनचे हे दहावे वर्ष असून स्त्री सक्षमीकरणाचा संदेश त्यांनी आपल्या दुर्गापुजेतून दिला आहे, तर स्पंदन फाऊन्डेशन या वर्षी आपल्या तिसऱ्या दुर्गापूजेच्या माध्यमातून मधुबनी, पट्टचित्र सारख्या कलाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे दर्शन मुंबईकरांना घडवून आणत आहे.
स्पंदन शारदोत्सव २०१५
स्पंदन फाऊन्डेशन यावर्षी १७ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर दरम्यान कॅफे मांगी समोरील पालिका मैदानात आपला तिसरा शारदोत्सव साजरा करत आहे. खूप कमी वेळातच त्यांनी सोशल – कल्चर इवेन्ट म्हणून स्थान मिळवले असून, या वर्षी भारतीय कला आणि युवा शक्तीची थीम घेऊन आपला उत्सव साजरा करत आहेत.
देवीची मूर्ती स्थापित करण्यासाठी बनवलेल्या पंडाळात मधुबनी पेंटिंग आणि पट्टचित्राच्या साहय्यातून सजावट केली गेली आहे. ज्यात पारंपारिक पद्धतीने स्थापित केलेले दुर्गेचे रूप तुमचे मन जरूर मोहून नेईल.
आनंदमेला, स्पंदन मास्टरशेफ, सांस्कृतिक संगीत आणि नाच, जोजो, अश किंग, स्वपन बासू सारख्या कलाकारांचे सादरीकरण, अदुर्ता या अनाथ मुलांच्या संस्थेतील मुलांचे ओडिसी डान्स, भारताच्या विविध भागातील सांस्कृतिक डान्स, आणि लहान मुलाचे टागोरांचे “तशर देश” हे नाट्य अशी कार्यक्रमाची रेलचेल येथे असणार आहे. बंगाली विविध मिठाईचा आणि भोगचा लाभ सुद्धा मुंबईकरांना येथे घ्यावयास मिळणार आहे.
‘स्पंदन शारदोत्सव हा केवळ उत्सव नसून संस्कृतीची खरी ओळख करून देणारा उत्सव आहे, जिथे कला आणि संस्कृतीला योग्य न्याय देण्याचे काम केले जाते आहे. तुम्ही तुमच्या संपूर्ण परिवारासोबत एकदा नक्की भेट दया जे तुम्हाला वेगवेगळ्या संस्कृतीचे शिक्षण देऊन जाईल, असे आवर्तन पवईशी बोलताना येथील पदाधिकाऱ्यानी सांगितले.
पवई बंगाली वेल्फेअर असोसिअशन दुर्गापूजा
स्त्री सक्षमीकरण आणि नारी शक्तीचा संदेश घेऊन पवई बंगाली वेल्फेअर असोसिअशन या वर्षी आपले दहावे वर्ष साजरे करत आहे. १७ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर दरम्यान नेहमीच्याच जलवायू विहार समोरील पालिका मैदानात हा उत्सव साजरा केला जात आहे. रवीन्द्रनाथ टागोर यांच्या विश्वभारती युनिवर्सिटीच्या शांतीनिकेतन मधील उपासनागृहाची प्रतिकृती मातेची मूर्ती स्थापित करण्यासाठी पंडाळ रुपात उभारण्यात आली आहे.
२००५ मध्ये पवई व आसपासच्या परिसरात राहणाऱ्या बंगाली लोकांना एकत्रित आणून आपली संस्कृती जपण्यासाठी सुरु केलेल्या या उत्सवाने आज मुंबईतील प्रमुख दुर्गापूजेमध्ये स्थान मिळवले आहे. प्रत्येक वर्षी विविध सांस्कृतिक आणि मुंबईकरांचे लक्ष वेधून घेणाऱ्या उत्सवामुळे आज मुंबई मधील प्रमुख दुर्गापूजांपैकी ही एक बनली आहे.
स्त्री सक्षमीकरण आणि नारी शक्तीची संकल्पना त्यांनी अगदी सुरुवातीपासून पाळत दादर येथून मातेची मूर्ती घेऊन निघताना ४ दुचाकीस्वार महिला पथकाने संपूर्ण रस्त्याने याचे नेतृत्व केले. पुरुष मंडळींची साथ घेऊन संपूर्ण उत्सव सुद्धा महिला नेतृत्वच यावर्षी पार पाडत आहे.
बंगाली वेल्फेअर असोसिअशनच्या दुर्गापूजेत सुद्धा कार्यक्रमाची अगदी रेलचेल आहे. नारीशक्ती आणि सक्षमीकरणाला साजेश असे कार्यक्रमाचे आयोजन संपूर्ण दुर्गापूजेच्या काळात केले गेले आहे. ज्यात सांस्कृतिक कार्याक्रमांबरोबरच अनेक ख्यातनाम व्यक्तींचे मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत.
No comments yet.